गंगाधर बाळकृष्ण सरदार

गंगाधर बाळकृष्ण सरदार (जन्म : २ ऑक्टोबर १९०८; - १ डिसेंबर १९८८)[१] - हे मराठी लेखक होते.

गंगाधर बाळकृष्ण सरदार
जन्म नाव गंगाधर बाळकृष्ण सरदार
जन्म २ ऑक्टोबर १९०८
मृत्यू १ डिसेंबर १९८८
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
विषय समाज, संतसाहित्य

ते काही काळ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख होते. १९८० साली बार्शीत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते.

प्रकाशित साहित्य

संपादन
 • अर्वाचीन मराठी गद्याची पूर्वपीठिका (१९३७)
 • अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची
 • आगरकरांचा सामाजिक तत्त्वविचार (१९७५)
 • गांधी आणि आंबेडकर
 • धर्म आणि समाजपरिवर्तन (१९८२)
 • नव्या युगाची स्पंदने (१९८२)
 • नव्या ऊर्मी, नवी क्षितिजे (१९८७)
 • परंपरा आणि परिवर्तन (१९८८)
 • प्रबोधनातील पाऊलखुणा (१९७८)
 • महात्मा फुले - व्यक्तित्व आणि विचार (१९८१)
 • महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी (१९५१)
 • महाराष्ट्र जीवन (१९६०)
 • रानडेप्रणित सामाजिक सुधारणेची तत्त्वमीमांसा (१९७३)
 • रामदासदर्शन
 • संक्रमणकालाचे आवाहन (१९६६)
 • संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती (१९५०)
 • द सेंट पोएट्स ऑफ महाराष्ट्र : देअर इम्पॅक्ट ऑन सोसायटी (इंग्लिश) (१९६९)
 • ज्ञानेश्वर जीवननिष्ठा (१९७१)

संदर्भ आणि नोंदी

संपादन
 1. ^ संजय वझरेकर. "आजचे महाराष्ट्रसारस्वत". लोकसत्ता. मुंबई. १६ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन