कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी

कृ.पां. ऊर्फ कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी (जन्म : इस्लामपूर-सांगली जिल्हा, जानेवारी ५, १८९२ - - मुंबई, जून १२, १९६४) हे मराठी लेखक व भाषातज्ज्ञ होते. त्यांचे एम.ए.बी.टी.पर्यंतचे शिक्षण इस्लामपूर, नाशिक, कोल्हापूर, पुणे, मुंबई इत्यादी ठिकाणी झाले. सुरुवातीला ते शाळेत शिक्षक होते, पण नंतर अहमदाबाद येथे संस्कॄतचे व पुढे मुंबई येथे मराठीचे प्राध्यापक झाले. शेवटी मुंबईतील एका कॉलेजाचे ते प्राचार्य म्हणून निवृत्त झाले.

कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी

जी.एफ. म्यूरच्या द बर्थ ॲन्‍ड ग्रोथ ऑफ रिलिजन ह्या ग्रंथाचे भाषांतर त्यांनी धर्म : उद्‍गम आणि विकास ह्या नावाने केले आहे.

कृ.पां. कुलकर्णी यांचे मराठी भाषेसाठीचे कार्य

संपादन
  • मुंबई येथे मराठीचे प्राध्यापक
  • मराठी संशोधन मंडळाचे संचालक (१९४८ ते १९५०)
  • महाराष्ट्र सरकारच्या भाषा सल्लागार मंडळाचे अध्यक्ष
  • मराठी शुद्धलेखन समितीचे कार्यवाह

कृ.पां. कुलकर्णी यांचे प्रकाशित साहित्य

संपादन
वर्ष पुस्तक भाषा प्रकाशन प्रकार/विषय
१९५७ ऐतिहासिक पत्रव्यवहार मराठी ऐतिहासिक
१९६२ कृष्णाकाठची माती मराठी आत्मचरित्र
१९३७ धर्म : उद्‌गम आणि विकास (मूळ इंग्रजी) मराठी वैचारिक
१९३०-३४ पेशवे दप्तराचे ४५ खंड (सहसंपादक) मराठी ऐतिहासिक
१९२५ भाषाशास्त्र व मराठी भाषा मराठी ललितेतर/भाषा
१९३३ मराठी भाषा उद्‌गम व विकास मराठी ललितेतर/भाषा
१९६९ मराठी व्याकरणाचे व्याकरण (संपादन डॉ. ग.मो.पाटील) मराठी भाषा/ललितेतर
१९४६ मराठी व्युत्पत्तिकोश मराठी कोश
१९६० महाराष्ट्र गाथा (सह-संपादनः प्र.के. अत्रे) मराठी ललितेतर
१९५७ मुकुंदराजाचा विवेकसिंधू (संपादन) मराठी ललितेतर
१९३७ राजवाडे मराठी धातुकोश (संपादन) मराठी कोश
१९५३ शब्द : उगम आणि विकास मराठी भाषा/ललितेतर
१९२६ संस्कृत ड्रामा अँड ड्रॅमॅटिस्ट्‌स इंग्रजी भाषा/नाट्यशास्त्र
  • अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, अंमळनेर, १९५२