डोंबिवली

महाराष्ट्रातील कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राचा मोठा भाग असलेले उपनगर.

डोंबिवली हे महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यामधील एक मोठे शहर व कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राचा प्रमुख भाग आहे. विस्तारित मुंबई महानगर क्षेत्रामधील प्रमुख ठिकाण असलेल्या डोंबिवलीची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १२,४६,३८१ इतकी आहे. डोंबिवली हे स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या टप्प्यात निवडले गेले आहे.

  ? डोंबिवली

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

१९° १३′ ०६.३६″ N, ७३° ०५′ १२.१८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
अंतर
मुंबई पासून

• ५० किमी
जिल्हा ठाणे
लोकसंख्या १२,४६,३८१ (२०११)
विधानसभा मतदारसंघ डोंबिवली
कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• +०२५१
• एम.एच.०५

डोंबिवली शहर हे खालील चार गावांनी वेढलेले आहे-

१. पश्चिम - चोळेगांव २. पूर्व - आयरेगांव ३. दक्षिण - पाथर्ली ४, उत्तर - ठाकुर्ली

इतिहास

संपादन

इ.स.१०७५ सालच्या राजा हरपाल देव याच्या शिलालेखात डोंबिवलीचा उल्लेख आढळतो. हा शिलालेख तुर्भे बंदराजवळ माहूल या गावात आहे. त्यावरून असे वाटते की, डोंबिवली हे इ. स.१३ व्या शतकापासून अस्तित्वात आहे. डोंबिवली शहराला ६०० वर्षाचा इतिहास आहे. जेव्हा पोर्तुगीज डोंबिवलीमध्ये आले, तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपले तळ उभारले होते. इ.स.१७३० मध्ये पेशवेकाळात डोंबिवलीचा उल्लेख आढळतो. १९ व्या शतकात डोंबिवलीतील शेतकरी भात पिकवत असत आणि कल्याण ते मुंबई येथे त्याची विक्री करत असत. डोंबिवली शहराला त्याचे नाव तेथील मूळ निवासी 'डोंब' लोकांपासून मिळाले आहे.

प्रशासन

संपादन

०१ ऑक्टोबर १९८३ साली डोंबिवली नगरपालिका आणि कल्याण नगरपालिका मिळून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (क.डों.म.पा.) स्थापन करण्यात आली. १९९५ साली लोकप्रतिनिधी (नगरसेवक) राजवट सुरू झाली. डोंबिवलीचे पहिले आमदार म्हणून भाजपचे श्री. रवींद्र चव्हाण यांची २००९ साली आणि राज्यमंत्री म्हणून २०१६ साली निवड झाली. २०१७ला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. डोंबिवली हे कल्याण लोकसभा मतदारसंघात असून डॉ.श्रीकांत शिंदे हे विद्यमान (सन २०१४ ते २०१९) खासदार होते.

लोकजीवन आणि संस्कृती

संपादन
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बाजीप्रभू चौक, डोंबिवली पूर्व

डोंबिवलीला प्रामुख्याने मराठी भाषिकांचे, मराठी संस्कृतीचे शहर मानले जाते. हिचा महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून गौरव होतो. पु.ल. देशपांडे एकदा म्हणाले होते की, डोंबिवलीत अनेक 'कार' आहेत. चित्रकार, संगीतकार, कलाकार, पत्रकार, वगैरे. तर, अनिल अवचट म्हणतात की, डोंबिवली ही एक बेडरूम कम्युनिटी आहे, कारण लोक कामानिमित्त दिवसभर मुंबईत असतात आणि रात्री फक्त झोपायला घरी येतात.

नववर्ष स्वागत शोभायात्रा

संपादन

[] डोंबिवलीमधील गुढीपाडव्याला होणारी शोभायात्रा हा सांस्कृतिक सोहळा उल्लेखनीय आहे. या उत्सवाची सुरुवात इ.स.१९९९ मध्ये झाली. ही शोभायात्रा हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याला आयोजित केली जाते. ही शोभायात्रा भागशाळा मैदानातून सुरू होऊन फडके रोड येथे समाप्त होते. डोंबिवलीत दिवाळी, गणेशोत्सव, नवरात्र हे सणदेखील उत्साहाने साजरे केले जातात.

