चाकण हे पुणे जिल्ह्यातील एक छोटे शहर आहे. चाकण शहरानजीक प्रस्तावित विमानतळ होणार आहे. जवळच वेगाने विकास होणारी औद्योगिक महामडंळाचे कारखाने आहेत. शहरातुन नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग जातो. चाकन हे पुणे शहरापासुन ३३ कि मी अंतरावर आहे. खेड हे तालुक्याचे ठिकाण आहे. ते चाकण पासुन ११ कि मी आहे .

चाकण
जिल्हा पुणे
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या २१,९६३
इ.स. २००१
दूरध्वनी संकेतांक ०२१३५
टपाल संकेतांक ४१० ५०१
वाहन संकेतांक महा - १४
संकेतस्थळ chakantimes.blogspot.com
चाकण चे पुरातन चक्रेश्वर मंदिर, निसर्ग संपदा ,येथील इतिहासाचा संग्राम सांगणारा संग्रामदुर्ग किल्ला, ते अगदी अलीकडे प्रचंड औद्योगिक विस्तारामुळे वाहन उद्योगांची पंढरी म्हणून नावलौकिक मिळालेल्या व मूलभूत सोयींचा विकास , प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे-नाशिक लोहमार्ग हे प्रस्तावित प्रकल्प , राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र ,लोकसंखेच्या लोंढ्यानी वाढते नागरीकरण या कारणांमुळे पुणे जिल्ह्यातील चाकणचा चेहरा-मोहरा संपूर्ण पणे बदलतोय... औद्योगिकदृष्ट्या विस्तारत्या सुवर्ण त्रिकोणाचे तिसरे टोक म्हणून चाकण सह खेड तालुका विकसित होत आहे.... प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, चाकणमधील विस्तारती औद्योगिक वसाहत ,खेड तालुक्यातील सेझ आणि शासनाचे विविध विकास प्रकल्प यामुळे पुणे जिल्ह्यात उद्यमशील तालुका म्हणून खेड तालुका व चाकण परिसर ओळखला जाऊ लागला आहे... या भागाला पंचतारांकित परिसर म्हणून नावलौकिक मिळवून द्यायला शासनाचे विकासात्मक धोरणही कारणीभूत ठरत आहेत... . गेल्या पंधरा -वीस वर्षातल्या चाकण ही बदलती स्थित्यंतरे अनुभवली आहेत ....

