शांता शेळके

मराठी कवयित्री आणि गीतकार

शांता शेळके (ऑक्टोबर १२, १९२२ - जून ६, २००२) या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, संगीतकार, लेखिका, अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि पत्रकार होत्या.

शांता शेळके
जन्म ऑक्टोबर १२, १९२२
इंदापूर (पुणे जिल्हा), महाराष्ट्र, भारत
मृत्यू जून ६, २००२
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, पत्रकारिता, राजकारण, चित्रपट, शिक्षण
भाषा मराठी
साहित्य प्रकार

कथा, कादंबरी, कविता,

चरित्र लेखन, वृत्तपत्रांत सदरलेखन
वडील जनार्दन शेळके

शांता शेळके यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९२२ साली पुणे जिल्ह्यातील इंदापूर गावी झाला, व शिक्षण पुण्यात (हुजूरपागा शाळा व स.प. महाविद्यालय येथे) झाले. आचार्य अत्र्यांच्या "नवयुग’ मध्ये ५ वर्षे उपसंपादक राहिल्यानंतर त्यांनी नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालय, तसेच मुंबईतील रुईया व महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले. आळंदी येथे १९९६ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.

अनुवादक, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका म्हणूनही शांता शेळके यांनी साहित्यात मोलाची भर घातली आहे [१]. शांता शेळके या केंद्रीय फिल्म प्रमाण मंडळाच्या, तसेच राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्य होत्या. शांताबाईंनी डॉ. वसंत अवसरे या टोपण नावाने देखील गीते लिहिली. [२] ६ जून २००२ रोजी ७९ व्या वर्षी शांता शेळके यांचे निधन झाले.

प्रकाशित साहित्य

संपादन
नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अंगतपंगत मेहता प्रकाशन
अनोळख[१] मेहता प्रकाशन
अलौकिक उत्कर्ष प्रकाशन
आतला आनंद ललित लेखसंग्रह सुरेश एजन्सी
आंधळी अनुवाद (हेलन केलरच्या चरित्राचा) मेहता प्रकाशन
आंधळ्याचे डोळे मेहता प्रकाशन
इतस्ततः उत्कर्ष प्रकाशन
इतार्थ मेहता प्रकाशन
एक गाणे चुलीचे काव्यसंग्रह स्नेहवर्धन प्रकाशन
कविता विसावया शतकाची काव्यसंग्रह उत्कर्ष प्रकाशन
कविता स्मरणातल्या काव्यसंग्रह मेहता प्रकाशन
कळ्यांचे दिवस फुलांच्या राती सुरेश एजन्सी
काही जवळ काही दूर
किनारे मनाचे मेहता प्रकाशन
गोंदण काव्यसंग्रह मेहता प्रकाशन
चौघीजणी अनुवाद (लिटल विमेन, गुड वाइव्ह्‌ज) मेहता प्रकाशन
जन्मजान्हवी काव्यसंग्रह
जाणता अजाणता उत्कर्ष प्रकाशन
तोच चंद्रमा काव्यसंग्रह सुरेश एजन्सी
त्रिवेणी : गुलजार मेहता प्रकाशन
धूळपाटी ललित / आत्मकथन [३] सुरेश एजन्सी
नक्षत्रचित्रे व्यक्तिचित्रे सुरेश एजन्सी
निवडक शांता शेळके काव्यसंग्रह उत्कर्ष प्रकाशन
पत्रम्‌ पुष्पम्‌ ज्ञानदा पब्लिकेशन्स
पावसाआधीचा पाऊस ललित मेहता प्रकाशन
[[पूर्वसं

ध्या]] || काव्यसंग्रह|| मेहता प्रकाशन ||

बासरी
मधुसंचय परचुरे प्रकाशन
मनातले घर
मेघदूत अनुवाद मेहता प्रकाशन
रंगरेषा ।।।।।।
रूपसी काव्यसंग्रह
रेशीमरेघा मेहता प्रकाशन
ललित नभी मेघ चार ज्ञानदा पब्लिकेशन्स
लेकुरवाळी उत्कर्ष प्रकाशन
वडीलधारी माणसं ललित सुरेश एजन्सी
वर्षा मेहता प्रकाशन
शांतस्मरण मधुश्री प्रकाशन
श्रावण शिवरा उत्कर्ष प्रकाशन
सतीचा वाडा उत्कर्ष प्रकाशन
संस्मरणे ललित
सांगावेसे वाटले म्हणून मेहता प्रकाशन
सुवर्णमुद्रा मेहता प्रकाशन