डोंबिवलीकर : एक सांस्कृतिक परिवार

संपादन

संपादक नामदार रवींद्र चव्हाण यांनी २७ मार्च २००९ रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर डोंबिवलीकर : एक सांस्कृतिक परिवार या नावाने मासिक सुरू केले. कुठल्याही राजकीय व हॉट विषयाला हात न घालता मासिक चालू ठेवायचे हा निर्णय आजही ठाम आहे. डोंबिवलीच्या साहित्य विश्वातील दिग्गज आमचे शन्ना, आबासाहेब पटवारी, ज्येष्ठ पत्रकार श्री. सुधीर जोगळेकर, कै. सुरेंद्र बाजपेई सर अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत डोंबिवलीकर मासिकाची सुरुवात झाली. २०१९ हे या मासिकाचे दशकपूर्ती वर्ष. डोंबिवलीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे वर्षभर सुरू असणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होय. गुढी पाडवाच्याच दिवशी आदर्श डोंबिवलीकर पुरस्कारप्रदान समरांभ होतो. त्यादिवशी तसेच दर्जेदार कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम असे अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम होतात.

जसा मुंबईकर, पुणेकर तसाच डोंबिवलीत राहणारा 'डोंबिवलीकर'. सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक चळवळीचे केंद्र म्हणून डोंबिवलीची ओळख आहे. अनेक व्यक्ती, संस्था संघटना यांच्या कार्यातून आज डोंबिवलीचे नाव सर्वश्रुत आहे. २७ मार्च २००९ला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर 'डोंबिवलीकर' नावाचा 'ब्रॅण्ड' उदयाला आला. नंतर या परिवाराच्या माध्यमातून या परिवाराचे वेगळेपण असेसं की 'डोंबिवलीकर' हे एक सर्वसमावेशक असे कुटुंब आहे.

डोंबिवलीकर मासिक, डोंबिवली नगरीचे प्रतिबिंब ठरलेली डोंबिवलीकर दिनदर्शिका, दिवाळी अंक, याचबरोबर विविध कलागुणांना वाव देणारे 'डोंबिवलीकर-एक सांस्कृतिक परिवार' असे खुले व्यासपीठ उभारले आहे. विशेष म्हणजे डोंबिवलीकर ही संपूर्णपणे अराजकीय पण सांस्कृतिक चळवळ आहे. राजकारणातील ब्र इथे उच्चारला जात नाही की लिहिला जात नाही.

डोंबिवलीकर दरवर्षी गुढीपाडव्याला म्हणजेच 'डोंबिवलीकर'च्या वर्धापनदिनाला डोंबिवली नगरीतील विविध क्षेत्रांतील ५० मान्यवरांना त्यांनी मिळवलेल्या यशासाठी, केलेल्या अतुलनीय कामगिरीसाठी 'आदर्श डोंबिवलीकर' हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करत असतो. डोंबिवलीकर परिवाराने वेळोवेळी डोंबिवलीच्या बाहेरच्या कलाकारांना, त्यांनी मिळवलेल्या यशासाठी त्यांचा जाहीर सन्मान करण्याची प्रथा सुरू केली. या प्रथेला अनुसरून डोंबिवलीकर परिवाराने आतापर्यंत प्रशांत दामले यांच्यासारख्या अनेक कलाकारांचा सत्कार केला आहे.

डोंबिवलीसारख्या कलासक्त नगरीतील लोकांचा कलाविषयक दृष्टिकोन लक्षात घेऊनच 'डोंबिवलीकर' परिवाराने २०१४ साली 'गुलाब प्रदर्शन' भरवले होते. त्याला दाखवलेला जनतेचा विशेषतः महिला वर्गाचा उत्साह व मिळालेला सहभाग पाहूनच डोंबिवलीकरने डोंबिवलीत 'रोझ सोसायटी'ची स्थापना करून नागरिकांना या क्षेत्रातील सर्व घडामोडींची माहिती मिळण्याची व्यवस्था केली.

उद्योग

संपादन

डोंबिवलीच्या औद्योगिक भागात (एम.आय.डी.सी.) विविध कारखाने आहेत. यात तैलरंग, औद्योगिक आणि शेतीसाठी लागणारी रसायने यांचा समावेश होतो. या भागात जड धातूची सामग्री बनवणारे कारखानेदेखील आहेत. काही प्रमुख औद्योगिक संस्था जसे घरडा केमिकल, विको लॅब, लॉईड स्टील, दीपक फर्टिलायझर यांचे उत्पादन कारखाने या ठिकाणी आहेत. डोंबिवली हे महाराष्ट्रातील एक प्रदूषित शहर आहे.

