चिपळूण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्यातले त्याच नावाच्या तालुक्यातले एक शहर आहे.

  ?चिपळूण

महाराष्ट्र • भारत
Map

१७° ३१′ ४८″ N, ७३° ३१′ १२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा रत्‍नागिरी जिल्हा
लोकसंख्या ५५,१३९ (२०११)
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 415605
• +०२३५५
• MH-०८
वासिष्ठी नदीची खाडी, गोवळकोट

==

चिपळूण येथे सुरुवातीला सातवाहन, शक, क्षत्रप, कलचुरि व राष्ट्रकूट यांनी राज्य केले. त्यानंतर कदंब व ट्रायकुटास यांनी राज्य केले. त्यानंतर दिल्ली सल्तनत, बहमनी, निजामशाही, आदिलशाही मोगल, मराठा यांनी देखील येथे राज्य केले.

सतराव्या शतकात हे एक महत्वाचे केंद्र होते, खूप लोकसंख्येचा आणि बहुतेक सर्व तरतुदींमध्ये संग्रहित होते. जवळचे गोवळकोट हे वशिष्ठ नदीवरील प्रमुख बंदर म्हणून व्यापाराचे केंद्र होते. शहरातील पाग परिसरात हे नाव देण्यात आले कारण ते प्रामुख्याने युद्धभराचे अस्तबल म्हणून वापरले जात होते. चिपळूणमधील मध्य क्षेत्रास, मार्कंडी नावाचे मध्य क्षेत्र महर्षी मार्कंडेय यांनी तेथे सादर केलेल्या यज्ञ्यतेचे नाव घेतले आहे असे मानले जाते.

अलीकडील इतिहासात, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणावर स्वारी करून चिपळूण शहर स्वराज्यात आणले. चिपळूण शहरात कोट बांधून १६६० ते १६७० दरम्यान गोवाळकोटचा किल्ला जिंकून घेतला. पुढे अंग्र्यांनी गोवळकोटाचे नाव बदलून गोविंदगड असे ठेवले.

तालुक्यातील गावे

संपादन
  1. अडरे
  2. आगरवाडी(चिपळूण)
  3. आगवे(चिपळूण)
  4. आकले
  5. अकुशखाणनगर
  6. आलोरे
  7. आंबटखोल
  8. आंबेरे बुद्रुक
  9. आंबितगाव
  10. अनारी
  11. आसुर्डे
  12. बामनोळी
  13. भिले
  14. भोम
  15. बिवळी
  16. बोरगाव (चिपळूण)
  17. चिंचघारी
  18. चिवेळी
  19. दादर(चिपळूण)
  20. दहिवली बुद्रुक
  21. दहिवली खुर्द
  22. दालवाटणे
  23. डेरवण
  24. डेरवण खुर्द
  25. देवखेरकी
  26. देवपाट
  27. धाकमोळी
  28. धामणवाणे
  29. धामेली कोंड
  30. ढोकरावळी
  31. डोणावळी
  32. दुगावे
  33. दुर्गवाडी
  34. दुर्गवाडी खुर्द
  35. गणे
  36. गणेशपूर(चिपळूण)
  37. गांगराई
  38. घावळवाडी
  39. गोंधळे
  40. गोवळकोट
  41. गुढे
  42. गुळवणे
  43. हडकणी
  44. हनुमानगाव
  45. जोधागाव
  46. कडवड
  47. कळंबस्ते
  48. कळमबट
  49. काळवंडे
  50. कळकावणे
  51. काळमुंडी
  52. काळुस्ते
  53. कामठे
  54. कामठे खुर्द
  55. कान्हे
  56. कपारे
  57. कापसळ
  58. करंबवणे
  59. करजीकर मोहोल्ला
  60. कासरवाडी
  61. कातळवाडी
  62. काटरोळी
  63. कौंधर ताम्हाणे
  64. केरे
  65. केतकी
  66. खडपोळी
  67. खंदात
  68. खंडोत्री
  69. खरवटे
  70. खेरडी
  71. खेरशेत
  72. खोपड
  73. कोकरे
  74. कोळकेवाडी
  75. कोंड फणसावणे
  76. कोंढे
  77. कोंडमाळ
  78. कोसबी
  79. कुडप
  80. कुंभार्ली
  81. कुंभारवाडी
  82. कुशिवडे
  83. कुटरे
  84. लोणारी चिवळीबंदर
  85. माजरे
  86. माजरे कौंधर
  87. माजरेकाशी
  88. मालडोली
  89. मालघर
  90. मांडवखारी
  91. मांडकी
  92. मांडकी खुर्द
  93. मांजुत्री
  94. मार्ग ताम्हाणे
  95. मार्गताम्हाणे खुर्द
  96. मिरजोळी
  97. मिरवणे
  98. मोरावणे
  99. मोरावणे बुद्रुक
  100. मुंढे तर्फे चिपळूण
  101. मुंढे तर्फे सावर्डा
  102. मुर्तवडे
  103. नागावे
  104. नांदगाव(चिपळूण)
  105. नांदगाव खुर्द
  106. नांदिवसे
  107. नारदखेरकी
  108. नायशी
  109. निरबाडे
  110. निरव्हळ
  111. निवळी
  112. ओंबाळी
  113. ओवळी
  114. पाचाड(चिपळूण)
  115. पाली(चिपळूण)
  116. पालवण
  117. पाथर्डी(चिपळूण)
  118. पाथे
  119. पवारवाडी(चिपळूण)
  120. पेढांबे
  121. पेडे
  122. पेढे परशुराम
  123. फुरूस
  124. पिळवली तर्फे सावर्डा
  125. पिळवली तर्फे वेळांब
  126. पिंपळी बुद्रुक
  127. पिंपळी खुर्द
  128. पोफळी(चिपळूण)
  129. पोफळी बुद्रुक
  130. पोसरे
  131. राधानगर
  132. रामपूर(चिपळूण)
  133. राऊळगाव
  134. रेहेळे भागडी
  135. रिकटोळी
  136. सावर्डे(चिपळूण)
  137. सावर्डे खुर्द
  138. शिरळ
  139. शिरगाव(चिपळूण)
  140. शिरवली(चिपळूण)
  141. स्वयंमदेव
  142. तळवडे(चिपळूण)
  143. तळेगाव (चिपळूण)
  144. तळसर
  145. ताम्हणमाळा
  146. ताणाळी
  147. तेरव
  148. तेरव बुद्रुक
  149. तिवडी
  150. तिवरे
  151. तोंडली
  152. तुरंबाव
  153. उभाळे
  154. उकतड
  155. उमरोळी(चिपळूण)
  156. वाहळ
  157. वायजी
  158. वरेली
  159. विर
  160. वेहेळे
  161. वेतकोंड
  162. वडेरू
  163. वाघिवरे
  164. वालोपे
  165. वालोटी
  166. येगाव
  167. शिरगांव
  168. आलोरे
  169. कुंभार्ली
  170. फोफळी

वाहतुकीची साधने

संपादन

चिपळूण हे मुंबई-गोवा महामार्गावर (राष्ट्रीय महामार्ग 66) वसलेले आहे. चिपळूण हे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील विविध शहरांशी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (एस.टी.) सेवेने जोडलेले आहे. चिपळूण रेल्वे स्थानक हे कोकण रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. मात्र हे रेल्वे स्थानक गावापासून थोडे दूरच आहे. गुहागर

नागरी सुविधा

संपादन

येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[] शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते.

प्रमुख व्यवसाय

संपादन

नारळ, पोफळी, कोकमआंब्याच्या बागा हे चिपळूण परिसरातील प्रमुख पारंपरिक व्यवसाय आहेत. आता चिपळूण हे निव्वळ ऐतिहासिक शहर नसून ते एक औद्योगिक शहर बनले आहे. चिपळूण परिसरात अनेक केमिकल्स आणि औषधांचे कारखाने आहेत. वादग्रस्त दाभोळ वीज प्रकल्प येथून जवळच गुहागरला आहे.

शैक्षणिक संस्था

संपादन

दातार बेहरे जोशी महाविद्यालय हे महाराष्ट्राच्या चिपळूण शहरातील महाविद्यालय आहे . या महाविद्यालयाची स्थापना १९६५मध्ये झाली.

चिपळूणजवळची पर्यटनस्थळे

संपादन
  • परशुराम मंदिर, लोटे परशुराम
  • वाशिष्ठी पॉईंट
  • गुहागर (व्याडेश्वर मंदिर आणि समुद्रकिनारा) अधिक माहितीसाठी `श्री व्याडेश्वर शिवहर` हे कविता मेहेंदळे यांचे पुस्तक उपलब्ध आहे. (मधुश्री प्रकाशन, पुणे.) हे पुस्तक मंदिरातही उपलब्ध आहे.
  • डेरवण (छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन दाखवणारी शिल्पसृष्टी)
  • हेदवी [गणपती] - दशभुज लक्ष्मी गणेश

श्री चंडिकाई कालकाई मंदिर, श्री हितवर्धक गणेश मंदिर,श्री व्याघ्रेश्वर मंदिर, वाघिवरे गाव

संपादन

वाघिवरे (Waghivare)

वाघिवरे गाव चिपळूण तालुक्यात येते. वाघिवरे गावात काही वाड्या आहे - 1.मधलीवाडी ( Madhaliwadi, waghivare) 2.कदमवाडी 3.घडशीवाडी 4.रेवाळेवाडी 5.भोईवाडी शिवाय मोहल्ला ही आहे.

श्री चंडिकाई कालकाई काळेश्वरी ( Shree Chandikai Kalkai Kaleshwari ) देवी ही वाघिवरे गावची ग्रामदेवता आहे.

 
Shree Chandikai Kalkai Temple, Waghivare

पंचक्रोशीतून भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. देवीचे मंदिर जवळच्या जंगलात गावाच्या वेशीवर आहे. अलीकडेच भक्त ग्रामस्थांनी मूळ स्थानीच मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.

 
Palkhi bhet (chandikai waghjai)
शिमग्यानिमित्त देवळातून देवीची पालखी गावात येते.यादिवशी शेजारील गाव बामणोलीची देवी वाघिवरे गावच्या देवीची भेट घेण्यासाठी येते. या दोन देवींच्या पालखीची भेट हा एक नयनरम्य सोहळा असतो. या ठिकाणी छोटेखानी जत्राचे ही आयोजन असते.
 
Shree Hitvardhak Ganesh Temple photo in Maharashtra Times title

मधलीवाडी (Madhaliwadi Waghivare) मध्ये श्री हितवर्धक गणेश मंदिर आहे. दरवर्षी माघी गणेश जयंती निमित्त येथे गणपतीची पालखीतून मिरवणूक निघते.

 

कदमवाडी मध्ये श्री व्याघ्रेश्वराचे मंदिर आहे. जवळील सभामंडपात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो.

घडशीवाडीमध्ये नवरात्रीत देवीची स्थापना करण्यात येते.

खेरशेत

         चिपळूण-संगमेश्वर या दोन तालुक्यांच्या सिमेवर वसलेलं एक सुंदर असे गाव. गावातून जयगढ नदी जात असल्यामुळे येते वर्षभर हिरवळ असते. श्री मनाई देवी असे येतील ग्राम दैवतेच नाव आहे. कोकरे, कुशिवडे, आरवली, असुर्डे ही गावे खेरशेत गावाच्या सीमेवर आहेत. गावातूनच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ जातो त्यामुळे गावात खूप हॉटेल्स आहेत. तसेच गॅरेज सुद्धा मोठया प्रमाणात आहेत. गावात एक सुप्रसिद्ध बहुउपयोगी कार्यालय (विसावा) सुद्धा आहे.

गावातील वाड्या-

१. बोटकेवाडी

२. बेंडलवाडी

३. मतेवाडी

४. बौद्धवाडी

५. रांबाडेवाडी

६. मधलीवाडी

७. बाटलेवाडी

८. खालचीवाडी

चिपळूण शहरातील समस्या

संपादन
  • ३.५ ते ४ टन ओला आणि २२ टन सुका कचरा दरदिवशी गोळा होतो
  • घंटागाडीची सुविधा परिणामकारक असल्याने शहरात हा कचरा साठून राहत नाही ही चांगली बाब आहे.
  • मात्र हा कचरा कोणतेही वर्गीकरण न होता कचरा प्रकल्पाकडे नेण्यात येतो जो शहराच्या माथ्यावर धामणवणे डोंगरात आहे, ती जागा अत्यंत चुकीची आहे.
  • सुका कचरा भूमी भरावासाठी वापरला जातो असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात हे घडत नाही.
  • बी. ए. आर.सी.च्या अर्थसहाय्याने त्या ठिकाणी निसर्गऋण कचरा प्रकल्प सुरू करण्यात आला होता जो सुरुवातीपासून बंद अवस्थेत आहे.
  • या कचरा प्रकल्पाचे ठिकाणी, उन्हाळ्यात ओला कचरा सुकवून जाळला जातो, पावसाळ्यात विनाप्रक्रिया शहराकडे वाहून जातो.

परिणाम

संपादन
  • कचरा प्रकल्प ज्या ठिकाणी आहे त्याखालील ओझरवाडी, बौद्धवाडी, पाग, झरी, शिवाजीनगर या वस्त्यात पावसाळ्यात कचरा व त्यावाटे अत्यंत घातक प्रदूषके वाहून येतात.[]
  • कचरा प्रकल्पाची जागा शहरापासून उंचावर असणे अत्यंत चुकीचे आहे. त्या परिसरात माशांचा व रोगराईचा प्रादुर्भाव आहे

आवश्यक उपाय

संपादन
  • कचरा प्रकल्पाची जागा बदलणे
  • ओला सुका कचरा वेगळा करणे
  • ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया : गांडूळ खत/ निसर्गऋण प्रकल्प कार्यान्वित झाल्यास ओल्या कचऱ्यातून वीज निर्मिती शक्य, सुक्या कचऱ्यावर पुनःप्रक्रिया करणे आवश्यक आहे.

संदर्भ

संपादन
  1. ^ /https://www.bankofindia.co.in/
  2. ^ "संग्रहित प्रत". 2016-01-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-05-04 रोजी पाहिले.