शिलालेख म्हणजे दगडावर अथवा शिळेवर कोरून ठेवलेला मजकूर. लिखित मजकूर अनंत कालपर्यंत टिकून रहावा म्हणून तो दगडी शिळेवर कोरून ठेवायची प्रथा आस्तित्वात होती.पुरातत्त्व शास्त्रात याला पुराभिलेख असे म्हटले जाते.[१] राजकीय, धार्मिक व सामाजिक आणि ऐतिहासिक माहिती मिळविण्याच्या दृष्टीने असे कोरीव लेख अत्यंत उपयुक्त असतात.[२] शिलालेखातील व्यक्ती नावाच्या आणि अक्षरांच्या वळणावरून त्यांचा काल ठरविता येतो.

मंदिरातील ओवरी मध्ये असलेला शिलालेख.
शेजघराच्या खिडकीखाली असलेला शिलालेख..
गाभाऱ्याच्या वरच्या बाजूला असलेला शिलालेख.

संस्कृत,प्राकृत, पाली, वा अन्य आर्य- भारतीय भाषांमध्ये लिहिलेली शिलालेख आढळून येतात.[३]

स्वरूप

संपादन

सर्वात जास्त शिलालेख हे ऐतिहासिक प्राचीन बौद्ध लेण्यात सापडतात. या लेखांमधील मजकूर अनेकदा राजाज्ञा किंवा दानवर्णनपर असतो. ठाणे जिल्ह्यातील सोपारा येथे किंवा विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील देवटेक येथे सापडलेले मौर्य अशोकाचे शिलालेख हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन शिलालेख होत.[४]

शिलालेखांवरील मराठी पुस्तके

संपादन
  • महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार : शिलालेख आणि ताम्रपट (प्रा. कल्पना रायरीकर, डॉ. मंजिरी भालेराव)


हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ चितळे, श्रीपाद केशव (2016-06-25). Nanyanshi Sanwad / Nachiket Prakashan: नाण्यांशी संवाद. Nachiket Prakashan.
  2. ^ Sircar, D. C. (2017-02-07). Inscriptions of Asoka (इंग्रजी भाषेत). Publications Division Ministry of Information & Broadcasting. ISBN 9788123024523.
  3. ^ Salomon, Richard (1998-12-10). Indian Epigraphy: A Guide to the Study of Inscriptions in Sanskrit, Prakrit, and the other Indo-Aryan Languages (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. ISBN 9780195356663.
  4. ^ Bhagvat, Rajaram Sakharam (1966). Bhāratīya sãskr̥ti va Samrāṭ Aśoka. Marāṭhi Thiāsaphikala Feḍareśana Prakāśana.