विमा (इंग्लिश: Insurance) म्हणजे संभाव्य नुकसानीची शक्यता गृहीत धरून ती कमी करण्याचा, म्हणजेच जोखीम व्यवस्थापनाचा, उपाय होय.

इतिहाससंपादन करा

विम्याची कल्पना खूप जुनी आहे. जोखीम ही अनेकांमध्ये कशी वाटता येईल ही त्यामागची मुख्य कल्पना आहे.[१]इसवीसन पूर्व २००० वर्षापासून चीनी आणि बॅबिलोनियन संस्कृतीमधील व्यापाऱ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ही पद्धत सुरू केली.जर काही वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यावयाच्या असतील तर ते त्या वस्तू अनेक जहाजांत वाटायचे त्यामुळे एखादे जहाज बुडाले, लुटले गेले तरी सर्वनाश होत नसे. इसवीसन पूर्व १७५६ मध्ये बॅबिलोनियन व्यापाऱ्यांनीच हमुरबी कोड नावाची पद्धत सुरू केली त्यावेळी जहाजातून माल नेण्याकरिता व्यापाऱ्यांना कर्ज काढावे लागत असे. हमुरबी कोडप्रमाणे जर या सफरीत ते जहाज चोरीला गेले/बुडाले तर काढलेले कर्ज त्या व्यापाऱ्याला माफ करण्यात येई, परंतु व्यापार करून ते जहाज सुरक्षितपणे परत आले तर मात्र त्या व्यापाऱ्याला कर्ज देणाऱ्याला कर्जापेक्षा जास्त रक्कम द्यावी लागे.

भारतात विम्याची कल्पना खूप पूर्वीच्या लिखाणात वाचायला मिळते. मनुस्मृती, याज्ञव्यल्क्य स्मृती, कौटिल्याचे अर्थशास्त्र या पुस्तकांत विम्याचा उल्लेख सापडतो. योगक्षमं वहाम्यहम् हे भारतीय जीवन विमा निगमचे घोषवाक्य मनुस्मृतीमधूनच घेतले आहे. सगळ्यांनी मिळून विम्याचे हप्ते भरायचे आणि ज्याचे नुकसान असेल/ज्याला गरज असेल त्याला त्यांतला थोधा वाटा द्यायचा अशी ही कल्पना होती.

साधारणतः इसवी सन पूर्व १७५०च्या सुमारास ऱ्होडच्या व्यापाऱ्यांनी एक पद्धत काढली. अनेक व्यापारी वस्तूंची जहाजांतून वाहतूक करीत असतील तर सगळे थोडे थोडे पैसे भरत. यातून एक निधी (fund)तयार होई जर एखाद्याचे जहाज बुडाले/चोरीला गेले तर त्याला तो सर्व निधी दिला जाई. इसवी सन पूर्व ६००च्या सुमारास रोमन लोकांनी आयुर्विम्याची पद्धत सुरू केली. यात प्रत्येकाने काही premium(हप्ता) भरायचा आणि त्यातून कोणी मेला तर त्या निधीतून त्या व्यक्तीच्या दफनाचा खर्च केला जायचा, तसेच त्याच्या कुटुंबालाही काही पैसे दिले जायचे.

इसवी सन १६६६ मध्ये लंडनला एक मोठी आग लागली त्यामध्ये १३,२०० घरे जाळून खाक झाली त्यावरून बोध घेऊन इसवी सन १६८०मध्ये निकोलस बर्बोन यांनी इंग्लंड मध्ये दि फायर ऑफिस नावाची विम्याची पहिली आग विमा कंपनी सुरू केली.

भारतात विम्याचा उद्योग इसवी सन १८१८मध्ये अनिता भावसार या व्यक्तीने सुरू केला. कलकत्ता येथे ओरिएंटल लाईफ इन्शुरन्स कंपनी सुरू झाली. परंतु १८३४ मध्ये ती कंपनी बुडाली. १८७१ मध्ये म्युच्युअल आणि १८७४मध्ये ओरिएंटल व १८९७ मध्ये एम्पायर ऑफ इंडिया या कंपन्या सुरू झाल्या. सध्या अस्तित्वात असलेल्या कंपन्यापैकी सर्वात जुनी कंपनी नॅशनल इन्सुरन्स कंपनी १९०६ मध्ये सुरु झाली आहे.

विम्याचे प्रकारसंपादन करा

आगीचा विमासंपादन करा

आगीचा विमा इमारतींना आणि आतील वस्तूंना संरक्षण पुरवतो. अग्निविमा विमेदाराला आगीच्या धोक्यापासून संरक्षण . ज्या मालमत्तेचा आगीपासून नुकसान होऊ शकते अशा मालमत्तेचा अग्निविमा उतरविला जाऊ शकतो. आग, वीज आणि स्फोट यांपासून होणाऱ्या नुकसानीस अग्निविमा संरक्षण देते. अग्निविमा विमेदराला आगीच्या धोक्यापासून संरक्षण देतो.

आयुर्विमासंपादन करा

कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाविरुद्ध आयुर्विमा हे संरक्षण असते. मृत्यूपश्चात कुटुंबप्रमुखावर अवलंबून असलेल्या व्यक्तींचे आणि कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करणे आणि आर्थिकदृष्ट्या त्यांचे जीवन बिघडणार नाही याची खात्री करणे यासाठी आयुर्विमा आवश्यक असतो. कुटुंब प्रमुखाचा आकस्मिक मृत्यू झाल्यास आयुर्विमा कंपनी ठरलेली रक्कम देऊन भविष्यातील उत्पन्नाचा ओघ सुरू ठेवते किंवा इतर देय जबाबदाऱ्या पार पाडण्यास मदत करते.

आरोग्य विमासंपादन करा

 
विम्याचे प्रकार

आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये उपचाराचा खर्च फार वाढत आहे देव न करो पण जर कदाचित भविष्यामध्ये आपण खूप आजारी पडला तर स्वास्थ विमा पॉलिसी या आपल्या उपचाराचा सर्व खर्च कव्हर करते. स्वास्थ विमा ( Health Insurance) पॉलिसी नुसार या विमा कंपन्या आपल्या कोणत्याही बिमारीवर होणाऱ्या खर्चाचा मोबदला देते. लक्षात घ्या कि बिमारीवर खर्च होणाऱ्या या पैशांची सीमा हे आपल्या विमा पॉलिसी कंपनीवर निर्भर राहील.

वाहन विमासंपादन करा

अपघात विमासंपादन करा

अपघात विमा घेतल्यावर विमाधारकास अपघाती मृत्यू आल्यास ठरलेली रक्कम विमाधारकाच्या वारसाला मिळते. अपघातात कायमचे अपंगत्व आल्यास अपंगत्वाच्या प्रमाणानुसार विमाधारकाला पैसे मिळतात. या शिवाय तात्पुरत्या स्वरूपाचे अपंगत्व आल्यास काही रक्कम देणाऱ्या अपघात विमा योजनाही असतात. अशा विम्याचे दर वर्षी नूतनीकरण करावे लागते.

हे सुद्धा पहासंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ See, e.g., Vaughan, E. J., 1997, Risk Management, New York: Wiley.