वाहतूक

संपादन

रेल्वे

डोंबिवली रेल्वे स्थानक हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य रेल्वेमधील एक महत्त्वाचे स्थानक आहे. सकाळी आणि संध्याकाळी डोंबिवली स्थानकात भरपूर गर्दी असते. मध्य रेल्वेवरील सर्व जलद आणि धीम्या गतीच्या लोकल डोंबिवली स्थानकात थांबतात.डोंबिवली, कोपर, ठाकुर्ली ही मध्य रेल्वे लोकलची एकूण तीन स्थानके डोंबिवली शहराच्या हद्दीत आहेत.

बस

डोंबिवलीमध्ये के.डी.एम.टी.ची(कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिवहन) सार्वजनिक बससेवा चालवते. डोंबिवली राज्य महामार्गाने पनवेल, बदलापूर आणि कल्याण या शहरांना जोडलेले आहे.घनश्याम गुप्ते रोड हा डोंबिवली पश्चिम येथील एक रस्ता आहे.[] एन.एम.एम.टी.ची (नवी मुंबई महानगरपालिका परिवहन) डोंबिवली ते नवी मुंबई अशी बसची सोयही आहे.

एन.एम.एम.टी. मार्ग क्रमांक. मार्ग
एन.एम.एम.टी. ४१ वाशी रेल्वे स्थानक ते डोंबिवली आणि परत
एन.एम.एम.टी. ४२ वाशी रेल्वे स्थानक ते डोंबिवली आणि परत
एन.एम.एम.टी. ४४ खारघर (वास्तु विहार) ते डोंबिवली आणि परत

शाळा आणि महाविद्यालये

संपादन

शाळा

१. ईरा ग्लोबल हायस्कूल

२. के.बी.वीरा स्कूल

३. गुरुकुल हायस्कूल

४. स. है. जोंधळे विद्यालय

५. टिळकनगर विद्यालय

६. डॉन बॉस्को स्कूल

७. पाटकर विद्यालय

८. ब्लॉसम सी.बी.एस.ई.स्कूल

९. महिला समिती विद्यालय

१०. मॉडेल इंग्लिश हायस्कूल

११. लोढा वर्ल्ड स्कूल

१२. विद्यानिकेतन हायस्कूल

१३. स.वा.जोशी विद्यालय

१४. साठ्ये कन्या विद्यालय

१५. सिस्टर निवेदिता हायस्कूल

१६. स्वामी विवेकानंद विद्यालय

१७. अभिनव विद्यालय

१८. ओमकार इंटरनॅशनल हायस्कूल

१९. गार्डियन हायस्कूल

२०. सेंट तेरेसा स्कूल

२१. ट्री हाऊस स्कूल

२२. डॉन बॉस्को हायस्कूल

२३. केंब्रिज इंग्लिश हायस्कूल

२४. रॉयल इंटरनॅशनल स्कूल

२५. सेंट जोसेफ स्कूल

२६. मढवी विद्यालय आणि महाविद्यालय

२७. सखाराम शेठ विद्यालय

२८. होली एंजल्स स्कूल

२९. महानगरपालिका विद्यालय

३०. सेंट जॉन हायस्कूल

३१. आर.बी.टी. विद्यालय

३२. न्यू एरा हायस्कूल

३३. मंजुनाथ विद्यालय

३४. संत ज्ञानेश्वर विद्यालय

३५. शंकेश्वर विद्यालय

३६. आर.व्ही. नेरुरकर हायस्कूल

३७. महात्मा गांधी विद्यामंदिर

३८.श्री गणेश विद्या मंदिर

महाविद्यालये

१. टिळकनगर महाविद्यालय

२. के.व्ही. पेंढरकर महाविद्यालय

३. प्रगती कॉलेज

४. महिला महाविद्यालय

५. मॉडेल कॉलेज

६. स.वा.जोशी कनिष्ठ महाविद्यालय

७. शिवाजीराव जोंधळे अभियांत्रिकी महाविद्यालय

८. रॉयल कॉलेज

संदर्भ

संपादन
  1. ^ शोभायात्रा समारंभ http://epaper.dnaindia.com/story.aspx?id=42836&boxid=9736&ed_date=2013-04-06&ed_code=820059&ed_page=1
  2. ^ महाराष्ट्र टाईम्स,२३ एप्रिल २०२४.