 अवघ्या बारा-पंधरा वर्षांत चाकण सारख्या पूर्वीच्या खेडेगावाचे रूप पार पालटून गेलंय. आसपासच्या वाड्या वस्त्या झपाट्याने कात टाकत आहेत. नव्याने होत असलेल्या मोठ्या मॉल्स पासून डोळे दिपवणाऱ्या चकचकीत इमारती आणि आधुनिक सोयीसुविधांमुळे या परिसराचा कायापालट झाला आहे. या विस्तार आणि विकासात बांधकाम उद्योगाला नवी झळाळी आली आहे.
साधारण पणे वीस वर्षा पूर्वी कोणी कल्पनाही केली नसेल की पुढल्या काही वर्षांत चाकण परिसर आणि लगतच्या लहान वाड्या वस्त्या एवढं बदलेल ! चाकण परिसरात होणाऱ्या या बदलांमुळे मालमत्ता बाजारपेठेत त्यांचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. काही वर्षांपूर्वी केवळ पडीक जमीन म्हणून ओळखला जाणारा भाग आता रहिवासी आणि व्यापारी संकुलांनी पूर्णपणे व्यापला आहे. आठवडेबाजार सोडून कुणी मॉलमध्ये खरेदी करायला जाईल असा विचारही काही वर्षांपूवीर् येथे कुणी केला नसेल.
चाकण परिसर आणि खेड तालुक्यात शासनाचे विविध विकास प्रकल्प येत आहेत, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अनेक नामांकित वाहन उद्योगाशी संबंधित कंपन्यांनी चाकण मध्ये उत्पादन प्रक्रिया सुरु केली आहे,अनेक कंपन्या या भागात येण्याच्या वाटेवर आहेत अशा अनेक सकारात्मक बाबींचा परिणाम मालमत्ता बाजारपेठेवर होत आहे.
महाराष्ट्राचेच नव्हे तर देशातील वाहन उद्योगाचे अव्वल केंद्र बनण्याची क्षमता चाकणमध्ये असल्याची बाब येथे बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गुंतवणुकीने स्पष्ट झाली आहे.थेट अमेरिकेशी स्पर्धा करणाऱ्या महाराष्ट्राचे "डेट्रॉईट' म्हणून उभे राहू पाहणाऱ्या चाकण एमआयडीसीतील नव-नव्या गुंतवणुकीमुळे ही बाब अधिरेखीत होत आहे.लघुउद्योजक, गोदामे, हॉटेल, बांधकाम क्षेत्र या ठिकाणी रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत . येथे सुमारे दीड लाख जणांच्या हातांना त्यामुळे रोजगार मिळाला आहे. सध्याची अंशतः मंदीची स्थिती असली तरी परिस्थिती निवळून पुन्हा यंत्रांचा खडखडाट त्याच जोमाने सुरु होण्याची सर्वांनाच आशा आहे. चाकणपासून नजीकच असलेल्या मोशी येथे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र सुरू झाले आहे. चाकणपासून पुणे जवळ. त्यामुळे कुशल तंत्रज्ञानही सहजपणे चाकणसाठी उपलब्ध होत आहे. खेड तालुक्यात नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर या भागाचे महत्त्व आणखी वाढले .त्यातच पुणे -नाशिक रेल्वेच्या प्रलंबित निर्णयावरही शिक्का मोर्तब झाले आहे. परिणामी, गुंतवणूकदारांचा ओघ वाढला असून अ‍ॅटलस कॉपको कंपनीने येथे सुमारे शंभर कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.सध्या चाकणमध्ये फोक्‍सवॅगन, बजाज, महिंद्रा , ह्युंडाई,मर्सिडीज ,सॅन हेवि इंडस्ट्रीज ,ब्रिजस्टोन ,अशा अनेक मोठ्या कंपन्या आहेत. याशिवाय इतर 600 हून अधिक कंपन्या कार्यरत आहेत. या बड्या कंपन्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. उद्योगांसाठीचे आकर्षित करणारे राज्य शासनाचे धोरण, पुण्या- मुंबई पासून जवळचा भाग, जागेची उपलब्धता, कच्चा -पक्का माल , कुशल अकुशल कामगारांची आणि दळणवळणाची उपलब्धता अशा अनेक कारणांनी उद्योगांनी या भागाची वाट धरली .फोक्सवॅगन सारख्या एकट्या जर्मन आटो कंपनीने 2008 मध्ये याभागात 3600 कोटी रुपयांचीगुंतवणूक करणार असल्याचे सांगत बहुचर्चित पोलो व अन्य कार चे उत्पादन चाकण मधील प्लांट मध्ये सुरु केले आहे. महिंदा ॲंड महिंदा, मसिर्डिज बेंझ, यांनीही चाकण मधील आपल्या प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर वाहनांचे उत्पादन गेल्या तीन वर्षात सुरु केले आहे. लाखो कुशल ,अकुशल आणि अर्धकुशल कामगारांना येथे रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. या बड्या उद्योगांना पूरक अशा अनेक छोट्या कारखान्यांनाही कामाची संधी प्राप्त झाली. फोक्‍सवॅगनची सर्वाधिक म्हणजे 3 हजार 600 कोटी रुपयांची गुंतवणूक. त्याखालोखाल बजाज 2 हजार कोटी रुपये. सुमारे 20 हजार अभियंते, कुशल मनुष्यबळाला चाकणमध्ये रोजगार मिळाला आहे . परिसरातील एकूण थेट रोजगार सुमारे दीड लाख जणांना मिळाला असून हे प्रमाण मंदीची सध्याची स्थिती निवळल्यानंतर आणखी वाढण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

वाड्या-वस्त्यांतूनही औद्योगीकरणाचे वारे ....

मागील काही वर्षांपर्यंत चाकण लगतचा नाणेकरवाडी, खराबवाडी, मेदनकरवाडी आदी परिसर सोडल्यास कुरुळी ,निघोजे, सावरदरी, शिंदे, वसुली, महाळुंगे, खालुंब्रे, वराळे, भांबोली, शिंदे, वासुली, बिरदवडी, आंबेठाण, चिंबळी आदी औद्योगीकरणात आलेल्या भागात आधुनिकेचं वारं शिवलं नव्हतं. सुपीक, काळी जमीन, ऊस आणि भुईमुगाचं पीक आणि धामिर्क यात्रांसाठी आणि एकेकाळी दगड आणि खाण यासाठी ते ओळखलं जाई. नंतर कारखानदारीला पोषक अशा तिथे उत्तम पायाभूत सुविधा एमआयडीसीने पुरवल्या. आता हा भाग ग्रामीण ढंग जोपासणारा व सर्वात कमी प्रदूषण आणि आधुनिक सोयी-सुविधांचा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. सावरदरी सारखा गावात जाण्यासाठी सोईचा रस्ता नसणारा भाग गेल्या पाच सहा वर्षांत प्रसिद्धीच्या झोतात आला तो मोठमोठ्या कंपन्यांनी कारखानदारी थाटल्याने . त्यामुळे या परिसराला एक प्रकारची चमक आली आहे,  पाणीपुरवठा, रस्ते यासारख्या पायाभूत सुविधा इथे आहेत आणि संपूर्ण हा परिसर चाकण आणि तळेगाव रोड यांना एकमेकांना जोडला गेला आहे. कामगार अधिकारी यांची वाढती संख्या पाहता महाळुंगे सारख्या भागात अनेक थ्री-बीएचके पासून रो हाऊसपर्यंत सर्व प्रकारची घरे गरजेनुसार निर्माण होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. बजाज, मर्सिडीज बेंझ ,व्होक्स वेगन , महिंदा, केहीनफाय, यासारख्या नावाजलेल्या कंपन्या इथे आहेत. शिवाय अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनीही या भागात आपले युनिट्स स्थापन केले आहेत. एमआयडीसी टप्पा १ ते ५ मध्ये मागील वर्षाअखेरी पर्यंत ३ हजार ५९६ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे .शिवाय हा भाग मुंबई, नाशिक आणि पुणे या सुवर्ण त्रिकोणाच्या अगदी मध्यभागी येतो. महाळुंगे , महिंद्रा जवळून येथील एमआयडीसीतून जाणाऱ्या रस्त्यामुळे हा भाग सर्वत्र रूंद रस्त्यांनी तळवडे, निगडी पर्यंत जोडला गेला आहे. या भागाला रिअल इस्टेटमध्ये नाव मिळवून देण्यात एमआयडीसीचाही मोठा वाटा आहे. पुणे-नाशिक महामार्गावरचा औद्योगिक परिसर म्हणजे चाकण असा नाव लौकिक प्राप्त झाला आहे . नवे या भागात करण्याचे जवळपास मुख्यमंत्र्यांनी छातीठोक पणे सांगितल्याने विमानतळ तयार होण्याच्या विश्वसनीय व़ृत्तामुळे चाकण व खेड तालुका हे नाव चांगलेच चचिर्ले आले आहे. त्यातच देशभरात ज्या १७ ठिकाणांमध्ये सर्वात जास्त गुंतवणूक आकषिर्त करण्याची क्षमता आहे त्यात चाकणचा क्रमांक लागत असल्याने औद्योगीकरणाचे वारे येथे वेगाने वाहत आहे.
