लोकमत

मराठी वृत्तपत्र


लोकमत हे भारताच्या अकोला, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर,कोल्हापूर, जळगाव, नागपूर, नाशिक, पणजी, पुणे, मुंबई, नवी दिल्ली, सोलापूर या बारा शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे.

लोकमत
प्रकारदैनिक वृत्तपत्र
आकारमान७४९ बाय ५९७ मीमी

मालकजवाहरलाल दर्डा
प्रकाशकलोकमत मीडिया लिमिटेड
संपादकनंदकिशोर पाटील
मुख्य संपादकविजय बाविस्कर
स्थापना९ जानेवारी इ:स १९८१
भाषामराठी
किंमत५₹
मुख्यालयलोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेड,

१३०१/२, लोधा सुप्रीमस
डॉ. ई. मोझेस रोड, वरळी नाका,
मुंबई - ४०००१८,

भारत
भगिनी वृत्तपत्रेलोकमत समाचार, लोकमत टाइम्स

संकेतस्थळ: http://lokmat.com/


लोकमत हे मराठीतील एक अग्रगण्य दैनिक आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात या दैनिकाचे वर्चस्व आहे. लोकमत हे वाचकसंख्येनुसार मराठीतील क्रमांक एकचे वृत्तपत्र असून देशात याचा क्रमांक ४था आहे. [ संदर्भ हवा ] दर्डा कुटुंबीय या वृत्तपत्राचे मालक आहेत.

पुरवणी

संपादन

लोकमत वृत्तपत्र दैनिकासोबत दररोज वेगवेगळ्या पुरवण्या देतात.

मंथन ही लोकमत वृत्तपत्र दैनिकासोबत रविवारी देण्यात येणारी पुरवणी आहे.

सखी ही लोकमत वृत्तपत्र दैनिकासोबत गुरुवारी देण्यात येणारी पुरवणी आहे.

ऑक्सिजन

संपादन

ऑक्सिजन ही लोकमत वृत्तपत्र दैनिकासोबत शुक्रवारी देण्यात येणारी पुरवणी आहे.

सी.एन.एक्स

संपादन

सी.एन .एक्स ही करमणूक व मनोरंजन संदर्भातील पुरवणी असून ती सोमवार , बुधवार ,शुक्रवार व शनिवारी मुख्य अंकासोबत येते.

संदर्भ

संपादन