श्रीपाल सबनीस यांचा जन्म हाडोळी (ता. निलंगा) येथे झाला. ते एम.ए. पीएच. डी. आहेत. ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे तौलनिक भाषा विभागात प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. विद्यापीठाच्या कला विद्याशाखेचे ते अधिष्ठाता होते. सबनीस मराठी लेखक, अभ्यासक व समीक्षक आहेत. जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून तौलनिक भाषा विभागप्रमुख आणि प्रोफेसर म्हणून निवृत्ती घेतल्यावर व कला विद्याशाखेचे डीन म्हणून काम केल्यावर ते प्राचार्य पदावरून रिटायर झाले.

सबनीस यांचे ६६ हून अधिक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. तसेच महाराष्ट्रातील लेखक व कवींच्या कवितासंग्रह, कांदबरी, नाटक, लेखसंग्रह, स्तंभलेखनसंग्रह इत्यादी तब्बल ३४६ हून अधिक वाड्‌मयीन पुस्तकांना त्यांच्या प्रस्तावना आहेत. महाराष्ट्रातील नामवंत नियतकालिकांत विविध विषयांवर त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत.८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (२०१६-२०१९) झाल्यानंतर त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात हजाराहून अधिक व्याख्याने झाली आहेत.

कौटुंबिक माहितीसंपादन करा

श्रीपाल मोहन सबनीस यांचे वडील मोहनराव पाटील (सबनीस) हे क्रांतिकारक होते. पूर्वीच्या हैद्राबाद स्टेटमधील निजामाच्या रझाकार सेनेशी तीनशे बंदुकांच्या हत्यारबंद टोळीसह लढणारे ते स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांच्या निलंगा तालुक्यातील हाडोळी येथील गढीवजा घरास रझाकारांनी वेढा दिला होता, तेव्हा त्यांनी हा लढा दिला.

