राष्ट्रीय रोखे बाजार

राष्ट्रीय शेअर बाजार (National Stock Exchange, संक्षेप: एन.एस.ई.) हा भारत देशाच्या मुंबई शहरामधील एक रोखे बाजार आहे. १९९२ साली स्थापन झालेल्या एन.एस.ई.वर सध्या १,६९६ कंपन्या रोखेसमभागांची खरेदी विक्री करतात. जून २०१४ मध्ये ह्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य अंदाजे १,४७२ अब्ज अमेरिकन डॉलर इतके होते.

राष्ट्रीय शेअर बाजाराची मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलातील इमारत

एन.एस.ई. मध्ये वापरला जाणाऱ्या निर्देशांकाचे सी.एन.एक्स. निफ्टी असे नाव आहे. निफ्टी हा मुंबई रोखे बाजारच्या सेन्सेक्ससोबत भारतामधील सर्वात महत्त्वाचा निर्देशांक समजला जातो व भारतीय अर्थव्यवस्थेची नाडी मानला जातो.

हे सुद्धा पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा