एन.जी. रंगा
भारतीय राजकारणी
गोजिनेनी रंगा नायुकुलू (नोव्हेंबर ७, इ.स. १९०० - जून ९, इ.स. १९९५ ) (तेलुगू: ఎన్. జీ. రంగా ; रोमन लिपी: Gogineni Ranga nayukulu ;) हे तेलुगू, भारतीय राजकारणी होते. ते काँग्रेस पक्षाचे आंध्र प्रदेशातील ज्येष्ठ नेते होते. ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील तेनाली लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९८०, इ.स. १९८४ आणि इ.स. १९८९ सालांतील लोकसभा निवडणुकांमध्ये गुंटुर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. तसेच ते इ.स. १९६२ आणि इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील चित्तूर आणि श्रीकाकुलम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
राजकारण, समाजकारण या क्षेत्रांतील योगदानासाठी इ.स. १९९१ साली भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवले.
राजकीय कारकीर्दसंपादन करा
लोकसभा | कार्यकाळ | लोकसभा मतदारसंघ | पक्ष |
---|---|---|---|
२ री लोकसभा | इ.स. १९५७-१९६२ | तेनाली | काँग्रेस |
३ री लोकसभा | इ.स. १९६२-१९६७ | चित्तूर | स्वतंत्र पक्ष |
४ थी लोकसभा | इ.स. १९६७-१९७० | श्रीकाकुलम | स्वतंत्र पक्ष |
७ वी लोकसभा | इ.स. १९८०-१९८४ | गुंटूर | काँग्रेस(आय) |
८ वी लोकसभा | इ.स. १९८४-१९८९ | गुंटूर | काँग्रेस (आय) |
९ वी लोकसभा | इ.स. १९८९-१९९१ | गुंटूर | काँग्रेस (आय) |