इतिहासाच्या अभ्यासाची साधने

भूतकाळाविषयी माहिती देणारी साधने

इतिहासाचे लेखन आणि अभ्यास हा भूतकाळासंबंधी माहिती देऊ शकणाऱ्या विविध साधनांवर अवलंबून असतो. भूतकाळाविषयीची माहिती ज्यातून मिळू शकते अशा साधनांना इतिहासाच्या अभ्यासाची साधने म्हणता येते. भूतकाळाविषयी माहिती देणारी अशी साधने विविध स्वरूपाची असतात. त्यांचे वर्गीकरण विविध निकष लावून करण्यात येते. भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय व्यक्ती समाज स्थळ आणि काळ हे चार घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असतो या पुराव्यांना इतिहासाची साधने असे म्हणतात. साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करता येते. त्याचप्रमाणे इतिहासात साधनांचे मुल्यमापन देखील केले जाते. ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो. त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घेतला जातो, ही साधने तपासून घेणे गरजेचे असते.त्याचा अस्सलपणा तपासावा लागतो. या साधनांचा तारतम्याने व चिकित्सकपणे वापर करणे आवश्‍यक असते.

डावीकडे, शिवछत्रपतींचे २२ सप्टें १६७८ रोजीचे पत्र, मोडी प्रत
उजवीकडे, त्याचे देवनागरी लिप्यंतर
शिवछत्रपतींचे २२ सप्टें १६७८ रोजीच्या पत्राची मूळ मोडी प्रत व त्याचे देवनागरी लिप्यंतर. मराठेशाहीच्या अभ्यासात अशी मोडी लिपीतील पत्रे प्राथमिक साधनांमध्ये मोडतात व त्यांचे अभ्यासाच्या दृष्टीने महत्व जास्त समजले जाते.


    • कोरीव लेख : १)शिलालेख २)स्तंभालेख ३)ताम्रपट

इतिहासाची प्रमाण साधने

संपादन
  • कागदपत्रांचा आधार
  • शासकीय आदेश व कागदपत्रे
  • राजाने काढलेली फर्माने
  • आज्ञापत्रे,
  • करारनामे,
  • तहनामे
  • आपापसातील पत्रव्यवहार
  • पोलीस व न्यायखात्याचे अहवाल
  • प्रत्यक्ष सहभागी व्यक्तीचा पत्रव्यवहार
  • शासकीय इतिवृत्ते
  • पुरातत्त्वीय साधने

(१) प्राचीन वास्तूंचे अवशेष (२) मातीची खापरे (३) बौद्ध विहार( लेण्या) (४) अलंकार (५) मंदिर (६) मूर्ती (७) शिलालेख (८) ताम्रपट (९) नाणी (१०) अभिलेख(११) प्राण्यांची हाडे(12) जळालेले धान्य (१३)मानवी हाडे(१४) अश्मयुगीन दगडी हत्यारे

दुय्यम साधने

संपादन
कृष्णाजी अनंत हिरेपारखी तथा 'सभासद' विरचित सभासद बखरीतील एक पान. डावीकडे, मूळ मोडी लिपीतील प्रत व उजवीकडे, त्याचे देवनागरी लिप्यंतर. बखरी या साधारणतः दुय्यम साधने समजली जात असली तरी, 'सभासद' हा शिवछत्रपतींचा दरबारी असून समकालीन व प्रत्यक्षदर्शी होता. आणि याच कारणामुळे या बखरीला एक वेगळे महत्व आहे जे इतर उत्तरकालीन बखारींना नाही.
  • तवारिखा,
  • बखरी,
  • पोवाडे,
  • स्रोत्रे
  • प्रवास वर्णने
  • कुळकरी
  • शकावल्या
  • ऐतिहासिक काव्ये
  • म्हणी
  • महजर/कारीने
  • वंशवेली
  • मुलाखती

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन

दक्षिण आशिया ग्रामीण आणि शेती इतिहास

इतिहासाच्या अभ्यासाची साधने ह्या विषयावर अधिक लेखन हवे आहे. त्यासाठी गरज पडल्यास Historical method ह्या लेखातून मजकूर भाषांतरित करून घ्यावा.