लेखन पद्धती

अक्षरातरन
(लेखन या पानावरून पुनर्निर्देशित)
  • छापलेला उतारा वहीत पाहून लिहिणे याला अनुलेखन म्हणतात
  • श्रुत लेखन ऐकलेला मजकूर जश्याच तसा सुवाच्य अक्षरात बिनचूक लिहिणे याला श्रुत लेखन असे म्हणतात

सर्वसाधारण माहितीसंपादन करा

यशस्वी पणे वाचण्याकरिता अथवा समजण्याकरिता लेखन पद्धतीस संबंधित भाषां/भाषेचा आधार असावा लागतो या अर्थाने लेखन पद्धती इतर संकेतचिन्हपेक्षा वेगळी असते. जसे गणिती संकेतचिन्हास,माहिती संकेतचिन्ह,नकाशे संकेतचिन्ह भाषां/भाषेचा आधार आवश्यक नाही.

भाषा हा मानवी समुदायाचा अंगभुत घटक आहे.परंतु सबंध मानवी इतिहासात लेखन पद्धतीचा विकास आणि वापर ही तुरळक प्रमाणातच झाला.

लेखन पद्धतीचा एकदा वापर सुरू झाला कि मात्र संबधीत भाषेतील बदला पेक्षा लेखन पद्धती सावकाश बदलते. त्यामूळे लेखनपद्धती कालांतराने भाषेच्या वापरातुन गेलेल्या पद्धती व नियमांचा, चिन्हांना बाळगुन ठेवते. लेखन पद्धतीचा मोठा फायदा माहितीचे जतन होते.

सर्व लेखन पद्धती खालील घटकांचा आधार लागतो:-

  • सुसंबद्ध मूळ घटक चिन्हांचे क्रमास,त्यांच्या परस्परातील संबधास, अर्थ देणारे नियम व परंपरांचा भाषा समुदायाचा वापर,
  • सुसंबद्ध मूळ घटक चिन्हांचे क्रमास,त्यांच्या परस्परातील संबधास नियमना अर्थ देउन भाषा (साधारणता बोलली जाणारी/गेलेली) अभिव्यक्त होणे
  • स्थायी अथवा तात्पुरत्या प्रत्यक्ष (मुख्यत्वे दृष्य) माध्यमांचा वापर(कागद,वृक्षपाने,पाटी इ.).[ब्रेल हे दृष्य माध्यम नाही]