किंवा टर्की हा मध्यपूर्वेतील एक मोठा देश आहे. हा देश दोन खंडामध्ये (युरोपआशिया) विस्तारित आहे. अंकारा ही तुर्कस्तानची राजधानी आहे तर इस्तंबूल हे त्या देशातील सर्वात मोठे शहर आहे.

तुर्कस्तान
Türkiye Cumhuriyeti
तुर्कस्तानचे प्रजासत्ताक
तुर्कस्तान चा ध्वज
ध्वज
ब्रीद वाक्य: Egemenlik, kayıtsız şartsız Milletindir
राष्ट्रगीत: इस्तिक्लाल मार्सी
[[Image:|300px|center|तुर्कस्तानचे स्थान]]तुर्कस्तानचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी अंकारा
सर्वात मोठे शहर इस्तंबूल
अधिकृत भाषा तुर्की
सरकार सांसदीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख अब्दुल्ला गुल
 - पंतप्रधान रेजेप ताय्यिब एर्दोगान
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ऑगस्ट ३०, १९२२ 
 - प्रजासत्ताक दिन ऑक्टोबर २९, १९२३ 
क्षेत्रफळ
 - एकूण ७,८३,५६२ किमी (३७वा क्रमांक)
 - पाणी (%) १.३
लोकसंख्या
 - २००९ ७,२५,६१,३१२ (१८वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ९२.६/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ६१० अब्ज अमेरिकन डॉलर (१९वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ८,३८५ अमेरिकन डॉलर (७५वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.८०६[१] (उच्च) (७९वा) (२००७)
राष्ट्रीय चलन नवा तुर्की लिरा (TRY)
आंतरराष्ट्रीय कालविभाग पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (EET) (यूटीसी+२)
आय.एस.ओ. ३१६६-१ TR
आंतरजाल प्रत्यय .tr
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ९०
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

इतिहास संपादन

नावाची व्युत्पत्ती संपादन

तुर्कस्तानचे नाव, तुर्की भाषेमध्ये Türkiye (तुर्किए) यावचे दोन अर्थ होऊ शकतात: १. 'तुर्क' याचा अर्थ जुन्या तुर्की भाषेमधे शक्तिशाली असा होतो. २. तुर्कस्तानच्या नावाची फोड तुर्कि-एन आहे. त्याचा अर्थ : तुर्की म्हणजे तुर्की लोक, एन म्हणजे त्यांच्या मालकीचे आहे असा होतो. यावरून तुर्कस्तानला हे नाव पडले असावे.

प्रागैतिहासिक कालखंड संपादन

मध्यकालीन इतिहास संपादन

अर्वाचीन इतिहास संपादन

भूगोल संपादन

तुर्कस्तान नैर्ऋत्य आशियातील अनातोलियाच्या द्वीपकल्पावर पसरलेला आहे. या देशाचा थोडासा भाग आग्नेय युरोपमध्येही आहे.

चतुःसीमा संपादन

तुर्कस्तानच्या वायव्येस बल्गेरिया, पश्चिमेस ग्रीस, ईशान्येस जॉर्जिया, आर्मेनियाअझरबैजान तर पूर्वेस इराण आणि आग्नेयेस इराकसीरिया हे देश आहेत. तुर्कस्तानच्या दक्षिणेस भूमध्य समुद्र, पश्चिमेस एजियन समुद्र व उत्तरेस काळा समुद्र आहे. मार्मराचा समुद्र तुर्कस्तानच्या आशियाई व युरोपीय भागांच्या मध्ये आहे.

राजकीय विभाग संपादन

तुर्कस्तानमध्ये ८१ प्रांत आहेत. प्रत्येक प्रांत अनेक जिल्ह्यांमध्ये विभागलेला आहे. तुर्कस्तानमध्ये असे एकूण ९२३ जिल्हे आहेत.

या ८१ प्रांतांची ७ विभागात विभागणी केलेली आहे परंतु हे विभाग फक्त जनगणनेच्या सोयीसाठी केलेले आहेत.