श्रीपाल सबनीस यांनी लिहिलेली पुस्तकेसंपादन करा

  1. अण्णा भाऊ साठेलिखित 'फकीरा'ची समीक्षा
  2. आदिवासी प्रतिभावंतांचे मराठी साहित्य
  3. आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चन साहित्य मीमांसा
  4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची समाजक्रांती
  5. आंबेडकरी प्रतिभावंतांचे प्रज्ञाविलास
  6. आंबेडकरवाडी कवितेचा नवा गंध
  7. आम्ही भारतीय : २० वे राष्ट्रीय बंधुता संमेलन : अध्यक्षीय भाषण (संपादित ग्रंथ)
  8. इहवादी संस्कृती शोध
  9. उगवतीचा क्रांतिसूर्य
  10. उपेक्षितांची पहाट (ललित लेखन)
  11. ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन : अध्यक्षीय भाषण (संपादित ग्रंथ)
  12. ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन : अध्यक्षीय भाषणाचे इंग्रजीत भाषांतर (संपादित ग्रंथ)
  13. कलासंचित
  14. कॉलेज कॉर्नर (एकांकिका)
  15. क्रांती (एकांकिका, राज्यस्तरीय लेखन व प्रथम पुरस्कार)
  16. ख्रिस्तापर्णमस्तु (संपादित;अशोक आंग्रे गौरव ग्रंथ)
  17. गंधवेडी समीक्षा
  18. जीव रंगला रंगला (आत्मकथेचे रंग) (ललित लेखन)
  19. तौलनिक साहित्य आणि भाषांतर मीमांसा
  20. संत नामदेव तुकारामांचे सांस्कृतिक संचित
  21. नामदेवांचे संतत्त्व आणि कवित्व
  22. नारायण सूर्व्यांच्या कवितेची इहवादी समीक्षा
  23. परिवर्तनवादी प्रवाहाची तौलनिक समीक्षा
  24. प्रतिभावंत मराठी लेखिका
  25. प्रबोधनाचे कैवारी
  26. प्रबोधनपर्व (प्रा. विलास वाघ गौरवग्रंथ-संपादित)
  27. फ.म. शहाजिंदे यांची निवडक कविता (संपादित ग्रंथ)
  28. बृहन्महाराष्ट्राचे वाड्‌मयीन संचित
  29. ब्राह्मणी सत्यशोधक
  30. ब्राह्मणी सत्यशोधकाचे अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र
  31. भारतरत्न आणि बहिष्कृत भारत
  32. भारतीय प्रबोधन आणि नव-आंबेडकरवाद
  33. महाराष्ट्राच्या इतिहासातील स्त्रियांचे योगदान (संपादित ग्रंथ)
  34. मुक्तक (ललित लेखन)
  35. मुंबईला घेउन चला (वगनाट्य)
  36. ११ वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन : उद्घाटकीय भाषण (पनवेल) (संपादित ग्रंथ)
  37. यथार्थ : डाॅ. श्रीपाद भालचंद्र जोशी गौरवग्रंथ (संपादित)
  38. शिक्षण महर्षी बापुजी साळुंखे विचारवेध संमेलन : अध्यक्षीय भाषण (लोणी-काळभोर); (संपादित ग्रंथ)
  39. विद्रोही अनुबंध
  40. छत्रपती शिवाजी राजे आणि ब्राम्हण–ब्राम्हणेतर वाद : विवेकवादी भूमिका
  41. शुक्राची चांदणी (वगनाट्य)
  42. डॉ. श्रीपाल सबनीस यांची विद्रोही काव्यसमीक्षा
  43. संस्कृती स्पंदनाचा मराठी आलेख (संपादन)
  44. संचिताची चांदणवेल
  45. संत साहित्य आणि सेक्युलॅरिझम
  46. सत्यकथा-८२ (सुवर्णपदक विजेती एकांकिका)
  47. संस्कृती समीक्षेची तिसरी भूमिका
  48. साने गुरुजी विचार जागर
  49. साहित्य सौंदर्य : शोध आणि समीक्षा
  50. साहित्य संमेलनाध्यक्षाची आत्मकथा
  51. सेक्युलर वाङ्मयीन अनुबंध
  52. सेक्युलॅरिझम : प्रबोधनाचा मानदंड
  53. हिंदुत्व, मोदी आणि इस्लाम
  54. ज्ञानेश्वर ते आंबेडकर
  55. समतोल समीक्षा
  56. वाङ्मयीन गंध
  57. ईस्लामी संस्कृती आणि मुस्लीम मराठी साहित्य
  58. वारकरी संगीत आणि संचित
  59. बहुसांस्कृतिक व्यक्तीत्वाचे रंग-तरंग
  60. इतिहास आकलनाचे प्रयोग
  61. संतत्व आणि देवत्वाचा शोध
  62. माझ्या निवडक अध्यक्षीय भाषणाचे संचित
  63. नवी पालवी नवा गंध
  64. नवी पालवी नवा फुलोरा
  65. नवी पालवी नवा रंग
  66. कोरोना : विश्वयुद्धाची लढाई

श्रीपाल सबनीस यांच्यावरील व त्यांच्या साहित्यावरील ग्रंथसंपादन करा

  1. मानदंडात्मक संमेलनाध्यक्ष : डॉ. श्रीपाल सबनीस (संपादक - सचिन इटकर, महेश थोरवे, उद्धव कानडे)
  2. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या संमेलनाध्यक्षीय भाषणाचा इंग्रजी अनुवाद (डॉ. अ.नी. माळी आणि आशुतोष भूपटकर)
  3. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षीय भाषणाची मीमांसा (विवेक कांबळे)
  4. डॉ. श्रीपाल सबनीस प्रणीत प्रतिभा संगम : (संपादित, संपादक - संजय वाघ)
  5. डॉ. श्रीपाल सबनीस यांची विद्रोही समीक्षा {संपादक -डॉ. जितेंद्र गिरासे)
  6. विवेकवादी विचारवंत : डॉ. श्रीपाल सबनीस (संपादक - डॉ. सुरेश सावंत, डॉ. भूपटकर, डॉ. साबळे)

डाॅ. श्रीपाल सबनीस यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मानसंपादन करा

