अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
![]() |
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी साहित्यप्रेमी जनतेचा एक आनंदाचा उत्सव असतो.
इतिहाससंपादन करा
१८६५ साली न्या.रानडे यांनी मराठीत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचा आढावा घेतलेला दिसतो. त्यानुसार ४३१ गद्य आणि २३० पद्य पुस्तकांची निर्मिती झाल्याचे दिसते. ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने, तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने न्या.रानडेयांनी लोकहितवादींच्या सहकार्याने १८७८च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञान प्रकाश (फेब्रुवारी ७ १८७८) मधे प्रसिद्ध झाले आणि या आवाहनानुसार मे ११ १८७८ रोजी सायंकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. याला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजले जाते. या संमेलनाचे अध्यक्ष पद न्या.रानडे यांनीच भूषविले.
दुसरे ग्रंथकार संमेलन १८८५ साली पुण्यातच भरले. या संमेलनाला पहिल्याच्या मानाने चांगली म्हणजे शे-सव्वाशे नामवंत ग्रंथकारांनी उपस्थिती लावली होती. मे २१ १८८५ रविवार, दुपारी ४ वाजता पुणे सार्वजनिक सभेच्या (दाणे आळी, बुधवार पेठ) जोशी हॉलमध्ये भरले होते. या नंतर जवळ जवळ वीस वर्षांनी तिसरे ग्रंथकार संमेलन १९०५ च्या मे महिन्यात सातारा येथे भरले. लो.टिळकांचे एक सहकारी साताऱ्यातले सुप्रसिद्ध वकील र.पां.ऊर्फ दादासाहेब करंदीकर हे संमेलनाचे अध्यक्ष होते. २३ मे च्या केसरीत या संमेलनाचा त्रोटक वृत्तान्त प्रसिद्ध झाला होता. साताऱ्याचा पाठोपाठ चौथे ग्रंथकार संमेलन पुणे येथे २७-२८ मे १९०६ शनिवार, रविवार यां दिवशी सदाशिव पेठेत नागनाथपाराजवळच्या मयेकर वाड्यात भरले होते. हे संमेलन आधीच्या संमेलनांपेक्षा जास्त यशस्वी व विधायक स्वरूपाचे झाले. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी, ग्रंथकार आणि भाषांतरकार गोविंद वासुदेव कानिटकर होते. त्या वेळची अनेक मान्यवर ग्रंथकार मंडळी संमेलनासाठी एकत्र आलेली होती. निबंध वाचन, भाषणे, ठराव यामुळे संमेलन दोन दिवस गाजले.[१]
साहित्य संमेलनांचे अध्यक्षसंपादन करा
अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत महामंडळाने ३६ साहित्य संमेलने घेतली असून महाबळेश्वर येथे होत असलेले साहित्य संमेलन, ते भरवत असलेले ३७ वे साहित्य संमेलन होय. महामंडळ अस्तित्वात येण्यापूर्वी कुसुमावती देशपांडे या एकच लेखिका अध्यक्ष झालेल्या होत्या. महामंडळाच्या स्थापनेनंतर दुर्गा भागवत, शांता शेळके,विजया राजाध्यक्ष,अरुणा ढेरे या चार लेखिका अध्यक्ष झालेल्या आहेत. तसेच शंकरराव खरात आणि केशव मेश्राम लेखक आणि यू.म. पठाण हे लेखक अध्यक्ष झालेले आहेत.
अरुणा ढेरे या भावी साहित्य (९२ व्या) संमेलनाच्या अध्यक्षा आहेत. (२८-१०-२०१८ च्या घोषणेनुसार)
राज्य मराठी विकास संस्थेचे निमंत्रित सदस्यसंपादन करा
अ. भा. मराठी साहित्य महामंडळातर्फे भरणारे साहित्य संमेलन, अ. भा. मराठी नाट्य परिषदेतर्फे भरणारे नाट्य संमेलन व मराठी विज्ञान परिषदेतर्फे भरणारे विज्ञान संमेलन या तिन्ही संमेलनाचे अध्यक्ष हे राज्य मराठी विकास संस्थेचे विशेष निमंत्रित सदस्य असतात
८४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनसंपादन करा
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळा तर्फे भरवले जाणारे ८४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाण्यात २५, २६, २७ डिसेंबर 2011 या तारखांना झाले. .दादोजी कोंडदेव स्टेडियम आणि गडकरी रंगायतन या नियोजित ठिकाणी संमेलनाचे कार्यक्रम झाले. मराठी ग्रंथसंग्रहालय (ठाणे) ही या ८४ व्या साहित्य संमेलनाची यजमान संस्था होती व उत्तम कांबळे हे या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. [२]
८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनसंपादन करा
८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चिपळूण येथे ११ ते १३ जानेवारी इ.स. २०१३ दरम्यान झाले. हे लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने आयोजित केले होते. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले होते.