प्रसिद्ध गीते

संपादन
 • अजब सोहळा
 • अपर्णा तप करिते काननी
 • अशीच अवचित भेटून जा
 • असता समीप दोघे हे
 • असेन मी नसेन मी
 • अहो जाई क्ईच्या फुला
 • आई बघना कसा हा
 • आज चांदणे उन्हात हसले
 • आज मी आळविते केदार
 • आज मी निराधार एकला
 • आज सुगंध आला लहरत
 • आधार जिवा
 • आला पाऊस मातीच्या वासात
 • आली सखी आली प्रियामीलना
 • आले वयात मी बाळपणाची
 • ऋतु हिरवा, ऋतु बरवा
 • एक एक विरते तारा
 • कर आता गाई गाई
 • कशि गौळण राधा
 • कशी कसरत दावतुया न्यारी
 • कळले तुला काही
 • कळ्यांचे दिवस फुलांच्या
 • का धरिला परदेश
 • काटा रुते कुणाला
 • कान्हू घेउन जाय
 • काय आणितोसी वेड्या
 • काय बाई सांगू
 • किलबिल किलबिल पक्षि
 • कुणीतरी सांगा हो सजणा
 • खोडी माझी काढाल तर
 • गगना गंध आला
 • गजानना श्री गणराया
 • गणराज रंगी नाचतो
 • गाव असानी माणसं अशी
 • गीत होऊन आले सुख माझे
 • गोंडा फुटला दिसाचा
 • घन रानी साजणा
 • घरपरतीच्या वाटेवरती
 • चंद्र दोन उगवले
 • चांदणं टिपूर हलतो वारा
 • चांदण्या रात्रीतले ते
 • चित्र तुझे हे सजीव होऊन
 • छेडियल्या तारा
 • जय शारदे वागीश्वरी
 • जा जा रानीच्या पाखरा
 • जा जा जा रे नको बोलु
 • जाईन विचारित रानफुला
 • जायचे इथून दूर
 • जिवलगा राहिले रे दूर
 • जीवनगाणे गातच रहावे
 • जे वेड मजला लागले
 • जो जो गाई कर अंगाई
 • झाला साखरपुडा गं बाई
 • झुलतो झुला जाई आभाळा
 • टप टप टप टाकित टापा
 • डोळ्यांत वाकुन बघतोस
 • तळमळतो मी इथे तुझ्याविण
 • तुझा गे नितनूतन सहवास
 • तुझा सहवास
 • तुझी सूरत मनात राया
 • तुला न कळले मला न
 • तू नसता मजसंगे वाट
 • तू येता सखि माझ्या
 • तोच चंद्रमा नभात
 • दशदिशांस पुसतो
 • दाटतो हृदयी उमाळा
 • दाटून कंठ येतो
 • दिवस आजचा असाच गेला
 • दिसते मजला सुखचित्र
 • दुःख हे माझे मला
 • दूर कुठे चंदनाचे बन
 • दैव किती अविचारी
 • नको रे नंदलाला
 • ना नाना नाही नाही
 • ना मानो गो तो दूँगी
 • निळ्या अभाळी कातरवेळी
 • नाही येथे कुणी कुणाचा
 • पप्पा सांगा कुणाचे
 • पहा टाकले पुसुनी डोळे
 • पाऊस आला वारा आला
 • पाखरा गीत नको गाऊ
 • पायावरी प्रियाच्या सर्वस्व
 • पालखी हाले डुले
 • पावनेर गं मायेला करू
 • पुनवेचा चंद्रम आला
 • प्राणविसावा लहरि सजण
 • प्रीतफुले माझी सोनेरी
 • प्रीति जडली तुझ्यावरी
 • बहरून ये अणुअणू
 • बाळ गुणी तू कर अंगाई
 • बाळा माझ्या नीज ना
 • बोल बोलना साजणा
 • मध्यरात्रिला पडे तिच्या
 • मनाच्या धुंदीत लहरीत
 • मराठी पाउल पडते पुढे
 • मला आणा एक हिऱ्यांची
 • मागते मन एक काही
 • मागे उभा मंगेश
 • माजे रानी माजे मोगा
 • माजो लवताय डावा डोळा
 • माज्या मुखार गर्भच्छाया
 • माज्या सारंगा राजा
 • माझी न मी राहिले
 • माझ्या मना रे ऐक जरा
 • माझ्या मायेच्या माहेरा
 • माणुसकीचे पाईक आम्ही
 • मानत नाही श्याम
 • मारू बेडूक उडी गड्यांनो
 • मी आळविते जयजयवंती
 • मी डोलकर डोलकर
 • मी नवनवलाचे स्वप्‍न
 • मी ही अशी भोळी कशी गं
 • राघुमैना रानपाखरं
 • राम भजन कर लेना
 • रूपसुंदर सखी साजिरी
 • रूपास भाळलो मी
 • रेशमाच्या रेघांनी
 • वहिनी माझी हसली गं
 • वादलवारं सुटलं गो
 • विकल मन आज झुरत
 • विकल सांजवेळी
 • विहीणबाई विहीणबाई उठा
 • शारद सुंदर चंदेरी
 • शालू हिरवा पाच नि
 • शूर अम्ही सरदार
 • शोधितो राधेला श्रीहरी
 • शोधू मी कुठे कशी
 • श्रावणसरी
 • संगीतरस सुरस
 • संपली कहाणी माझी
 • संपले स्वप्‍न ते
 • सब गुनिजन मिल गावो
 • सांग सांग नाव सांग
 • सांगू कशी प्रिया मी
 • सांज आली दूरातून
 • साजणी सई गं
 • सुकुनी गेला बाग
 • सुख भरून सांडते
 • सुखवितो मधुमास हा
 • सूर येती विरून जाती
 • स्पर्श सांगेल सारी
 • स्वप्‍ने मनातली का
 • स्वर्गाहुनही प्रिय आम्हांला
 • हा दुःखभोग सारा
 • हा माझा मार्ग एकला
 • हाऊस ऑफ बॅम्बू
 • हिरव्या रंगाचा छंद
 • ही कनकांगी कोण ललना
 • ही चाल तुरुतुरु
 • ही वाट दूर जाते
 • हे बंध रेशमाचे
 • हे रान चेहऱ्यांचे
 • हे श्यामसुंदर राजसा
 • क्षणभर भेट आपुली

