एप्रिल ३०
दिनांक
एप्रिल ३० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२० वा किंवा लीप वर्षात १२१ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनपंधरावे शतक
संपादन- १४९२ - स्पेनची राणी इसाबेलाने क्रिस्तोबाल कोलंबोला भारताला जाण्याचा समुद्री रस्ता शोधण्यासाठी मुभा दिली.
सतरावे शतक
संपादन- १६५७ - शिवाजी महाराजांनी मोगलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नर शहरावर हल्ला करून ते लुटले.
अठरावे शतक
संपादन- १७८९ - जॉर्ज वॉशिंग्टनची अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्षपदी निवड.
एकोणिसावे शतक
संपादनविसावे शतक
संपादनया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
- १९३६: वर्ध्याजवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रम स्थापन केला.
- १९४५ : दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा पराभव अटळ झाल्यावर क्रूरकर्मा हिटलरची आत्महत्या. सोव्हिएत सैनिकांनी बर्लिन येथील जर्मन संसदेवर (राइशस्टॅग) विजयी झेंडा फडकावला.
- १९७५ : सायगाववर कम्युनिस्ट फौजांचा ताबा. व्हिएतनाम युद्धाची अखेर.
- १९७७: ९ राज्यांमधील विधानसभा बरखास्त झाली आणि जनसंघ, समाजवादी पक्ष, संघटना काँग्रेस आणि भारतीय लोकदल या पक्षांनी जनता पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
- १९८२: कलकत्त्यात बिजान सेतु हत्याकांड घडले.
- १९९३ : टेनिस खेळाडू मोनिका सेलेसवर चाकूहल्ला.
- १९९५: उत्तर आयर्लंडला भेट देणारे बिल क्लिंटन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.
- १९९६: थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या आवारातील श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या स्मृ्तिमंदिराचे उद्घाटन झाले.
एकविसावे शतक
संपादन- २००८ - रशियाच्या इकॅटेरिनबर्ग शहराजवळ सापडलेल्या अस्थि झारेविच अलेक्सेई निकोलाएविच आणि त्याच्या एका बहिणीच्या असल्याचे रशियाच्या शास्त्रज्ञांनी जाहीर केले.
- २००९ - क्रायस्लर कंपनीने दिवाळे काढले.
जन्म
संपादन- १६६२ - मेरी दुसरी, इंग्लंडची राणी.
- १७७७ - कार्ल फ्रीडरीश गाउस, जर्मन गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ.
- १८०३ - आल्ब्रेख्ट ग्राफ फॉन रून, प्रशियाचा पंतप्रधान.
- १८७० - धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके, भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक.
- १८९३ - होआकिम फॉन रिबेनट्रॉप, नाझी अधिकारी.
- १९०८ - ब्यार्नी बेनेडिक्ट्सन, आइसलॅंडचा पंतप्रधान.
- १९०९ - माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.
- १९०९ - जुलियाना, नेदरलँड्सची राणी.
- १९१० - श्रीरंगम श्रीनिवास ऊर्फ श्री श्री राव, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलुगू कवी आणि गीतकार.
- १९२६ - श्रीनिवास खळे, मराठी संगीतकार.
- १९३३ - विली नेल्सन, अमेरिकन संगीतकार.
- १९४६ - कार्ल सोळावा गुस्ताफ, स्वीडनचा राजा.
- १९४९ - ॲंतोनियो गुतेरेस, पोर्तुगालचा पंतप्रधान.
- १९५९ - स्टीवन हार्पर, कॅनडाचा पंतप्रधान.
- १९८७ - रोहित शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- ६५ - लुकान, रोमन कवी.
- १०३० - मोहंमद गझनी, गझनवी साम्राज्याचा शासक.
- १०६३ - रेन्झॉॅंग, चीनी सम्राट.
- १५६४ - पोप मार्सेलस दुसरा.
- १८७८ - स्वामीमहाराज अक्कलकोट, साक्षात्कारी सत्पुरुष व दत्तावतारी.
- १८८३ - एदुआर माने, चित्रकार.
- १९०० - केसी जोन्स, अमेरिकन रेल्वे अभियंता.
- १९१३ - मोरो केशव दामले, मराठी व्याकरणकार आणि निबंधकार.
- १९४५ - एडॉल्फ हिटलर, जर्मन हुकुमशहा.
- १९४५ - एव्हा ब्रॉन, अॅडॉल्फ हिटलरची सोबतीण.
- १९९५ - मॉॅंग मॉॅंग खा, म्यानमारचा पंतप्रधान.
- २००१ - श्रीपाद अच्युत दाभोळकर प्रयोग परिवार या संकल्पनेचे प्रवर्तक, गणितज्ञ आणि कृषी शास्त्रज्ञ.
- २००३ - वसंत पोतदार, मराठी साहित्यिक
- २०१२ - अचला सचदेव, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- २०१४ - खालिद चौधरी, भारतीय चित्रकार आणि चित्रपट नेपथ्य संकल्पक.
- २०२० - ऋषी कपूर, भारतीय चित्रपट अभिनेता.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- वालपर्जिस दिन - जर्मनी, मध्य व पश्चिम युरोप.
- राणीचा दिवस - नेदरलँड्स.
- मुक्ती दिन - व्हियेतनाम.
- बाल दिन - मेक्सिको.
- बालकामगार विरोधी दिन
- आंतरराष्ट्रीय जाझ संगीत दिन
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर एप्रिल ३० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल २८ - एप्रिल २९ - एप्रिल ३० - मे १ - मे २ - (एप्रिल महिना)