घनश्याम गुप्ते ह्यांचा जन्म १८८१ साली झाला. प्राथमिक शिक्षण वसई येथे झाले. १९१२ साली ते डोंबिवली येथे राहावयास आले. स्वातंत्र्यापूर्वी डोंबिवलीत पाण्याची टंचाई होती. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी तामिळनाडू येथे भाषण करताना शहराजवळ असलेल्या गावात सुधारणा करण्यासाठी सूचना मागविल्या होत्या. घनश्याम गुप्तेंनी सूचना करणाऱ्या अर्जासोबत डोंबिवलीत पाणीटंचाईने हैराण झालेल्या नागरिकांची छायाचित्रे जोडली. त्या अर्जानुसार सरकारी अधिकारी येऊन पाहणी करून त्यांनी चोला पॉवर हाऊस मधून डोंबिवलीला पाणीपुरवठा केला. पुढेही गुप्तेंनी पाठपुरावा केला आणि डोंबिवलीला बदलापूरच्या पाईपलाईन मधून नियमित पाणीपुरवठा होऊ लागला. पुढे ते सरपंच झाले. त्यांना डोंबिवलीकरांनी पाणीवाले गुप्ते असे टोपणनाव दिले. डोंबिवली पश्चिम येथे त्यांच्या नावाने घनश्याम गुप्ते रोड आहे.[]

  1. ^ महाराष्ट्र टाइम्स, मंगळवार दिनांक २३ एप्रिल २०२४