  1. पुण्यात भरलेल्या अंकुर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
  2. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पुणे, सासवड, आळंदी, परभणी, औरंगाबादमध्यप्रदेश साहित्य संमेलन भोपाळबऱ्हाणपूर- व अस्मितादर्श साहित्य संमेलन - इंदूर, देगलूर, धुळे, जळगाव, कळंब यांत सहभाग
  3. पिंपरी-चिंचवड येथे भररेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (इ.स. २०१५)
  4. अहिल्यादेवी पुरस्कार
  5. पहिले आदिवासी उलगुलान साहित्य संमेलन, चंद्रपूर (उद्‌घाटक)
  6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार
  7. काजरगा - कोल्हटकर ग्रामीण साहित्य संमेलनाचे ....? (२९ नोव्हेंबर २०१५)
  8. ग्रामीण साहित्य संमेलन, नामपूर, जि. नाशिक (उद्‌घाटक)
  9. स्वातंत्र्यसेनानी चारठाणकर पुरस्कार
  10. श्यामा प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार
  11. डी. डी. कोसंबी पुरस्कार
  12. पुणे मराठी ग्रंथालयाचा न.चिं. केळकर पुरस्कार
  13. न.वि. गाडगीळ पुरस्कार
  14. नारायण सुर्वे पुरस्कार
  15. निर्मलकुमार फडकुले पुरस्कार
  16. पॅथर रत्न पुरस्कार
  17. प्रबुद्ध रंगभूमी पुरस्कार
  18. प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार
  19. प्रियदर्शनी इंदिरा पुरस्कार
  20. बडोद्याच्या साहित्य परिषदेने भरवलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
  21. भास्कर भूषण पुरस्कार
  22. मॅक्झीम गॉर्की पुरस्कार
  23. महानुभावपंथीय महदंबा साहित्य संस्थेचा 'मनोहर स्मृती' पुरस्कार
  24. महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय 'आदर्श शिक्षक' पुरस्कार
  25. महात्मा फुले पुरस्कार
  26. पुणे विद्यापीठातर्फे सत्कार (३० नोव्हेंबर २०१५)
  27. पुण्यात भरलेल्या युवा साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनाचा मान
  28. युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट्स कमिशनचे अडीच लाख रुपयांचे 'रिसर्च अवॉर्ड'
  29. युसास साहित्य व समाज प्रबोधन संमेलन नाशिक (उद्‌घाटक)
  30. रयत शिक्षण संस्थेचा मुकादम पुरस्कार
  31. राष्ट्रीय एकात्मता संमेलन, एदलाबाद (अध्यक्ष)
  32. राष्ट्रीय संमेलन, भुसावळ (उद्‌घाटक)
  33. दुसरे विदर्भ साहित्य संस्कृती संमेलन, नागपूर (अध्यक्ष)
  34. एमआयटी (पुणे) यांनी भरवलेल्या संत साहित्य संमेलनाचा समारोप (३० नोव्हेंबर २०१५)
  35. सम्राट पुरस्कार
  36. संविधान रत्न पुरस्कार
  37. साताऱ्यातील ग्रंथ महोत्सवाच्या उद्‌घाटकपदाचा मान
  38. साहित्य व संस्कृती संमेलन, जळगाव (उद्‌घाटक)
  39. साहित्य भूषण पुरस्कार
  40. साहित्य रत्न पुरस्कार
  41. 'चला कवितेच्या बनात' संस्थेचा 'साहित्य साधना' पुरस्कार
  42. पुणे विद्यापीठ-संत नामदेव अध्यासनाचा 'स्वामी स्वरूपानंद सरस्वती' पुरस्कार
  43. बंधुता प्रतिष्ठान पुणे तर्फे ज्योती सावित्री पुरस्कार
  44. महाराष्ट्र शासनांचा यशवंतराव चव्हाण राज्य पुरस्कार
  45. अण्णा भाऊ साठे पुरस्कार
  46. सुभेदार रामजी आंबेडकर पुरस्कार
  47. १ ले संविधान जागर संमेलन, पुणे (अध्यक्ष)
  48. ग्रामीण साहित्य संमेलन, पलूस, सांगली (अध्यक्ष)
  49. राष्टीय बंधुता संमेलन , पुणे (अध्यक्ष)
  50. डॉ. आंबेडकर विचार संमेलन. सासवड (अध्यक्ष)
  51. असंघटीत कामगार संमेलन , भोसरी, पुणे(अध्यक्ष)
  52. रमाई महोत्सव, पुणे(अध्यक्ष)
  53. सामाजिक संघर्ष परिषद, कागल, (अध्यक्ष)
  54. पहिले व्हॉटस्अप साहित्य संमेलन, हडपसर,पुणे  (अध्यक्ष)
  55. डोंगरी साहित्य संमेलन, शिराळा (अध्यक्ष)
  56. ब्राम्हण -बहुजन साहित्य संमेलन , भुसावळ (अध्यक्ष)
  57. आंबेडकर विचार एकता संमेलन , जळकोट (अध्यक्ष)
  58. राष्ट्रीय एकात्मता संमेलन, पुणे(अध्यक्ष)