 पूर्वीची चाकण ची ओळख संग्रामदुर्ग किल्ला, चक्रेश्वर मंदिर ,कांद्याचे आगार अशी होती आता गेल्या बारा पंधरा वर्षात चाकणची यशोगाथा औद्योगिक विकासापासून सुरू झाली आहे . मुख्य औद्योगिक कंपन्यांनी येथे आपले बस्तान बसवल्याने विकासाला प्रारंभ झाला. येथील औद्योगिक प्रगती दिवसेंदिवस भरारी घेत असल्याने घरांची मागणीही कमालीची वाढत आहे. चाकण-तळेगाव औद्योगिक पट्टा उद्योजगतेच्या दृष्टिकोनातून पालटत आहेच . औद्योगिक नियोजनासाठी हा भाग उत्तम आहे. याच्या विकासाला अजून चालना देण्यासाठी विकसकांचे म्हणणे आहे , की एमआयडीसी आणि सरकाराने एकत्र येऊन इथल्या गृहनिर्माण प्रक्रियेला हातभार लावावा. त्याचबरोबरीने मूलभूत सोयींचा विकासही येथे अपेक्षित असून , त्यामुळे या प्रक्रियेला वेग मिळण्यास फायद्याचे ठरेल , असेही त्यांचे मत आहे. सध्या प्रस्थापित असलेल्या मुख्य औद्योगिक कंपन्यांप्रमाणेच इतर छोट्या-मोठ्या कंपन्याही येथे उड्या मारण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे भविष्यात या भागात घरांची मागणी निश्चितच वाढेल. महागड्या पुण्याच्या तुलनेत घरांच्या खिशाला परवडणाऱ्या किमती ही चाकण पंचक्रोशीच्या या भागाची खासियत मानली जात आहे.
एखाद्या भागाचा प्रत्येक क्षेत्रात जोमाने होणारा विकास ,प्रामुख्याने उद्योग , मॅन्युफॅक्चरिंग आणि ऑटोमोबाइलमध्ये प्रगती वेगाने होत असेल , तर नेहमी फायद्याचेच ठरते. हीच प्रगती भविष्यात रिअल इस्टेट क्षेत्रालाही पोषक वातावरण तयार करते. आदर्श राहाणीमानासाठी सध्या चाकणकडे पाहिले जाते आहे. घरांच्या शोधात असणारे अनेकजण या भागाला प्राधान्य देत असून , येथे प्रत्येक वळणावर होणारा विकासच त्यांना आकर्षित करतोय असे जाणकारांचे म्हणणे आहे . नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सरकारने प्राधान्यक्रमाने हाती घेतल्याचेही दिसून येत आहे . त्यामुळे खूप वर्ष रेंगाळलेला आणि घोषणा करण्या पलीकडे काडीही न हललेला हा प्रकल्प लवकरच मार्गी लागण्याची आशा उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकार लवकरच येथे विमानतळ सुरू करण्याच्या बेतात आहे. या भागातील रस्त्यांच्या सुविधा उत्तम आहेत. मात्र , इतर सुविधा जशा , मोठ्या शाळा , मोठी हॉस्पिटल , मोठे व अधिक प्रमाणातील शॉपिंग सेंटर येथे अजून पाहिजे तेवढ्या प्रमाणात उभ्या राहिलेल्या नाहीत अशी तक्रार करणाऱ्यांना या भागातील सर्वच क्षेत्रात सुरु असलेली घोडदौड पाहता पुढील काळात अशी तक्रार करण्यास वाव राहणार नाही अशीच सध्याची स्थिती आहे.

(संपादन : अविनाश लक्ष्मण दुधवडे,चाकण , पत्रकार, (संपादक - पुणे लाईव्ह न्यूज ) मो. ९९२२४५७४७५ | ७०२०३७३०९१

AVINASH LAXMAN DUDHAWADE | CHAKAN | MOB - 9922457475

18°45′N 73°51′E / 18.75°N 73.85°E / 18.75; 73.85