जळगाव

महाराष्ट्र राज्यातील एक शहर
(जळगांव या पानावरून पुनर्निर्देशित)

जळगाव शहर महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे.जळगांव ला पूर्व खान्देश असे पण संबोधले जाते,जळगाव जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेले जळगाव शहर एक महत्त्वाचे कृषी व्यापार केंद्र आहे.जळगाव नाशिक विभागीय क्षेत्रात येते,कापूस, खाद्यतेले, केळी इ. बाजारपेठा येथे असून जळगाव शहर हे सोन्याची बाजारपेठ म्हणून नावाजलेले आहे.येथे Midc आहे,येथील सोने शुद्धतेबद्दल प्रसिद्ध आहे. जळगाव शहरात ठिबक-सिंचन, पाण्याचे पाईप, डाळ व कापड इत्यादी उद्योग आहेत.[ संदर्भ हवा ]

  ?जळगाव

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

२१° ०१′ ००″ N, ७५° ३४′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• २२६ मी
विभाग उत्तर महाराष्ट्र
लोकसंख्या
लिंग गुणोत्तर
साक्षरता
 (२०११)
९२५ /
७८ %
भाषा मराठी
कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• +०२५७
• MH 19
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

जळगाव शहरात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. व गांधी संग्रहालय या प्रसिद्ध संस्था आहेत. येथून जवळच जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आहेत. [ संदर्भ हवा ]

भूगोल

संपादन

जळगाव शहर हे समुद्र सपाटीपासून साधारणतः २०९ मीटर उंचीवर आहे. गिरणा नदी शहराच्या पश्चिमी भागातून वाहते.[ संदर्भ हवा ] जळगाव जिल्ह्यात चांगदेव या ठिकाणी तापी - पूर्णा या नद्यांचा संगम होतो. तापी - पूर्णा खोरे हा खाचदरीचा प्रदेश आहे.[ संदर्भ हवा ]

इतिहास

संपादन

जळगाव शहराची स्थापना मराठी सरदार तुळाजीराव भोईटे यांनी केली. सरदार तुळाजीराव भोईटे हे साताऱ्याचे संस्थानिक होते. भोईटे कुटुंबाचे पूर्वज दुर्गोजीराव भोईटे हे छत्रपती शाहू महाराजांचे निष्ठावंत सेवक असल्याकारणाने महाराजांकडून त्यांना नशीराबाद आणि जवळील प्रांत अनुदान म्हणून मिळाले होते. भोईटे बऱ्याच काळपर्यंत जळगावचे राज्यकर्ते राहिले. त्यांनी जळगाव येथे एक वाडा बांधला. आज त्या वाड्याला भोईटे गादी म्हणून ओळखले जाते.[ संदर्भ हवा ]

स्वातंत्र्ययुद्ध

संपादन
 
काव्य रत्‍नावली चौक
 
जळगाव जिल्ह्याचा नकाशा

समाज जीवन

संपादन

जळगाव जिल्ह्यात हिंदू, मुस्लिम, शीख, ज्यू, ख्रिश्चन इत्यादी धर्माचे लोक राहतात. सोबतच भिल्ल, पावरा, टोकरे-कोळी या आदिवासी जमाती आहेत.लेवा पाटीदार समाज हा जळगाव जिल्ह्यातील मुख समाजघटक आहे.[ संदर्भ हवा ]

उपनगरे व विभाग

संपादन
  • आदर्शनगर
  • खेडी बुद्रुक
  • जिल्हा पेठ
  • जुने जळगाव
  • नवी पेठ
  • निमखेडी
  • पिंप्राळा
  • बळीराम पेठ
  • महाबळ
  • मुक्तताईनगर
  • भोईटे नगर
  • मेहरुण
  • राम पेठ
  • शंकररावनगर
  • शनी पेठ
  • शाहूनगर
  • रामानंदनगर

हवामान

संपादन

जळगाव जिल्ह्यातील हवामान हे विषम व कोरडे आहे. जळगाव जिल्ह्यात सरासरी 75 ते 80 सेमी पाऊस पडतो.

जैवविविधता

संपादन

जळगाव जिल्हात खूपच जैविविधता आढळून येते

अर्थकारण

संपादन

नागरी प्रशासन

संपादन

जळगाव शहर हे महानगर असून येथील प्रशासकीय कारभार महापालिकेमार्फत चालविला जातो. महापालिकेची प्रशासकीय इमारत १७ मजली आहे. त्या इमारतीचे नाव सरदार वल्लभभाई पटेल असे आहे.[ संदर्भ हवा ]

जिल्हा प्रशासन

संपादन

महानगर पोलीस यंत्रणा

संपादन

राज्याच्या गृह मंत्रालयाने नियुक्त केलेला एक आय. पी. एस. अधिकारी हा जळगाव पोलीस खात्याचा मुख्य आहे. त्यामुळे इथली पोलीसव्यवस्था महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येते.[ संदर्भ हवा ]