  59. जळगाव जिल्हा साहित्य संमेलन , एरंडोल (अध्यक्ष)
  60. साहित्य व संस्कृती संमेलन, जळगाव (उट्घाटक)
  61. बालसाहित्य संमेलन, जागडगाव, पाथर्डी (उट्घाटक)
  62. संविधान संमेलन, लंखादूर, जि. भंडारा (उट्घाटक)
  63. बसवेश्वरसाहित्य संमेलन, पुणे (उट्घाटक)
  64. कंबोडिया विश्व साहित्य संमेलन उद्घाटन
  65. डॉ. आंबेडकर साहित्य समेल्लन, निपाणी येथे (अध्यक्ष),
  66. १४ वे अखिल भारतीय वारकरी संगीत समेल्लन, पुणे(अध्यक्ष),
  67. शाहीर अण्णा भाऊ साठे संमेलन, पुणे (उद्घाटक) online प्रणालीनुसार
  68. जाणीव पुरस्कार
  69. ग्रामीण साहित्य संमेलन, पळसप-उस्मानाबाद (उद्घाटक)
  70. संत साहित्य संमेलन, अमरावती (उद्घाटक)
  71. आंतरराष्ट्रीयः शोषितांचे साहित्य संमेलन, कोरेगाव कॉलेज (उद्घाटक)
  72. राज्यस्तरीय पत्रकार संमेलन, पुणे (उदघाटक)
  73. विद्रोही चळवळीची फलश्रुती आंबेडकर फतिज नागपूर (उद्घाटक)
  74. ११ चे मुस्लीम साहित्य संमेलन, पनवेल (उद्घाटक)
  75. आंबेडकर साहित्य संमेलन, कळंब (उद्घाटक)
  76. संत तुकाराम साहित्य संमेलन, जरूड, अमरावती (उद्घाटक)
  77. संमेलनाध्यक्ष महासंमेलन, पुणे (उद्घाटक)
  78. संमेलनपूर्व साहित्य संमेलन, कला साहित्यिक प्रतिष्ठान, पुणे (उद्घाटक)
  79. कृषी साहित्य संमेलन, सातारा (उद्घाटक)
  80. अहिराणी साहित्य संमेलन, धुळे (उद्घाटक)
  81. चिमाजी आप्पा साहित्य संमेलन, वसई (उद्घाटक)
  82. गुरुकुल विश्वशांती संमेलन, पुणे (उद्घाटक)
  83. मोहमंद पैगंबर परिचय संमेलन, पिंपरी-पुणे (उद्घाटक)
  84. १ ले राष्ट्रीय आंबेडकरवादी संमेलन, चिमूर (उद्घाटक)
  85. जिल्हा साहित्य संमेलन, नंदुरबार (उद्घाटक)
  86. ग्रामीण संस्कृती साहित्य संमेलन, हिवरे बाजार (समारोप)
  87. कुमार साहित्य संमेलन- छात्र प्रबोधन, पुणे (समारोप)
  88. शाहिर परिषद, चिंचवड (समारोप)
  89. आंबेडकर कृषी संमेलन, (माणुसदरी, यवतमाळ) (समारोप)
  90. मराठवाडा साहित्य संमेलन, सोयगाव (समारोप)
  91. आचार्य अत्रे साहित्य संमेलन, सासवड (समारोप)
  92. अग्निपंख बुवा साहित्य संमेलन (समारोप)
  93. बहुभाषिक संमेलन, घुमान- पंजाब (सहभाग)
  94. आदिवासी धर्म स्थापना संमेलन, बदनामाल, गडचिरोली (सहभाग)
  95. विश्व पंजाबी संमेलन, पुणे (सहभाग)
  96. २० वे अ. भा. साहित्य संमेलन, डोंबिवली (सहभाग)
  97. मुस्लिम साहित्य संमेलन, जळगाव (सहभाग)
  98. अखिल भारतीय कथामाला अधिवेशन, ओझर (उद्घाटक)
  99. आण्णा भाऊ साठे जयंती शताब्दी संमेलन (पुणे) दूरदृश्यप्रणाली (उद्घाटक)
  100. ग्रामसाहित्य संमेलन, इचलकरंजी (उद्घाटक)
  101. समाजवादी विचारवंत जन्मशताब्दी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, पुणे (उद्घाटक)
  102. भारतीय साहित्य आणि मराठी साहित्य राष्ट्रीय बेबिनार, विरार कॉलेज, नागपूर (उद्घाटक)
  103. अखिल भारतीय बंधुता संमेलन, पुणे (उद्घाटक)
  104. संविधान परिषद, पुणे (उद्घाटक)
  105. संविधान लोकोत्सव, पुणे (उद्घाटक)
  106. महात्मा फुले प्रबोधन संमेलन, वानवडी, पुणे (उद्घाटक)
  107. आंतरराष्ट्रीय साहित्य संगोष्ठी, नगाव कॉलेज, धुळे (उद्घाटक)
  108. वेबिनार गांधी संस्थान, मालेगाव (उद्घाटक)
  109. पंडित मालवीय संस्था, दिल्ली Redereshe Course उद्बोधन वर्ग, कुसुबा (उद्घाटक)
  110. नारायण सुर्वे साहित्य संमेलन, नेरळ (उद्घाटक)
  111. ग. दि. मा. साहित्य महोत्सव, अध्यक्ष भाषण (अध्यक्ष)
  112. डॉ. बाबासाहेब विचार संमेलन, निपाणी (अध्यक्ष)
  113. विश्वशांती परिषद औरंगाबाद (अध्यक्ष)
  114. सद्भाव साहित्य संमेलन, बेळगाव (कागल). सिमा (अध्यक्ष)
  115. माय मराठी नक्षत्र प्रतीवणण व घनवटे कॉलेज नागपूर राज्य स्तरीय संमेलन (उपाध्यक्ष)
  116. सेतू साहित्य संमेलन, सातारा (अध्यक्ष)
  117. पहिले विद्रोही साहित्य संमेलन, पुणे (अध्यक्ष)