८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनसंपादन करा
८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सासवड येथे ३ ते ५ जानेवारी इ.स. २०१४ दरम्यान झाले. हे आचार्य विकास प्रतिष्ठान व महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा सासवडने आयोजित केलेले आहे. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक फ.मुं. शिंदे होते.
८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनसंपादन करा
८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमान (पंजाब) येथे ३ ते ५ एप्रिल इ.स. २०१५ दरम्यान झाले. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे होते. [३] [४]
या घुमानच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाश पायगुडे यांनी घुमान, पंजाब, शीख धर्म आणि या साऱ्या पार्श्वभूमीचा आढावा ’साहित्य वारी’ नावाच्या पुस्तकात घेतला आहे. पुस्तकात प्रारंभी नामदेवांच्या कार्याची ओळख करून दिली आहे. त्यानंतर घुमान आणि नामदेव यांचा परस्पर संबंध उलगडून दाखवला आहे. बाबा नामदेव असे संबोधले जाणारे संत नामदेव कसे होते याची माहिती दिली आहे. शीख धर्म, त्यांचे दहा गुरू आणि पंजाब यांची माहिती या पुस्तकातील एका स्वतंत्र प्रकरणामधून मिळते.
आजवरची साहित्य संमेलने, संमेलनांचे अध्यक्ष यांच्या माहितीचा समावेशही पुस्तकात करण्यात आला आहे. पुस्तकाला घुमान संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांची प्रस्तावना लाभली आहे. पुस्तक प्रकाशक - संगत प्रकाशन (नांदेड)
८९वे अखिल भारतीय संमेलनसंपादन करा
हे १५ ते १८ जानेवारी २०१६ या काळात पिंपरी(-चिंचवड) येथे झाले डॉ. श्रीपाल सबनीस हे संमेलनाध्यक्ष होते.
९०वे साहित्य संमेलनसंपादन करा
हे ३ ते ५ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत डोंबिवली येथे झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे होते. [५]
९१वे साहित्य संमेलनसंपादन करा
हे संमेलन बडोदा येथे १६ ते १८ फेब्रुवारी २०१८ दरम्यान झाले. यापूर्वी १९०९ मध्ये सातवे संमेलन, १९२१ मध्ये अकरावे संमेलन आणि १९३४ मध्ये विसावे संमेलन बडोद्यात झाले होते. सेवानिवृत्त आयएएस अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख हे संमेलनाध्यक्ष होते.
९२वे साहित्य संमेलनसंपादन करा
११ ते १३ जानेवारी २०१९ या काळात यवतमाळमध्ये ९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. अरुणा ढेरे संमेलनाध्यक्षा होत्या.
यवतमाळमध्ये यापूर्वी १९७३मध्ये जेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते, त्यावेळी ग. दि. माडगूळकर त्या संमलेनाचे अध्यक्ष होते.
९३वे साहित्य संमेलनसंपादन करा
हे संमेलन ११, १२, १३ जानेवारी २०२० या काळात उस्मानाबाद येथे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे संमेलनाध्यक्ष.
९४वे साहित्य संमेलनसंपादन करा
हे संमेलन नाशिक नगरीत २६ ते २८ मार्च २०२१ या काळात होणार होते. अध्यक्ष - जयंत नारळीकर......कोविदच्या उपद्रवामुळे हे संमेलन पुढे ढकलण्यात आले आहे; आता ते कदाचित मे २०२१ मध्ये होईल. हे मुख्य साहित्य संमेलन पुढे गेल्यामुळे याला विरोध म्हणून होणारे विद्रोही साहित्य संमेलनही रद्द झाले आहे.
मराठी साहित्य संमेलनेसंपादन करा
संदर्भसंपादन करा
- ^ http://www.masapaonline.org/node/1
- ^ Google's cache of http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6076870.cms. It is a snapshot of the page as it appeared on 28 Aug 2010 23:49:10 GMT.
- ^ "डॉ. सदानंद मोरे". डॉ. सदानंद मोरे.
- ^ http://www.sahityasammelanghuman.org/
- ^ December 11, P. T. I.; December 11, 2016UPDATED:; Ist, 2016 16:40. "Writer Akshaykumar Kale elected Marathi literary meet Prez". India Today.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ "न्या. महादेव गोविंद रानडे | Maayboli". www.maayboli.com.