साधना सरगम
साधना सरगम किंवा साधना घाणेकर [१](७ मार्च १९६९, दाभोळ) या एक भारतीय मराठी पार्श्वगायिका आहेत. त्यांनी तेलुगू, गुजराती, बंगाली आणि हिंदी चित्रपटांत पार्श्वगायन केले आहे.
साधना घाणेकर | |
---|---|
साधना सरगम | |
आयुष्य | |
जन्म | मार्च ७, इ.स. १९६२ |
जन्म स्थान | दाभोळ, महाराष्ट्र |
संगीत साधना | |
गायन प्रकार | चित्रपट संगीत, शास्त्रीय संगीत, भक्तिसंगीत, गझल |
संगीत कारकीर्द | |
कार्यक्षेत्र | पार्श्वगायन |
पार्श्वभूमी आणि सुरुवातीचे शिक्षण
संपादनत्यांची आई नीला घाणेकर या शास्त्रीय गायिका आणि संगीत शिक्षिका असल्यामुळे संगीताची पार्श्वभूमी त्यांना लाभलेली आहे. कल्याणजी-आनंदजी या संगीतकाराकांकडे संगीत संयोजक म्हणून काम करणारे अनिल मोहिले यांनी साधना यांचा या संगीतकार जोडीशी परिचय करून दिला.
साधना यांनी ‘पमपारारंपम बोले जीवन की सरगम’ या जे.पी. सिप्पी यांच्या ‘तृष्णा’ चित्रपटातील गाण्यासाठी त्यांनी १९७८ मध्ये कोरससाठी गायन केले. सवाई गंधर्व महोत्सवात सरगम यांनी वयाच्या चौथ्या वर्षी गायन केले. वयाच्या सहाव्या वर्षी ‘सूरज एक चंदा एक तारे अनेक’ या वसंत देसाई यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या दूरदर्शनवरील गाण्याचे गायन त्यांनी केले.
त्यांना दहाव्या वर्षी केंद्र सरकारची शिष्यवृत्ती मिळाली. आणि त्याद्वारे त्यांनी सात वर्षे पंडित जसराज यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. लहानपणापासूनच त्यांनी वसंत देसाई यांचे लघुपट, लहान मुलांचे चित्रपट आणि अनेक कार्यक्रमांसाठी गायन केले. देसाई यांनी साधना यांच्या आईला सल्ला दिला की शास्त्रीय आणि सुगम दोन्ही प्रकाचे गायन त्या उत्तम प्रकरे करू शकतील.त्यांची आई नीला घाणेकर या शास्त्रीय गायिका आणि संगीत शिक्षिका असल्यामुळे संगीताची पार्श्वभूमी त्यांना लाभलेली आहे. कल्याणजी-आनंदजी या संगीतकाराकांकडे संगीत संयोजक म्हणून काम करणारे अनिल मोहिले यांनी साधना यांचा या संगीतकार जोडीशी परिचय करून दिला.
साधना यांनी ‘पमपारारंपम बोले जीवन की सरगम’ या जे.पी. सिप्पी यांच्या ‘तृष्णा’ चित्रपटातील गाण्यासाठी त्यांनी १९७८ मध्ये कोरससाठी गायन केले. सवाई गंधर्व महोत्सवात सरगम यांनी वयाच्या चौथ्या वर्षी गायन केले. वयाच्या सहाव्या वर्षी ‘सूरज एक चंदा एक तारे अनेक’ या वसंत देसाई यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या दूरदर्शनवरील गाण्याचे गायन त्यांनी केले.
त्यांना दहाव्या वर्षी केंद्र सरकारची शिष्यवृत्ती मिळाली. आणि त्याद्वारे त्यांनी सात वर्षे पंडित जसराज यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. लहानपणापासूनच त्यांनी वसंत देसाई यांचे लघुपट, लहान मुलांचे चित्रपट आणि अनेक कार्यक्रमांसाठी गायन केले. देसाई यांनी साधना यांच्या आईला सल्ला दिला की शास्त्रीय आणि सुगम दोन्ही प्रकारचे गायन त्या उत्तम प्रकारे करू शकतील.
