वास्तुविशारद
वास्तुविशारद (अन्य नावे: स्थपती ; इंग्लिश: Architect, आर्किटेक्ट ;) म्हणजे इमारतींच्या आराखड्याचे रेखन करून इमारतींचे स्वरूप कसे असावे, याचे नियोजन करणारा व्यावसायिक होय.
वास्तुविशारद हा इमारत बांधताना त्यात किती खोल्या असाव्यात, प्रत्येक खोलीचा उपयोग कसा करणार, त्यामुळे तिचा आकार किती असावा, उन्हाची, वाऱ्याची दिशा कोणती व त्याचा परिणाम काय असावा. वगैरे बाबींचा विचार करून आराखडा बनवतो. याशिवाय तो इमारतींच्या बाह्य आणि अंतर्गत सौंदर्याचा, इमारत बांधल्यानंतर पुढे तिच्यात वावरणाऱ्या माणसांच्या संभाव्य सवयी आणि शारीरिक हालचालींचाही (इर्गानॉमिक्स) विचार करतो.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत