इचलकरंजी

महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शहर.

इचलकरंजी शहर महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वसलेले आहे. हे शहर येथील वस्त्रोद्योगामुळे खूप नावारूपास आले आहे.या गावाला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. इचलकरंजी शहरास वस्त्रोद्योग नगरी तसेच औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते.

  ?इचलकरंजी

महाराष्ट्र • भारत
टोपणनाव: महाराष्ट्राचे मँचेस्टर
—  शहर  —
राजवाडा
राजवाडा
राजवाडा
Map

१६° ४२′ ००″ N, ७४° २८′ १२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
४९.८४ चौ. किमी
• ५३९ मी
जिल्हा कोल्हापूर
तालुका/के हातकणंगले
लोकसंख्या
घनता
२,५७,५७२ (१५१) (२०११)
• ५,१६८/किमी
भाषा मराठी
आमदार प्रकाश आवाडे
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१६११५/१६/१७
• +०२३०
• MH-०९, MH-५१
संकेतस्थळ: www.ichalkaranjinp.co.in
विकिस्रोत
विकिस्रोत
इचलकरंजी हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

इतिहास संपादन

इचलकरंजी हे कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील औद्योगिक शहर आहे. लोकसंख्या २,५७,५७२ (२००१). हे कोल्हापूरपासून सडकेने २३ किमी. पूर्वेस पंचगंगा नदीच्या काठी आहे. इचलकरंजी संस्थानची ही एकेकाळची राजधानी नंतर वस्त्रोद्योगामुळे पुढे आली. इचलकरंजी महाराष्ट्रामधील एक मोठी आणि श्रीमंत नगरपरिषद म्हणून ओळखली गेली. देशभक्‍त डॉ. रत्नाप्पा कुंभार हे इचलकरंजीतील स्वातंत्र्यसैनिक व पहिले खासदार होते.

वस्त्रोद्योग संपादन

येथील यंत्रमागावरील कापड हे उर्वरित भारतात व भारताबाहेर पाठवले जाते. हातरुमाल, परकर, सदरे, धोतरे, गणवेशाचे कापड असे अनेक वस्त्रांचे प्रकार येथे तयार होतात. येथे अंदाजे १ लाख यंत्रमाग व अंदाजे १०,००० अत्याधुनिक धोटे विरहित यंत्रमाग आहेत. दररोज १ कोटी २५ लाख मीटर कापडाचे उत्पादन येथे होते. वस्त्रोद्योगातील वार्षिक उलाढाल अंदाजे २५ हजार कोटी आहे. त्यांशिवाय इचलकरंजी येथे साखर, तेल, यंत्रे इत्यादींचे कारखाने निघाले आहेत. शहरातील तंबाखू, शेंग, गूळ इत्यादींची ही बाजारपेठ असून शिक्षणक्षेत्रातही शहर पुढे आहे.

वस्त्रोद्योगाचा इतिहास संपादन

इचलकरंजीमध्ये पहिला यंत्रमाग कारखाना विठठ्लराव दातार यांनी १९०४ मध्ये व्यंकटेश रंग तंतू मिल या नावाने स्थापन केला. इचलकरंजीच्या विकासातील मैलाचा दगड ठरलेल्या सहकारी इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेटची स्थापना कृष्णदेव साळुंखे आणि फुलचंदशेठ शहा या दोन द्रष्ट्या नेत्यांनी केली.

साहित्य, कला संपादन

इचलकरंजीचे संस्थानिक श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी आपल्या कारकिर्दीत लोकहिताची अनेक कामे केली.त्यांच्याच काळात इचलकरंजीमध्ये पहिले हातमाग आणण्यात आले. त्यांच्या स्मृत्यर्थ इचलकरंजीतील नाट्यगृहाला कै.नारायणराव घोरपडे नाट्यगृह असे नाव देण्यात आले. या नाट्यगृहाजवळ त्यांचा पूर्णाकृती पुतळा सुद्धा आहे. संगीत कला जपणारे पंडीत बाळकृष्ण बुवा स्मृती मंदिर येथे आहे. सुप्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्या स्मृत्यर्थ हे बांधले गेले. १९७४ साली प्रसिद्ध साहित्यिक पु.ल.देशपांडे यांचा अध्यक्षतेखाली अखिल भारतीय साहित्य संमेलन इचलकरंजी येथे पार पडले. इचलकरंजीचे वैभव असलेल्या राजवाड्यात डी.के.टी ई. टेक्सटाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिटयूट हे कॉलेज सुरू आहे.१८७० साली नेटिव्ह जनरल लायब्ररी या नावाने सुरू झालेले आणि आता आपटे वाचन मंदिर या नावाने ओळखले जाणारे वाचनालय महाराष्ट्रातील अतिशय जुन्या वाचनालयांपैकी एक आहे.

पुरातन वास्तू संपादन

इचलकरंजी शहरात अनेक पुरातन वास्तू, मंदिरे आहेत.

  • पुरातन महादेव मंदिर
  • विठ्ठल मंदिर
  • मरगूबाई मंदिर
  • गद्रे दत्त मंदिर
  • बिरोबा मंदिर

चित्रदालन संपादन

शिक्षणसंस्था संपादन

सामाजिक संस्था संपादन

संदर्भ संपादन