बजाज ऑटो

एक भारतीय दुचाकी कंपनी

बजाज ऑटो लिमिटेड आहे भारतीय दुचाकी कंपनी आहे. ही कंपनी जगभर दुचाकी आणि तीन चाकी वाहने विकते. या कंपनीचे तिन चाकी गाड्यांचा कारखाना पुणे येथे स्थित आहे. [२] ही कंपनी मोटारसायकली, स्कूटर आणि ऑटो रिक्षा तयार करते . बजाज ऑटो हा बजाज ग्रुपचा एक भाग आहे. राजस्थानात जमनालाल बजाज यांनी १९४० च्या दशकात याची स्थापना केली होती. हे पुणे, महाराष्ट्रात असून, चाकण ( पुणे ), वाळूज ( औरंगाबाद जवळ) आणि उत्तराखंडमधील पंतनगर येथे कारखाने आहेत. [३] आकुर्डी ( पुणे ) येथील सर्वात जुना कारखाना आणि आर अँड डी सेंटर आहे.

बजाज ऑटो लिमिटेड
प्रकार सार्वजनिक
शेअर बाजारातील नाव
एकूण इक्विटी साचा:Profit २३,२३३ कोटी (US$५.१६ अब्ज) (2019)[१]
संकेतस्थळ www.bajajauto.com

बजाज ऑटो ही मोटारसायकली बनविणारी जगातील तिसऱ्या क्रमांकाची आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. [४] ही जगातील सर्वात मोठी तीन चाकी वाहन निर्माता कंपनी आहे. [५]

संदर्भ संपादन

  1. ^ "Bajaj Auto Ltd Annual Report 2019". Bajaj Auto Ltd. 2 July 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Company Profile - Bajaj Auto". Equitylion. Archived from the original on 2017-11-16. 20 June 2017 रोजी पाहिले.
  3. ^ "Bajaj Auto at Forbes". Forbes. 31 May 2013. 27 October 2013 रोजी पाहिले.
  4. ^ "News Article". Reuters. 17 May 2012. Archived from the original on 2015-04-25. 22 May 2012 रोजी पाहिले.
  5. ^ "India is the largest three-wheeler industry globally". Deccan Chronicle. 15 March 2016. 15 December 2016 रोजी पाहिले. The top-three players such as market leader Bajaj Auto, second largest manufacturer Piaggio and Mahindra and Mahindra […].

बाह्य दुवे संपादन