कथा

साहित्यातील महत्त्वपूर्ण प्रकार

कथा हा साहित्यातला महत्त्वाचा प्रकार आहे. 'एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एका दृष्टिकोनातून केलेले चित्रण म्हणजे लघुकथा' अशी एक व्याख्या मराठी विश्वकोश, खंड ३ मध्ये करण्यात आली आहे. तसेच 'कमीत कमी पात्रे आणि कमीत कमी प्रसंग वापरून थोड्या वेळात परिणामकारक रीतीने सांगितलेली व ऐकणाऱ्याच्या मनावर एकच ठसा उमटविणारी हकिकत म्हणजे लघुकथा होय' अशी व्याख्या ना. सी. फडके यांनी केली आहे.[] इंदुमती शेवडे यांनी 'एकात्म अशा कथात्म अनुभवाची अर्थपूर्ण् संघटना म्हणजे कथा' अशी व्याख्या केली आहे. तर वा. ना. देशपांडे यांनी ' कुशल चित्रकार कुंचल्याच्या चार दोन फटक्यात संपूर्ण चित्र तयार करतो, तसेच या लघुकथा प्रकाराचेही आहे' अशी व्याख्या केली आहे.[] लघुकथा या मानवी जीवन आणि सामाजिक स्थिति यांची सांगड घालून मानवी मूल्यांना स्पष्ट करण्याचे काम करतात. उदा. आनंद यादवांची 'पाटी आणि पोळी' व बाबूराव बागलांची 'सूड' ह्या कथा तत्कालीन समाजाच्या सामाजिक मानसिकतेचे प्रतिनिधित्व करतात.

प्रसिद्ध कथालेखक :

लघुकथा उदाहरण

संपादन

एक समाजसेवक वृद्धाश्रमात देणगी देण्यासाठी गेले होते. आश्रम चालकांनी त्यांना कांही वृद्धांशी संवाद साधण्याची संधी दिली. समाजसेवक प्रत्येकाला पूर्वायुष्याबद्दल प्रश्न विचारत होते. वृद्ध मंडळीही त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलू लागली, कारण बऱ्याच दिवसांनी कोणीतरी त्यांची आपुलकीने चौकशी करत होते. त्यांनी एका वृद्धेला प्रश्न विचारला आजीबाई तुम्हांला मुलंबाळं आहेत का? ती म्हणाली, "हो आहेतना मुलंबाळं, म्हणूनच मी इथे दाखल झाले आहे".[]

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ संपादक: डॉ. शिरीष लांडगे,, डॉ. दिलीप पवार, डॉ. संदीप सांगळे (२०१९). समकालीन मराठी कथा. पुणे: अक्षरबंध प्रकाशन. pp. 6–7. ISBN 978-93-83362-13-4.CS1 maint: extra punctuation (link)
  2. ^ संपा. शिरीष लांडगे, दिलीप पवार आणि संदीप सांगळे (2019). समकालीन मराठी कथा. पुणे: अक्षरबंध प्रकाशन. pp. पान क्रमांक ७. ISBN 978-93-83362-13-4.
  3. ^ Tamboli, Dr Jyubeda (2020-07-26). "डॉ. ज्युबेदा तांबोळी ब्लॉग: मराठी लघुकथा संच - १". डॉ. ज्युबेदा तांबोळी ब्लॉग. 2020-08-25 रोजी पाहिले.