शंकर पाटील
मराठी कथाकार
शंकर पाटील (८ ऑगस्ट, १९२६:पट्टण-कोडोली, हातकणंगले तालुका, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत - १८ ऑक्टोबर , इ.स. १९९४) हे मराठी कथाकार होते.
शंकर पाटील | |
---|---|
जन्म नाव | शंकर बाबाजी पाटील |
जन्म |
८ ऑगस्ट, १९२६ पट्टण-कोडोली, हातकणंगले तालुका, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू | १८ ऑक्टोबर , इ.स. १९९४ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य, शिक्षण |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कादंबरी, कथा, कथाकथन, वगनाट्य |
जीवन
संपादनपाटलांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात पट्टण-कोडोली गावी झाला. त्यांचे शिक्षण गडहिंग्लज व कोल्हापूर येथे झाले. कोल्हापुरातील विद्यापीठातून त्यांनी बी.ए.बी.टी.पर्यंत शिकले. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळात मराठी विषयासाठी विशेष अधिकारी म्हणून काम केले. इ.स. १९८५ सालातील नांदेड येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
प्रकाशित साहित्य
संपादनकादंबऱ्या व कथासंग्रह
संपादन- आभाळ (इ.स. १९६१)
- ऊन (इ.स. १९६३)
- खुशखरेदी
- खुळ्याची चावडी (इ.स. १९६४)
- खेळखंडोबा (इ.स. १९७४)
- जुगलबंदी
- टारफुला (कादंबरी)
- धिंड (इ.स. १९६२)]
- पाऊलवाटा
- पाटलांची चंची
- बंधारा
- भेटीगाठी (इ.स. १९६०)
- वळीव (इ.स. १९५८)
- वावरी (इ.स. १९६३)
- श्रीगणेशा
- ताजमहालमध्ये सरपंच
पटकथा
संपादन- एक गाव बारा भानगडी
- गणगौळण
- युगे युगे मी वाट पाहिली
- वावटळ
- पाहुणी
- पिंजरा
- भुजंग
- भोळीभाबडी
- असला नवरा नको गं बाई !