द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्लिश: The Times of India) हे भारतामधील एक आघाडीचे इंग्रजी वृत्तपत्र आहे. २००८ सालामधील एका सर्वेक्षणानुसार रोजचा ३१.४ लाख खप असलेले टाइम्स ऑफ इंडिया हे जगातील सर्वात लोकप्रिय इंग्लिश तर सर्व भाषीय वृत्तपत्रांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे वृत्तपत्र आहे. टाइम्स वृत्तसमूहाच्या मालकीचा असलेला टाइम्स १८३८ सालापासून अस्तित्वात आहे.

द टाइम्स ऑफ इंडिया
प्रकारदैनिक वृत्तपत्र

मालकबर्नेट कोलमन ॲंड कंपनी
प्रकाशकटाइम्स समुह
मुख्य संपादकजयदीप बोस
स्थापना३ नोव्हेंबर १८३८
भाषाइंग्रजी
मुख्यालयटाइम्स हाऊस, बहादुरशहा जफर मार्ग, नवी दिल्ली
खप३१,४६,००० प्रति दिन
भगिनी वृत्तपत्रेद इकॉनॉमिक टाइम्स, नवभारत टाइम्स, महाराष्ट्र टाइम्स
ओसीएलसी23379369

संकेतस्थळ: timesofindia.com


इतिहास टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राची सुरुवात ३नोव्हेंबर,इ.स.१८३८ रोजी द बॉम्बे टाइम्स अँड जनरल ऑफ कॉमर्स या नावाने झाली.

आवृत्त्या सध्याच्या घडीला टाइम्स ऑफ इंडिया भारतामधील खालील १४ प्रमुख शहरांमधून छापला जातो. १ मुंबई २ अहमदाबाद ३ बंगळुरु ४ भोपाळ ५ चंदीगढ ६ चेन्नई ७ दिल्ली ८ गोवा ९ हैदराबाद १० जयपूर ११ कोची १२ कोलकाता १३ लखनऊ १४ पुणे ह्याखेरीज टाइम्स ऑफ इंडियाचे ॲप आयफोन,आयपॅड,अँड्रॉईड,ब्लॅकबेरी,विंडोज फोन इत्यादी प्रमुख मोबाईल फोन प्रणालींवर उपलब्ध आहे.

बाह्य दुवे

संपादन