अरुण साधू

मराठी भाषेतील एक लेखक

अरुण मार्तंडराव साधू (१७ जून, १९४१ - २५ सप्टेंबर, २०१७) हे मराठी भाषेतील लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक व समीक्षक होते. त्यांनी रशियातील तसेच भारतातील सामाजिक व्यवस्थांवर विवेचक लेखन केले आहे. ऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

अरुण साधू
जन्म नाव अरुण मार्तंडराव साधू
जन्म १७ जून, १९४१
परतवाडा, अमरावती
मृत्यू २५ सप्टेंबर, २०१७ (वय ७६)
मुंबई
शिक्षण गणित आणि भौतिकशास्त्र पदवी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र पत्रकारिता, मराठी साहित्य
भाषा मराठी, इंग्रजी
साहित्य प्रकार कादंबरी, कथासंग्रह
विषय विज्ञान, राजकीय, सामाजिक
प्रसिद्ध साहित्यकृती फिडेल चे आणि क्रांती, झिपऱ्या, मुंबई दिनांक, सिंहासन, तिसरी क्रांती लेनिन,स्टालिन ते गोर्बाचेव
वडील मार्तण्डराव साधू
पत्नी अरुणा साधू
अपत्ये सुवर्णा, शेफाली
पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार, न. चिं. केळकर पुरस्कार,

प्रकाशित साहित्य

संपादन

कादंबऱ्या

संपादन
  • झिपऱ्या
  • तडजोड
  • त्रिशंकू
  • बहिष्कृत
  • मुखवटा
  • मुंबई दिनांक
  • विप्लवा
  • शापित
  • शुभमंगल
  • शोधयात्रा
  • सिंहासन
  • स्फोट

कथासंग्रह

संपादन

एक माणूस उडतो त्याची गोष्ट । कथा युगभानाची (निवडक कथा - संपादिका मीना गोखले) । ग्लानिर्भवति भारत। बिनपावसाचा दिवस । बेचका आणि आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या इमारती। मंत्रजागर । मुक्ती

पडघम

ललित लेखन

संपादन

अक्षांश-रेखांश, तिसरी क्रांती, सभापर्व, सहकारधुरीण (चरित्र)

समकालीन इतिहास

संपादन
  • आणि ड्रॅगन जागा झाला
  • जेव्हा ड्रॅगन जागा होतो
  • फिडेल चे आणि क्रांती

शैक्षणिक

संपादन

संज्ञापना क्रांती

भाषांतर

संपादन

एकांकिका

संपादन

प्रारंभ, बसस्टॉप व इतर ३ एकांकिका

इंग्रजी

संपादन

The Pioneer (चरित्र)


पुरस्कार आणि सन्मान

संपादन
  • नागपूर येथील ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
  • कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार (फेब्रुवारी २०१५)
  • अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार (जानेवारी २०१७)

संदर्भ आणि नोंदी

संपादन

बाह्य दुवे

संपादन