लोकसत्ता हे भारताच्या मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर, औरंगाबाद, अमरावती आणि दिल्ली या शहरांतून प्रसिद्ध होणारे मराठी भाषेतील वृत्तपत्र आहे. इंडियन एक्सप्रेस या वृत्तसमूहाचे लोकसत्ता हे मराठी दैनिक आहे. लोकसत्ताच्या मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद व नागपूर या आवृत्त्याही निघतात. वर्तमानपत्राच्या मुख्य अंकाला नागपूर, नाशिक, मराठवाडा वृतान्त आणि लोकसत्ता मुंबई, महामुंबई, ठाणे, वसई-विरार, पालघर, पुणे या स्थानिक पुरवण्या आणि करिअर, अर्थ, रविवार वृत्तान्त आणि चतुरंग, वास्तुरंग, लोकरंग, व्हिवा या विशेष साप्ताहिक पुरवण्या असतात.[ संदर्भ हवा ] साप्ताहिक लोकप्रभा हे लोकसत्ताचे प्रकाशन आहे.

लोकसत्ता
प्रकारदैनिक

प्रकाशकइंडियन एक्सप्रेस वृत्तसमूह
संपादकगिरीश कुबेर
स्थापनाजानेवारी १४, १९४८
भाषामराठी
किंमत५ ₹.
मुख्यालयभारत मुंबई, महाराष्ट्र, भारत

संकेतस्थळ: www.loksatta.com

२०२० च्या पहिल्या सहामाहीत loksatta.com ही वेबसाइट मराठी विकिपीडियामधील सर्वात लोकप्रिय स्त्रोतांपैकी एक होती.[१][२]

अलेक्साच्या मते, loksatta.com ही वेबसाइट ही भारतातील सर्वात लोकप्रिय वेबसाइट आहे.[३]

संदर्भसंपादन करा

  1. ^ "loksatta.com as a source in references of Wikipedia - BestRef". bestref.net. Archived from the original on 2020-07-23. 2020-07-23 रोजी पाहिले.
  2. ^ Lewoniewski, Włodzimierz; Węcel, Krzysztof; Abramowicz, Witold (2020-05-13). "Modeling Popularity and Reliability of Sources in Multilingual Wikipedia". Information. 11 (5). doi:10.3390/info11050263. 2020-07-23 रोजी पाहिले.
  3. ^ "loksatta.com Competitive Analysis, Marketing Mix and Traffic - Alexa". alexa.com. 2020-07-23 रोजी पाहिले.