मोठी शहरे संपादन

शहर वस्ती
इस्तंबूल ९०,८५,५९९
अंकारा ३५,४०,५२२
इझ्मिर २७,३२,६६९
बर्सा १६,३०,९४०
अदना १३,९७,८५३
कोन्या १२,९४,८१७
गाझियान्टेप १०,०९,१२६
अंताल्या ९,३६,३३०

समाजव्यवस्था संपादन

वस्तीविभागणी संपादन

२००८ च्या गणनेनुसार तुर्कस्तानची वस्ती ७ कोटी १५ लाख इतकी होती. याचा वृद्धीदर वार्षिक १.३१% इतका आहे. येथील लोकसंख्या घनता ९२ व्यक्ती प्रती किमी आहे. ७०.५% तुर्कस्तानी शहरांतून राहतात. तुर्कस्तानचे ६६.५% नागरिक १५-६४ वर्षे वयोगटात मोडतात तर २६.४% व्यक्ती ०-१४ वर्षे वयोगटात आहेत. ७.१% व्यक्ती ६५ किंवा अधिक वयाच्या आहेत.[२][३]

धर्म संपादन

शिक्षण संपादन

संस्कृती संपादन

राजकारण संपादन


अर्थतंत्र संपादन

पर्यटन संपादन

गेल्या काही वर्षात तुर्कस्तान पर्यटनासाठी प्रसिद्ध होत आहे. देशाला लाभलेला प्राचीन इतिहास व त्याच्याशी निगडित ऐतिहासिक स्थळे या देशात आहेत. इस्तंबूल शहराला सर्वात जास्त पर्यटक भेट देतात. प्राचीन ग्रीक-रोमन, सुरुवातीचे ख्रिस्ती समाज, बायझंटाईन ख्रिस्ती, ऑटोमन इस्लामी व आधुनिक कमाल अतातुर्क यांचा नवा आधुनिक तुर्की यांची सरमिसळ झालेली संस्कृती येथे पहावयास मिळते. तसेच अत्यंत वैविध्यपूर्ण भौगोलिक परिस्थितीमुळे अनेक भौगोलिक प्रेक्षणीय स्थळेही या देशात आहेत. वैविध्यपूर्ण भूमध्यसमुद्रीय हवामानामुळे युरोपातील असंख्य पर्यटकांना तुर्कस्तानचे आकर्षण असते.

इस्तंबूल हे सर्वाधिक पर्यटकांचे भेट देण्याचे शहर आहे. इस्तंबूल शहर हे प्राचीन कॉन्स्टॅंटिनोपल या नावाने ओळखले जाई व या शहराला दोन हजार वर्षांपेक्षा जास्ती इतिहास लाभलेला आहे. हे शहर १००० वर्षे बायझंटाईन साम्राज्याची राजधानी व नंतर ऑटोमन साम्राज्याची राजधानी होते. त्यामुळे बायझंटाईन व इस्लामी स्थापत्याची सरमिसळ येथे दिसून येते. अय्यासोफिया, निळी मशीद, शाही बाझार व टोपकापीचा राजवाडा ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत.

 
इफेसूस मधील सेल्सुजचे ग्रंथालय

तुर्कस्तानचा पश्चिम किनारा हा प्राचीन काळी प्रामुख्याने ग्रीक अधिपत्याखाली होता. त्यामुळे अनेक प्राचीन ग्रीक शहरे या किनाऱ्यालगत आहेत. ट्रॉयच्या लढाईमुळे इतिहासात अजरामर झालेल्या ट्रॉय शहराच्या खाणाखुणा आजही दिसतात. पुरातत्त्व खात्याने शोधलेली अनेक शहरे आज पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनली आहेत. कुसादासी शहराजवळील प्राचीन इफेसूस हे प्राचीन शहर हे सर्वात मोठे आकर्षण आहे. प्राचीन जगतातील एक आश्चर्य आर्टेमिसच्या देवळाचे भग्नावशेष या शहराजवळ पहायला मिळतात. इफेसूसचे प्राचीन शहर हे सेल्सुजच्या ग्रंथालयासाठी व प्रचंड मोठ्या ग्रीक थिएटरसाठी तसेच येशू ख्रिस्ताच्या आईच्या उत्तर आयुष्यातील निवासस्थानासाठी प्रसिद्ध आहे. तुर्कस्तानच्या पश्चिम किनाऱ्यावरील इतर प्रसिद्ध स्थळांमध्ये पेरॉगमन, डिडिमा, अंतल्या इत्यादी प्रसिद्ध स्थळे आहेत.

अंकारा ही देशाची राजधानी पर्यटनाच्या दृष्टीने फारशी प्रसिद्ध नाही, परंतु मध्य व पूर्व तुर्कस्तानमधील स्थळांकडे जाण्यास येथूनच जावे लागते. त्यामुळे पर्यटक येथे भेट देतात. कमाल अतातुर्क यांनी एका छोट्या शहराला राजधानी बनवून त्याचे महत्त्व वाढवले.

खेळ संपादन

चित्रदालन संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ [१] Archived 2009-11-22 at the Wayback Machine. Human Development Report 2009
  2. ^ Turkish Statistical Institute. "2007 Census, population statistics in 2007". 2008-01-21 रोजी पाहिले.
  3. ^ Intute. "Turkey - Population and Demographics". 2006-12-10 रोजी पाहिले.