वेंगुर्ला हे शहर समुद्रकिनारी वसलेले ऐतिहासिक शहर असून त्यास संपन्न परंपरा लाभली आहे. वेंगुर्ला शहराची मुख्य ओळख एक व्यापारी बंदर म्हणून होती.परंतु आता केवळ एक मासेमारी बंदर अशीच त्याची ओळख उरली आहे. महाराष्ट्रातील तुलनेने कमी प्रदूषित समुद्र किनाऱ्यांमध्ये याची गणना होते.[१]

Vengurla 04
Vengurla 11

अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेल्या वेंगुर्ला शहराची नवीन ओळख ही वेगाने विकसित होणारे पर्यटनस्थळ म्हणूनच करून द्यायला हवी.[२]

१८५६ (?) पासून नगरपालिका आणि १८७१पासून नगर वचनालय असलेल्या वेंगुर्ला शहराची शैक्षणिक परंपरा उच्च नसली तरच नवल. आजच्या वेंगुर्ल्यात वेंगुर्ला होमिओपॅथी मेडिकल कॉलेज, बॅ.खर्डेकर कॉलेज, पाटकर हायस्कूल, रा.सी.रेगे ज्युनियर कॉलेज आणि वेंगुर्ला हायस्कूल या संस्था शैक्षणिक कार्य पाडतात.

प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचे हे गाव. या गावाची ओढ शरद पवार यांसारख्या अनेक मान्यवरांना असते.[३] कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा जन्मही वेंगुर्ल्याचा.[४]

एकेकाळचे प्रमु़ख व्यापारी बंदर असल्याने वेंगुर्ल्यात देवस्थानांना नेहमीच संपंन्नता लाभली आहे त्यामुळेच वेंगुर्ल्यात संपूर्ण वर्षभर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. विविध देवस्थानांच्या वार्षिक जत्रा आणि त्यानिमित्त होणारे दशावतारी नाट्यप्रयोग हे अत्यंत उत्साहाने साजरे केले जातात.

हेसुद्धा पाहासंपादन करा

  1. डच वखार

संदर्भसंपादन करा

  1. ^ http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5524687560074144830&SectionId=28&SectionName=%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C5%93%C3%A0%C2%A5%20%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A4%C2%BE
  2. ^ https://www.maharashtratourism.gov.in/treasures/beach/vengurla
  3. ^ http://esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4744988812418261940&SectionId=3&SectionName=
  4. ^ http://www.esakal.com/esakal/20151230/5393057567785293889.htm