चार्ल्स कोरिया
चार्ल्स मार्क कोरिया (१ सप्टेंबर १९३० - १६ जून २०१५) हे एक भारतीय शिल्पकार आणि शहरी नियोजक होता. स्वातंत्र्योत्तर भारतात आधुनिक वास्तुकलेच्या स्थापनेचे श्रेय त्यांना दिले जाते. सोबतच शहरी गरीबांच्या गरजा यांच्याबद्दलच्या संवेदनशीलता आणि पारंपारिक पद्धती आणि साहित्याच्या वापरासाठी ते प्रसिद्ध होते. [१] भारत सरकारकडून १९७२ मध्ये त्यांना पद्मश्री आणि २००६ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
Indian architect and urban planner (1930–2015) | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
जन्म तारीख | सप्टेंबर १, इ.स. १९३० हैदराबाद |
---|---|
मृत्यू तारीख | जून १६, इ.स. २०१५ मुंबई |
मृत्युचे कारण | |
नागरिकत्व |
|
शिक्षण घेतलेली संस्था | |
व्यवसाय |
|
सदस्यता |
|
उल्लेखनीय कार्य |
|
पुरस्कार |
|
जीवन
संपादनचार्ल्स कोरिया, गोवाच्या रोमन कॅथोलिक वंशातील होते. यांचा जन्म १ सप्टेंबर १९३० रोजी सिकंदराबाद येथे झाला. [२][३] त्यानी मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये उच्च शिक्षण सुरू केले. त्यांनी मिशिगन युनिव्हर्सिटी (१९४९ - १९५३) येथे शिक्षण घेतले जेथे प्रसिद्ध शिल्पकार बकमिन्स्टर फुलर हे शिक्षक होते. पुढे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (१९५३ - १९५५) येथे त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले.
इ. स. १९५८ मध्ये चार्ल्स कोरीया यांनी मुंबईत स्वतःचा व्यावसाय स्थापन केला. त्यानंतर अहमदाबाद येथील साबरमती आश्रम मध्ये १९५८ ते १९६३ महात्मा गांधी संग्रालय (महात्मा गांधी स्मारक) हा त्यांचा पहिला महत्त्वपूर्ण प्रकल्प होता. त्यानंतर १९६७ला भोपाळमधील मध्य प्रदेश विधानसभाची त्यांनी रचना केली. १९६१ ते १९६६ च्या जवळपास त्यांनी मुंबईतील सोनमर्ग अपार्टमेंट बनवली जी त्यांची पहिली उंच इमारत होती. नवी दिल्लीतील राष्ट्रीय हस्तशिल्प आणि हथकरघा संग्रहालयच्या रचने मध्ये त्यांनी अंगणांचा व्यवस्थित वापर केला आणी आकाशाकडे उघडणाऱ्या खीडक्या सादर केल्या. जयपूर येथे स्थित जवाहर कला केंद्रात (१९८६ -१९९२), त्यांनी महाराज दुसरा जयसिंह ऊर्फ सवाई जयसिंहचे स्मारक उभारले आहे. नंतर, त्याने ब्रिटिश कलाकार हॉवर्ड हॉजकिनला दिल्ली येथे ब्रिटिश कौन्सिलच्या बाहेरील डिझाइनसाठी आमंत्रित केले.
१९७० ते १९७५ पर्यंत चार्ल्स कोरिया हे न्यू बॉम्बे (नवी मुंबई)चे मुख्य शिल्पकार होते. येथे त्यांनी नव्या शहराच्या विस्तृत शहरी नियोजनात प्रमुख कार्य केले आहे. १९८४ मध्ये, चार्ल्स कोरेया यांनी मुंबईत अर्बन डिझाईन रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना केली जी वातावरणाचे रक्षण आणि शहरी समुदायांच्या सुधारणेसाठी समर्पित होते. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या चार दशकांमध्ये, कोरियाने शहरी प्रश्न सोडवण्यात अग्रगण्य कार्य केले आहे आणि तृतीय विश्वात कमी खर्चाच्या निवारा उपल्बध करण्याचे प्रयत्न केले आहेत. १९८५ मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांना राष्ट्रीय नागरीकरण आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. २००५ पासून २००८ पर्यंत देईपर्यंत कोरिया हे दिल्ली अर्बन आर्ट कमिशनचे अध्यक्ष होते. मग त्यांनी तेथुन राजीनामा दिला. नंतर, चार्ल्स कॉरिया यांनी कॅनडाच्या टोरोंटोमधील नवीन इस्माइली सेंटरची रचना केली.
एका छोट्या आजाराने १६ जून २०१५ रोजी ८४व्या वर्षी त्यांचे मुंबईत निधन झाले. [४]
संदर्भ
संपादन- ^ An Architecture of Independence: The Making of Modern South Asia Archived 3 June 2009 at the Wayback Machine. University of Pennsylvania.
- ^ "Charles Correa". Encyclopædia Britannica. 5 March 2014 रोजी पाहिले.
- ^ Kazi Khaleed Ashraf, James Belluardo (1998), An Architecture of Independence: The Making of Modern South Asia, Architectural League of New York, p. 33, ISBN 09663-8560-8
- ^ "Architect Charles Correa dies at 84 | India News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया.