बी.एस.ई. सेन्सेक्स
बी.एस.ई. सेन्सेक्स (इंग्लिश: BSE SENSEX; S&P Bombay Stock Exchange Sensitive Index) हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आहे. आशियातील सर्वात प्राचीन अशा बी.एस.ई.ची स्थापना १८७५ मध्ये बीएसई लिमिटेड या रूपात झाली होती. भारतीय शेअर बाजाराच्या वाटचालीत या एक्सचेंजचे कार्य मोलाचे असे आहे आणि याचा निर्देशांक जगभर नावाजलेला आहे. हा निर्देशांक मुंबई शेअर बाजारातील सर्वात मोठ्या व प्रतिष्ठित ३० भारतीय कंपन्यांवर आधारित आहे. ह्या ३० पैकी अनेक कंपन्यांच्या शेअर्सची सर्वाधिक उलाढाल केली जाते. १ एप्रिल १९७९ रोजी १०० अंकांसह सेन्सेक्सची सुरुवात झाली. आशियातील सर्वात जुना आणि देशातील पहिला असलेल्या या स्टॉक एक्सचेन्जला बी.एस.ई. लिमिटेड सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट कायदा, १९५६ अन्वये कायमस्वरूपी मान्यता मिळालेली आहे. या एक्सचेंजचा गौरवशाली इतिहास सव्वाशे वर्षांपेक्षा जुना आहे. भारतामध्ये अशी एखादी कंपनी नसेल जिने भांडवल उभारण्यासाठी बी.एस.ई.ची सेवा घेतलेली नाही. बी.एस.ई. हे भारतीय कॅपिटल मार्केटचे प्रतीक मानले जाते. बी.एस.ई.चा निर्देशांक हा देशाच्या अर्थव्यवस्थेचे आणि वित्तबाजारातील उलाढालीचे प्रतिबिंब दर्शविणारा बेंचमार्के इक्विटी निर्देशांक आहे.
घटकसंपादन करा
खालील ३० प्रमुख भारतीय कंपन्या सेन्सेक्सचा घटक आहेत.
प्रदर्शनसंपादन करा
- १000 - २५ जुलै १९९०
- २000 - १५ जानेवारी १९९२
- ३000 - २९ जानेवारी १९९२
- ४000 - ३० मार्च १९९२
- ५000 - ११ ऑक्टोबर १९९९
- ६000 - ११ फेब्रुवारी २०००
- ७000 - २१ जून २००५
- ८000 - ८ सप्टेंबर २००५
- ९000 - ९ डिसेंबर २००५
- १0,000 - ७ फेब्रुवारी २००६
- ११,000 - २७ मार्च २००६
- १२,000 - २० एप्रिल २००६
- १३,000 - ३० ऑक्टोबर २००६
- १४,000 - ५ डिसेंबर २००६
- १५,000 - ६ जुलै २००७
- १६,000 - १९ सप्टेंबर २००७
- १७,000 - २६ सप्टेंबर २००७
- १८,000 - ९ ऑक्टोबर २००७
- १९,000 - १५ ऑक्टोबर २००७
- २०,000 - ११ डिसेंबर २००७
- २१,000 - ५ नोव्हेंबर २०१०
- २२,000 - २४ मार्च २०१४
- २३,000 - ९ मे २०१४
- २४,000 - १३ मे २०१४
- २५,000 - १६ मे २०१४
- २६,000 - ७ जुलै २०१४
- २७,000 - २ सप्टेंबर २०१४
- २८,००० - ५ नोव्हेंबर २०१४
- २९,००० - २३ जानेवारी २०१५
- ३०,००० - ४ मार्च २०१५
- ३१,००० - २६ मे २०१७
- ३२,००० - १३ जुलै २०१७
- ३३,००० - २५ ऑक्टोबर २०१७
- ३४,००० - २६ डिसेंबर २०१७
- ३५,००० - १७ जानेवारी २०१८
- ३६,००० - २३ जानेवारी २०१८
- ३७,००० - २७ जुलै २०१८
- ३८,००० - ९ ऑगस्ट २०१८
- ३९,००० - १ एप्रिल २०१९
- ४०,००० - २३ मे २०१९
- ४१,००० - २६ नोव्हेंबर २०१९
- ४२,००० - १६ जानेवारी २०२०
- ४३,००० -
- ४४,००० -
- ४५,००० - ४ डिसेंबर २०२०
- ४६,००० - ९ डिसेंबर २०२०
- ४७,००० -
- ४८,००० -
- ४९,००० -
- ५०,००० - २१ जानेवारी २०२१
- ५१,००० -
- ५२,००० -
- ५३,००० -
- ५४,००० -
- ५५,००० -
- ५६,००० -
- ५७,००० -
- ५८,००० -
- ५९,००० -
- ६०,००० - २४ सप्टेंबर २०२१
बाह्य दुवेसंपादन करा
- ^ "20151120-9 - Reconstitution of S&P BSE Indices". BSE. 20 November 2015. Archived from the original on 29 August 2017. 29 August 2017 रोजी पाहिले.
- ^ "Reconstitution of S&P BSE Indices". BSE. 22 November 2018. Archived from the original on 12 January 2019. 12 January 2019 रोजी पाहिले.
- ^ "20171117-23 - Reconstitution of S&P BSE Indices". BSE. 17 Nov 2017. Archived from the original on 29 January 2018. 29 January 2018 रोजी पाहिले.
- ^ "20170519-15 - Reconstitution of S&P BSE Indices". BSE. 19 May 2017. Archived from the original on 29 August 2017. 29 August 2017 रोजी पाहिले.
- ^ a b c "Titan Company, UltraTech Cement, Nestle India in focus on Sensex inclusion". Business Standard. 23 December 2019. Archived from the original on 14 January 2020.
- ^ "20160520-25 - Reconstitution of S&P BSE Indices". BSE. 20 May 2016. Archived from the original on 29 August 2017. 29 August 2017 रोजी पाहिले.
- ^ "Coal India, Sun Pharma to enter Sensex on Monday". BusinessLine. PTI. 7 August 2011. Archived from the original on 30 January 2018. 30 January 2018 रोजी पाहिले.