परिवहन

संपादन

लोहमार्ग

संपादन

जळगाव हे एक जिल्ह्यातले महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असून ते भारतातल्या मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, कोलकाता, अलाहाबाद, चेन्नई यासारख्या मोठ्या शहरांशी रेल्वेमार्गाने जोडलेले आहे. जळगाव जिल्ह्यात भुसावळ, चाळीसगावपाचोरा हे ही रेल्वे जंक्शने आहेत, त्यांपैकी भुसावळ रेल्वे स्थानक हे महाराष्ट्रातले मोठे जंक्शन म्हणून ओळखले जाते.[ संदर्भ हवा ]

हवाई मार्ग

संपादन

जळगाव शहरात विमानतळ आहे. [ संदर्भ हवा ]

रस्ते

संपादन

जळगाव शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ (सुरत-धुळे-मुक्ताईनगर-नागपूर) जातो. तसेच जिल्ह्यातली महत्त्वाची शहरेही राज्य महामार्गांनी जोडली गेली आहेत.

लोकजीवन

संपादन

जळगावात मराठी बोलली जाते. बहुतेक लोक खान्देशी ही भाषा बोलतात. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कविता याच भाषेत आहेत. अनेकजण मराठी ऐवजी अहिराणी नावाची बोलीभाषा बोलतात. काही ठिकाणी वऱ्हाडी बोली भाषा सुद्धा बोलली जाते.[ संदर्भ हवा ]

संस्कृती

संपादन

रंगभूमी

संपादन

चित्रपटगृहे

संपादन

जळगाव अनेक मल्टिप्लेक्स आहेत. त्यांत मराठी, हिंदी भाषा व इंग्रजी चित्रपट दाखविले जातात. जळगाव स्थानकाजवळील रीगल, मेट्रो, नटवर इत्यादी मल्टिप्लेक्स आहेत. मराठी चित्रपट प्रामुख्याने अशोक आणि राजकमल या चित्रपटगृहांत पहायला मिळतात. आयनाॅक्स,PVR छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह, बालगंर्धव खुलं नाटयगृह

मंदिरे

संपादन
  • बालाजी मंदिर (पारोळा)
  • संत मुक्ताई
  • चांगदेव
  • खान्देश निवासिनी माता मनुदेवी
  • ओंकारेश्वर मंदिर
  • श्री राम मंदिर, संस्थान (जुने जळगाव)
  • पद्मालय
  • सप्तशृंगी माता मंदिर शिरागड़ (लहान गड)
  • मंगळग्रह मंदिर (अमळनेर)
  • पाटणादेवी मंदिर (चाळीसगाव)
  • मनुदेवी मंदिर
  • हरेश्वर मंदिर, चोपडा.
  • श्री काळ भैरव मंदिर ,चांदसणी

गणपती मंदिर जुने जळगाव

खाद्यसंस्कृती

संपादन

जळगावचे वांग्याचे भरीत आणि बाजरीची भाकरी, खापरावरची पुरणपोळी तसेच केळी वेफर्स, शेव भाजी प्रसिद्ध आहे. याचबरोबर सणासुदीच्या वेळी देण्यात येणाऱ्या भंडाऱ्यात बनणारी वरण बट्टी आणि वांग्याची घोटलेली भाजीही खूप प्रसिद्ध आहे.[ संदर्भ हवा ]

वर्तमानपत्रे

संपादन

प्राथमिक व विशेष शिक्षण

संपादन

शेठ लालजी नारायणजी सार्वजनिक विद्यालय जळगाव

जळगावातील महत्त्वाची महाविद्यालये

संपादन
  • जि. प. विद्यानिकेतन कनिष्ट महाविद्यालय
  • नूतन मराठा महाविद्यालय
  • मुळजी जेठा महाविद्यालय

अभियांत्रिकी महाविद्यालये

संपादन

वैद्यकीय महाविद्यालये

संपादन

1) गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज (GMC) 2) गोदावरी मेडिकल कॉलेज 3) चैतन्य आयुर्वेद कॉलेज 4) चामुंडामता होमिओपॅथी कॉलेज

व्यवस्थापन महाविद्यालये

संपादन
  • KCE's Institute of Management and Research

college of social work (Dncvp)

संशोधन संस्था

संपादन

केळी संशोधन केन्द्र आणि तेलबिया संशोधन केन्द्र जळगावला आहे

सॉफ्टबॉल, खो-खो,सॉफ्ट टेनिस, फुटबॉल, कब्बड्डी, क्रिकेट, कुस्ती, मुष्टियुद्ध, बैडमिंटन,लॉन टेनिस, हॉकी, टेबल टेनिस इत्यादी प्रसिद्ध

पर्यटन स्थळे

संपादन

उनपदेव-सुनपदेव हे गरम पाण्याचे झरे, जळगाव पासून 35 किमी अंतरावरील सातपुडा पर्वतातील मनुदेवी मंदिर पालयावल अभयारण्ये, पद्मालय येथील गणेश मंदिर, चाळीसगाव तालुक्यातील कालीमठ, पाटणादेवी, वालझिरीगंगाश्रम, पाल ही थंड हवेची ठिकाणे. त्याचप्रमाणे जळगाव मधील भाऊंचे उद्यान देखील प्रसिद्ध आहे.

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन