सरपंच
ग्रामपंचायतीचा प्रमुख
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला सरपंच म्हणतात. सरपंच हा ग्रामपंचायतीचा अध्यक्ष किंवा सभापती म्हणून कारभार पहात असतो. त्याच्या मदतीला असतो ग्रामपंचायतीचा सेवक किंवा ग्राम-शिपाई व ग्रामसेवक.
- ह्या प्रकारची व्यवस्था भारतामध्ये ऐतिहासिकदृष्ट्या दीर्घकाळापासून अस्तित्वात आहे.
- ग्रामपंचायतींची स्थापना 1952 ला झाली आहे.[१]
कार्यकाल
संपादनसरपंचाचा कार्यकाल सामान्यतः ५ वर्षाचा असला, तरी गैरवर्तवणुकीच्या कारणावरून त्याला पदावरून पदच्युत करता येते.
व्यवस्था
संपादनमहाराष्ट्रात वसंतराव नाईक यांच्या शिफारशीनुसार १ मे १९६२ पासून ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद अशी त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था सुरू झाली.[२] त्या अन्वये गावातील प्रशासकीय अधिकार सरपंचाकडे आले.
- पंचायतराज व्यवस्थेच्या सबलीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने १८ जून १९८४ रोजी प्राचार्य पी.बी. पाटील यांची समिती स्थापन केली.
पंचायतराजचे पुनर्विलोकन करणाऱ्या या समितीची कार्यकक्षा व्यापक होती.
- जून १९८६मध्ये समितीने तिच्या शिफारशी राज्य सरकारला सादर केल्या.
- त्यात ग्रामपंचायतीचा प्रमुख असलेल्या सरपंचांची निवड थेट जनतेतून गुप्त मतदानाने करावी,
- तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी पंचायतराज व्यवस्थेकडे सोपवावी,
- महिला व बालकल्याण समिती स्थापन करावी,
अश्या अनेक क्रांतिकारी शिफारशी होत्या.
- ७३ वी घटनादुरुस्ती होण्यापूर्वीच या समितीने या क्रांतिकारी शिफारशी केल्या होत्या, परंतु राज्यकर्त्यांनी त्यांकडे दुर्लक्ष केले.
सरतेशेवटी, ७३ व्या घटनादुरुस्तीनंतर महाराष्ट्र राज्य सरकारने पंचायतराज व्यवस्थेच्या बळकटीकरणाबाबत पावले उचलली.
- सरकारने पाटील समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी तब्बल ३१ वर्षांनंतर केली.
संदर्भ
संपादन- ^ Misra, Suresh; Dhaka, Rajvir S. (2004). Grassroots Democracy in Action: A Study of Working of PRIs in Haryana (इंग्रजी भाषेत). Concept Publishing Company. p. 116. ISBN 9788180691072.
- ^ India, The Government of. Constitution of India.
- ^ info@biharprabha.com, Bihar Reporter :. "Over 8000 Village Courts in Bihar allotted Judicial Powers". The Biharprabha News (इंग्रजी भाषेत). 2018-10-13 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link)