सोलापूर जिल्ह्यातील शिलालेख

पुराभिलेख

संपादन

प्राचीन काळी लिहिलेला मजकूर म्हणजे पुराभिलेख. कोरीव लेखांचा अभ्यास म्हणजे पुराभिलेखविद्या. प्राचीन काळी भारतीय लोक प्रस्तर, शिला, धातू, काष्ठ यांचे स्तंभ, धातूंचे पत्रे, भांडी, विटा, शिंपले, हस्तिदंती मुद्रा इत्यादी वस्तूंवर लेख लिहीत असत. कोरीव लेखांचे ढोबळ मानाने दोन प्रकार पडतात :१)राज्यकर्त्याने अगर राज्यकर्त्याच्या वतीने लिहिलेले लेख; २)खाजगी व्यक्तींनी अगर संस्थांनी लिहिलेले कोरीव लेख. आलेखांचे शिलालेख, स्तंभालेख आणि ताम्रपट असे तीन प्रकार आहेत. राजाच्या विशिष्ट कर्तृत्वाचा गौरव चिरस्थित करण्यासाठी लिहिलेल्या लेखाला प्रशस्ती असे म्हणतात. राजाने दिलेल्या भूमिदानासंबंधीचे कोरीव लेख बहुधा तांब्याच्या पत्र्यावर (ताम्रपटावर) लिहीत असत.

प्राचीन भारतातील लेखनकलेचे पुरावे

संपादन

भारतीय विद्वानाच्या मते भारतीय लोकांना लेखनकला ज्ञात होती.त्या लिपीचे नाव ब्राह्मी असे आहे. या लिपीतील एक अक्षरचिन्ह एकाच ध्वनी सूचित करते अशी ही निर्दोष लिपी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने निर्माण केली, अशी भारतामध्ये सर्वसामान्य समजूत आहे. हिंदू, बौद्ध आणि जैन ग्रंथांत प्राचीन लेखनकलेचे पुरावे मिळतात. प्रस्तर, मातीच्या विटा, तांबे, सुवर्ण, रुपे, कासे, पितळ, शंख, ताडपत्र, भूर्जपत्र, कागद, कापड, लाकडी फलक यांचा लेखनासाठी उपयोग करीत असत.

सोलापूर जिल्ह्यातील शिलालेख

संपादन

हे लेख मराठी,कन्नड आणि फारसी भाषांत असून मोडी, देवनागरी, कन्नड आणि फारसी लिपींतून लिहिलेले आहेत. या शिलालेखांतील मजकुराचा उलगडा सोलापूर येथील शिलालेखतज्ज्ञ आनंद कुंभार आणि धारवाड विद्यापीठातील डॉ.श्रीनिवास रित्ती यांनी केला आहे. आनंद कुंभार यांनी मराठी भाषेतील शिलालेखांचे वाचन केले तर डॉ श्रीनिवास रित्ती यांनी कन्नड भाषेतील लेखांचे वाचन केले .सोलापूर जिल्ह्यामध्ये चालुक्य ,राष्ट्रकूट ,शिलाहार , विजापूरचे आदिलशाह ,अहमदनगरचे निजामशहा आणि यादव वंशातील राजांचे शिलालेख आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील हत्तरसंग कुडल तालुका दक्षिण सोलापूर येथे श्री संगमेश्वर मंदिरातील तुळईवर आद्य मराठी शिलालेख श्री आनंद कुंभार यांनी वाचन करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधनपर लेख लिहून त्याला मान्यता मिळविली आहे .

संदर्भ:[] संदर्भ:[] ३. संदर्भ दैनिक लोकसत्ता मध्ये 27 फेब्रुवारी 2022रोजी प्रसिद्ध झालेला लेख

  1. ^ शोभना गोखले, पुराभिलेखविद्या, काँटिनेन्टल प्रकाशन, पुणे, १९७५
  2. ^ आनंद कुभार 'सशोधन तंरग' ,मुबई