ध्वनिमुद्रित न झालेल्या किंवा ध्वनिमुद्रित होऊनही वरील यादीत न आलेल्या कविता

संपादन
 • कोमल हळवी उदास झाली मावळतीची किरणे
 • चार दिसावर उभा ओला श्रावण झुलवा, न्याया पाठवा भावाला हिला माहेरी बोलवा
 • देवाच्या देवळातून चोरून आणलेला लोलक
 • रिमझिम बरसत आला श्रावण, साजण नाही आला…. वगैरे

शांता शेळके यांना मिळालेले पुरस्कार

संपादन
 • गदिमा गीतलेखन पुरस्कार १९९६
 • सुरसिंगार पुरस्कार (’मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश’ या गीतासाठी)
 • केंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रगीत पुरस्कार (चित्रपट भुजंग)
 • यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार (२००१) साहित्यातील योगदानाबद्दल

शांताबाईंच्या नावाने दिले जाणारे पुरस्कार

संपादन
 • मंचरच्या कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा ’शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार. २०१५ साली हा पुरस्कार लेखक गोविंद गणेश अत्रे यांना मिळाला.
 • कवयित्री प्रज्ञा दया पवार यांना मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा "कवयित्री शांता शेळके पुरस्कार' दिला गेला (२००८)
 • सुधीर मोघे यांनाही हा पुरस्कार मिळाला होता. (२००७)
 • मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या दादर विभागातर्फे दिला जाणारा शांताबाई शेळके साहित्य पुरस्कार. हा पुरस्कार २०१४ साली 'पानिपत'कार विश्वास पाटील यांना मिळाला होता.
 • मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या दादर विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात ललित लेखक व निबंधकार श्रीनिवास कुलकर्णी यांना शांता शेळके साहित्य पुरस्कार मिळाला होता. (२०१३)
 • कवयित्री डॉ. प्रभा गणोरकर यांनाही हा शांता शेळके साहित्य पुरस्कार मिळाला होता. (२०१२)
 • १९९६ या वर्षी आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद

शांता शेळके यांच्यावर लिहिलेली पुस्तके

संपादन
 • आठवणीतील शांताबाई (संपादक - शिल्पा सरपोतदार)
 • शांताबाई (अनिल बळेल)
 • शांताबाईंची स्मृतिचित्रे (संपादक - यशवंत किल्लेदार)
 • शब्दव्रती शांताबाई - (लेखिका नीला उपाध्ये )

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ

संपादन
 1. ^ "शांता शेळके १". 2011-07-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-09-16 रोजी पाहिले.
 2. ^ "डॉ. वसंत अवसरे मागचा इतिहास". Unknown parameter |अ‍ॅक्सेसदियांक= ignored (सहाय्य)[permanent dead link]
 3. ^ "आठवणीतल्या शांताबाई". भाषा आणि जीवन. वर्ष ४०, अंक ०४ : दिवाळी २०२२: ३१.