एप्रिल २५
दिनांक
एप्रिल २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ११५ वा किंवा लीप वर्षात ११६ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनसतरावे शतक
संपादन- १६०७ - ८० वर्षांचे युद्ध - नेदरलॅंड्सने जिब्राल्टरजवळ स्पेनचे आरमार बुडवले.
अठरावे शतक
संपादन- १७९२ - क्लॉड जोसेफ रूगे दि लिलने फ्रेंच राष्ट्रगीत ला मार्सेलची रचना केली.
एकोणिसावे शतक
संपादन- १८२९ - चार्ल्स फ्रीमॅन्टल पश्चिम ऑस्ट्रेलियाला पोचला.
- १८४६ - मेक्सिको व टेक्सासच्या प्रजासत्ताक मध्ये सीमावाद चिघळला. चकमकी सुरू.
- १८५९ - सुएझ कालव्याची पायाभरणी.
- १८६१ - एडविन रॉबर्ट अँडरसन सेलीग्मन यांचा जन्म.
- १८६२ - अमेरिकन यादवी युद्ध - उत्तरेने न्यू ऑर्लिअन्स जिंकले.
- १८९८ - अमेरिकेने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले.
विसावे शतक
संपादन- १९०१ - अमेरिकेतील न्यू यॉर्क राज्यात स्वयंचलित वाहनांना नंबरप्लेट लावणे सक्तीचे केले.
- १९१५ - पहिले महायुद्ध - ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंडचे सैन्य तुर्कस्तानमध्ये उतरले.
- १९२६ - ईराणमध्ये रझा शाह पहलवी सत्तेवर.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - मिलानमधून नाझींची हकालपट्टी.
- १९४६ - पत्री सरकारच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माफी.
- १९६१ - रॉबर्ट नॉईसला इंटिग्रेटेड सर्किटचे पेटंट देण्यात आले.
- १९६६ - ताश्कंद शहराचा भूकंपात मोठ्या प्रमाणावर विनाश.
- १९७२ - पोलरॉईड कंपनीने तात्काळ फोटो छापून देणारा एसएक्स-७० कॅमेरा विकण्यास सुरुवात केली.
- १९७४ - पोर्तुगालमध्ये जनतेचा उठाव. लोकशाही पुन्हा अमलात.
- १९८२ - रंगीत दूरचित्रवाणी प्रक्षेपणाची सुरुवात.
- १९८३ - अंतराळयान पायोनियर १० सूर्यमालेच्या पलीकडे पोचले.
- १९८६ - म्स्वाती तिसरा स्वाझीलँडच्या राजेपदी.
- १९८९ - श्रीलंकेच्या संसदेने भारतीय वंशाच्या ३,३०,००० तमिळ जनतेला मताधिकार दिला.
एकविसावे शतक
संपादन- २०००: वादग्रस्त आलमट्टी धरणाची उंची ५१९.६ मीटरपर्यंत वाढविण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली.
- २००५ - जपानच्या आमागासाकी शहराजवळ रेल्वे अपघात. १०७ ठार.
- २०१५ - नेपाळची राजधानी काठमांडू शहराजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.९ तीव्रतेचा धरणीकंप होउन ४,०००पेक्षा अधिक व्यक्ती मृत्युमुखी.
जन्म
संपादनया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
- ३२ - मार्कस साल्व्हियस ओथो, रोमन सम्राट.
- १२१४ - लुई नववा, फ्रांसचा राजा.
- १२२८ - कॉन्राड दुसरा, जर्मनीचा राजा.
- १२८४ - एडवर्ड दुसरा, इंग्लंडचा राजा.
- १५४५ - यी सुन शिन, कोरियन दर्यासारंग.
- १५९९ - ऑलिव्हर क्रॉमवेल, ब्रिटिश राजकारणी, अघोषित राजा.
- १८७४ - गुग्लियेमो मार्कोनी, इटलीचा संशोधक, भौतिकशास्त्रज्ञ.
- १९१८ - शाहू मोडक, हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते
- १९६१ - करण राझदान, अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक
- १९६१ - दिनेश डिसोझा, भारतीय-अमेरिकन पत्रकार आणि लेखक
- १९६४ - आर.पी.एन. सिंग, भारतीय राजकारणी
- १९८७ - अरिजीत सिंग, बॉलिवूड पार्श्वगायक
मृत्यू
संपादन- ११८५ - अंतोकु, जपानी सम्राट.
- १२९५ - सांचो चौथा, कॅस्टिलचा राजा.
- १३४२ - पोप बेनेडिक्ट बारावा.
- १६०५ - नरेस्वान, सयामचा राजा.
- १६४४ - चॉॅंगझेंग, चीनी सम्राट.
- १७०१-तापमानाचे एकक सुचवणारा आंदर्स सेल्सियस
- १८४० - सिमिओन-डेनिस पोइसॉन, फ्रेंच गणितज्ञ.
- १९६८ - बडे गुलाम अली खान, गायक व वीणावादक
- १९७४ - रामधारीसिंह दिनकर, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते
- २००२ - इंद्रा देवी, लाटव्हियाच्या योगशिक्षिका
- २००५ - रंगनाथानंद, भारतीय तत्त्वज्ञानी; अध्यक्ष, रामकृष्ण मिशन.
- २०२३ - प्रकाशसिंग बादल, पंजाबचे माजी मुख्यमंत्री
प्रतिवार्षिक पालन
संपादन- ऍन्झाक दिन - ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड.
- क्रांती दिन - पोर्तुगाल.
- फेस्ता देला लिबरेझियोन (स्वातंत्र्य दिन) - इटली.
- ध्वज दिन - फेरो द्वीपसमूह, स्वाझीलँड.
- जागतिक मलेरिया दिन
- डीएनए दिन
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर एप्रिल २५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल २३ - एप्रिल २४ - एप्रिल २५ - एप्रिल २६ - एप्रिल २७ - (एप्रिल महिना)