पाचोरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर आणि पाचोरा तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. पाचोरा हे हिवरा नदीकाठी वसलेले आहे. त्यात 25 नगरपालिकेच्या सदस्यांसह 25 प्रभागांचा समावेश आहे. पाचोरा येथे 95 ग्रामपंचायतीसह एक मोठी ग्रामीण पायाभूत सुविधा आहे जी महाराष्ट्रातील इतर कोणत्याही तहसील ठिकाणापेक्षा सर्वात मोठी आहे. मध्य पाचोरा हा जळगाव लोकसभा मतदारसंघांतर्गत आहे.

  ?पाचोरा

महाराष्ट्र् • भारत
टोपणनाव: पाचोरे
—  तालुका  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
१८.३५ चौ. किमी
• २६१ मी
अंतर
मुंबई पासून
जळगाव पासून

• ३२५ किमी
• ४४ किमी
जवळचे शहर चाळीसगाव
जिल्हा जळगाव
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
साक्षरता
• पुरूष
• स्त्री
५९,६०९ (२०११)
• ३,२४८/किमी
१.०८ /
८२.१५ %
• ८६.६७ %
• ७७.३३ %
भाषा मराठी
बोलीभाषा अहिराणी,मराठी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४२४२०१
• +०२५९६
• एमएच-१९दळण वळण संपादन

पाचोरा शहर हे लोहमार्ग व राज्य महामार्गांनी इतर शहरांशी जोडलेले आहे. लोहमार्गावरील भुसावळनजीक असलेले हे मध्य रेल्वेवरील मुंबई-दिल्ली मार्गावरील एक जंक्शन स्टेशन आहे. पाचोरा ते जामनेर नॅरो गेज (narrow gauge) रेल्वे मार्ग आहे. महाराष्ट्र राज्य महामार्ग क्र. १९ (मालेगाव-चाळीसगाव-भडगाव-पाचोरा-पहूर) व महाराष्ट्र राज्य महामार्ग क्र. १८४ (जळगाव-पाचोरा-सिल्लोड) यांनी हे शहर जोडले गेले आहे.

भूगोल संपादन

पाचोरा तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ ८१३ चौर.किमी. आहे, तर शहराचे क्षेत्रफळ १८.३५ चौ.किमी. आहे. पाचोरा तालुक्याच्या उत्तरेस जळगाव, पुर्वेस जामनेर, दक्षिणेस सोयगाव तर पछ्शिमेस भडगाव व एरंडोल हे तालुके आहेत.

पर्यटन संपादन

उद्योग संपादन

कृषी संपादन

केळी व कापुस हे मुख्य कृषी उत्पादने घेतली जातात.

बाह्य दुवे संपादन