कारकीर्द
संपादनसरगम यांनी १५६४ चित्रपटांमध्ये १९३८ हिंदी गाणी गायली आहेत तर ५०० तामिळ चित्रपटांमध्ये १७११ गाणी गायली आहेत. त्यांनी १९९४-२०१५ या काळात २५०० बंगाली गीते गायली आहेत. त्यांनी मल्याळम भाषेत सुमारे ६००० गीते गायली आहेत. याशिवाय त्यांनी तमिळ, मराठी, ओरिया, कन्नड, गुजराती, नेपाळी आणि इतर अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांनी ३४ भारतीय भाषांमध्ये सुमारे १५,००० गाणी गायली आहेत. त्यांनी चित्रपटातील गीतांच्या बरोबरीनेच दूरचित्रवाणी मालिका, भक्तीसंगीत, पॉप संगीताचे अल्बम यासाठी गायन केले आहेत. दक्षिण भारतीय नसूनही दक्षिण भारतीय गाण्यासाठी राष्ट्रीय पारितोषिक त्यांना मिळाले आहे.
१९८२-१९९०
सरगम यांनी ‘कंकू पगली’ या गुजराती चित्रपटासाठी सर्वप्रथम पार्श्वगायन केले. ‘रुस्तम’ या चित्रपटातील ‘दूर नाही रहना’ हे त्यांचे पहिले हिंदी ध्वनिमुद्रित चित्रपटगीत होते. हा चित्रपट १९८५ मध्ये प्रदर्शित झाला. १९८२ मध्ये ‘विधाता’ चित्रपटासाठी ‘सात सहेलिया’ हे त्यांनी गायिलेले पहिले प्रदर्शित झालेले हिंदी गीत ठरले. ‘तकदीर’, ‘पिघालात आसमान’,’राजतिलक’, ‘करिश्मा कुदरत का’, ‘खुदगर्ज’, ‘खून भारी मांग’ यासारख्या अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. यानंतर त्यांनी अनु मलिक, आर.डी. बर्मन, आनंद-मिलिंद आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यासारख्या संगीत दिग्दर्शकांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. ‘जब कोई बात बिगड जाये’ (चित्रपट:जुर्म), ‘राधा बिना है किशन अकेला’ (चित्रपट: किशन कन्हैय्या), दरिया दिल चित्रपटातील गाण्यांनी त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली.[२]
१९८९ मधील ‘त्रिदेव’ चित्रपटातील (संगीत दिग्दर्शक: कल्याणजी आनंदजी, विजू शहा) त्यांची गाणीसुद्धा गाजली.
१९९०-२०००
या काळात त्यांनी नदीम-श्रवण, अन्नू मलिक, बप्पी लाहीरी इ. संगीत दिग्दर्शकांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले.
१९९२ मधील विश्वात्मा चित्रपटात त्यांनी गायन केले.
वॉटर चित्रपटासाठी त्यांनी ए. आर. रहमान यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायन केले.
पुरस्कार
संपादन- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका राष्ट्रीय पुरस्कार ‘अझागी’ चित्रपटातील गाण्यासाठी, संगीत दिग्दर्शक इलायराजा[३]
- ‘चुपके से लग जा गले’ या ‘साथिया’ चित्रपटातील गाण्यासाठी स्टार स्क्रीन पुरस्कार
- ‘आओ ना’ या गीतासाठी फिल्म फेअर, आयआयएफए, स्टार स्क्रीन, जीआयएफए, अप्सरा, झी सिने पुरस्कार
- मध्य प्रदेश सरकारचा ‘लता मंगेशकर’ पुरस्कार
- कोकण सह्याद्री स्वररत्न पुरस्कार
- दिनाकरन पुरस्कार (२०००)
महाराष्ट्र सरकार चित्रपट पुरस्कार
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – सारेच सज्जन चित्रपट (१९९३)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – मायेची सावली (१९९४)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका –जोडीदार चित्रपटातील क्षितिजावरील तारा या गीतासाठी (२०००)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – आधार (२००२)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – सरीवर सरी चित्रपटातील सांज झाली तरी या गीतासाठी (२००५)
बाह्य दुवे
संपादन
संदर्भ
संपादन- ^ "Singer Sadhana Sargam | About Sadhana Sargam - List of Sadhana Sargam Hindi Movies Songs and Lyrics". web.archive.org. रोजी मूळ पानापासून संग्रहित2010-04-13. 2019-11-09 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "Sadhana Sargam: Music has changed so much". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2019-11-09 रोजी पाहिले.
- ^ "BBC Asian Network - Weekend Gujarati, National Award-winning Indian playback singer Sadhana Sargam". BBC (इंग्रजी भाषेत). 2019-11-09 रोजी पाहिले.