अंकारा

तुर्कीची राजधानी


अंकारा तुर्कस्तानची राजधानी व प्रमुख शहर आहे. हे शहर तुर्कस्थानमधील इस्तंबुल नंतरचे द्वितीय क्रमांकाचे शहर आहे. ते ९३८ मीटर उंचीवर वसलेले आहे.[] २००८ मध्ये या शहराची लोकसंख्या ४,५००,००० होती. ख्रिस्तपूर्व १३०० मध्ये त्याचे नाव अंकुवश होते. अंगोरा जातीच्या लोकरीवरून शहाराचे नाव पडले अशाही कथा प्रचलित आहेत.

अंकारा
Ankara
तुर्कस्तान देशाची राजधानी


अंकारा is located in तुर्कस्तान
अंकारा
अंकारा
अंकाराचे तुर्कस्तानमधील स्थान

गुणक: 39°52′N 32°52′E / 39.867°N 32.867°E / 39.867; 32.867

देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
प्रांत अंकारा
क्षेत्रफळ २,५१६ चौ. किमी (९७१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३,०८०.०० फूट (९३८.७८ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३७,६३,५९१
http://www.ankara.bel.tr/

इतिहास

संपादन

इ.स.पू. एक हजार च्या सुमारास या भागावर एक प्रसिद्ध राजा मिडास याच्या जमातीचा अंमल सुरू झाला. त्यानंतर काही वर्षे पर्शियन (आजचा इराण) राजांनी शहरावर राज्य केले. त्यानंतर इ.स.पू. ३३३ मध्ये अलक्षेंद्र याने या राजांचा पराभव करून शहर घेतले. पण हे फार टिकले नाही. इ.स.पू. २५ मध्ये रोमन साम्राज्याचा राजा ऑगस्टस याने शहर काबीज करून आपल्या साम्राज्यात सामील केले.नजिक च्या इतिहासात मुस्तफा पाशा यांच्या नेतृत्वाखाली तुर्की सैन्याने आक्रमकांचा पराभव करून इ.स १९२३ मध्ये युद्ध जिंकले. मुस्तफा केमाल पाशा स्वतंत्र तुर्कस्थानचे अध्यक्ष अंकरा येथे बनले.

आधुनिक

संपादन

अंकरा शहराची लोकसंख्या तुर्कस्थानातील द्वितिय क्रमांकाची आहे.

संदर्भ

संपादन