रोखा (इंग्लिश: Security, सिक्युरिटी), अर्थात प्रतिभूती (मराठी लेखनभेद: प्रतिभूति) हा वित्तीय मूल्य दर्शवणारा विनिमय करण्याजोगा, परक्राम्य[१] वित्तीय संलेख[२] असतो. रोख्यांचे ढोबळ मानाने पुढीलप्रमाणे वर्गीकरण होते :

  • कर्ज रोखे (डेट सिक्युरिटीज): बँकेच्या नोटा, बंधपत्र (बाँड), ऋणपत्र (डिबेंचर) इत्यादी.
  • समन्याय रोखे (इक्विटी सिक्युरिटीज): उदा., समभाग.
  • अनुजात कंत्राटे (डेरिवेटिव काँट्रॅक्ट): वायद्याचा करार (फॉरवर्ड), वायदा सौदा (फ्यूचर), विकल्प करार (ऑप्शन), अदलाबदलीचा करार (स्वॉप) इत्यादी.

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ परक्राम्य (इंग्लिश: Negotiable, निगोशिएबल) (संदर्भ: अर्थशास्त्र परिभाषा कोश. p. ४१४.)
  2. ^ संलेख (इंग्लिश: Instrument, इन्स्ट्रुमेंट) (संदर्भ: अर्थशास्त्र परिभाषा कोश. p. २७९.)