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूकसंपादन करा

पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१५ मध्ये निवडणूक झाली. सबनीस, वाघ यांच्याबरोबरच अरुण जाखडे, शरणकुमार लिंबाळे आणि श्रीनिवास वारुंजीकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. अध्यक्षपदी साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस विजयी झाले. कवी विठ्ठल वाघ यांचा त्यांनी ११२ मतांनी पराभव केला. निवडणुकीत डॉ. श्रीपाल सबनीस यांना सर्वाधिक म्हणजे ४८५ मते मिळाली होती.

महाराष्ट्रातील आणि बृहन्‌ महाराष्ट्रातील एक हजार ७५ पैकी एक हजार ३३ मतदारांनी या निवडणुकीसाठी मतदान केले. यापैकी २० मतपत्रिका अवैध ठरल्या. वैध ठरलेल्या मतदानापैकी सबनीस यांना ४८५, वाघ यांना ३७३, जाखडे यांना २३०, लिंबाळे यांना २५ तर वारुंजीकर यांना २ मते मिळाली, असे निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद आडकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यांनी मतमोजणीच्या चार फेऱ्यांनंतर हा निकाल जाहीर केला[१]

वर्षभराची कारकीर्द पुस्तकरूपातसंपादन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वक्तव्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आपल्या सडेतोड भाषणाने व मुलाखतीने पिंपरी येथे झालेले ८९वे साहित्य संमेलन गाजवले. तसेच पुढे वर्षभर ते सतत चर्चेत राहिले. सबनीस यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीच्या वर्षभरात, त्यांनी कार्यक्रम व गाठीं-भेटींच्या निमित्ताने अवघा महाराष्ट्र पालथा घातला. राज्याच्या दुर्गम भागातही जाऊन ते आपली भूमिका अधिक जोरकसपण मांडत राहिल्याने बऱ्याचदा वादही निर्माण झाले. त्यांचे वर्षभराचे हे ‘साहित्य संचित’ पुस्तकरूपाने एकत्रित करण्यात आले आहे. अध्यक्षीय भाषणाबरोबरच विविध ठिकाणे झालेली भाषणे व लेख या पुस्तकातून वाचायला मिळतात.

हेही वाचासंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ "साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड". Loksatta. 2015-11-07. 2018-08-29 रोजी पाहिले.