प्रा. फ. म. शहाजिंदे ‍‍(‍‍फकीरपाशा महेबूब शहाजिं‌‌दे) (F. M. Shahajinde) (ایف. ایم شاہجندی) महाराष्ट्रातील एक ग्रामीण कवी आहेत. मराठवाडी भाषा त्याच्या साहित्याचा महत्त्वाचा गाभा राहिला आहे. ३ जुलै १९४६ साली उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तूर गावी त्यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव फकीरपाशा महेबूब शहाजिंदे असं आहे. हैदराबाद मुक्ती संग्रामच्या वेळी रझाकारांनी सशस्त्र उठाव केला. ज्या निजाम सरकारविरोधी अनेक बंडखोर मारले गेले. यानंतर सूड म्हणून हिंदूू समुदायाची दंगल उसळली ज्यात हल्लेखोरांनी शहाजिंदे यांच्या वडिलांवर हल्ला केला, या हल्ल्यात त्यांच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका हिंदू कुटुंबाने त्याच्या आई व इतर कुटुबांचे संरक्षण केले.

फ. म. शहाजिंदे
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा मराठी,हिंदी,दखनी,उर्दू

फ. म. शहाजिंदे यांची ‘निधर्मी’ आणि ‘आदम’मधील कविता क्रांतिकारकरीत्या विद्रोही आणि ज्या व्यवस्थेने इथल्या मुसलमानांचे जगणे कठीण करून सोडले आहे, त्या व्यवस्थेला व त्याच्या इतिहासाला आणि वर्तमानाला आव्हान देणारी कविता आहे. त्यांच्या कविता जशा नव्या वाटा शोधणाऱ्या आहेत, तशाच नव्या वाटा प्रस्थापित करणाऱ्या आहेत. शहाजिंदेच्या कवितेमधून व्यक्त होणारा विद्रोह आक्रस्ताळी नसून या व्यवस्थेला अस्तित्वाच्या आत्मसामर्थ्याने आणि इथल्या मातीने दिलेल्या सार्थ आत्मविश्वासाने आव्हान करणारा आहे.

कारकीर्द संपादन

औराद शहाजानी (ता. निलंगा) येथे त्यांनी मराठीचे अध्यापन कार्य केले आहेत. २००६ साली मराठीचे विभागप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर पूर्णवेळ लेखनाचं काम त्यांनी सुरू केलं. फ.म. शहाजिंदे यांनी मराठवाड्यात भूमी प्रकाशन संस्थेची उभारणी केली आहे. आपल्या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून अनेक स्थानिक कवी व लेखकांचे साहित्य शहाजिंदे यांनी प्रकाशित केले आहे. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. यू.म. पठाण, प्रा. फकरूद्दीन बेन्नूर, डॉ. जनार्दन वाघमारे, सूर्यनारायण रणसुभे, राजेखान शानेदिवान, डॉ. श्रीपाल सबनीस, प्रा. जावेद कुरेशी आणि ललिता गादगे या मान्यवर लेखक मंडळीचे निवडक साहित्य भूमी प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे.

१९९० च्या काळात स्थापन झालेल्या 'मुस्लिम मराठी साहित्य' चळवळीत त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. मार्च १९९० साली सोलापूर येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. समाजातील प्रबोधनाच्या चळवळीत अग्रेसर असे कार्य प्रा.शहाजिंदेनी केलं आहे. आत्तापर्यंत त्यांची एकूण १७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

भूमी प्रकाशन संपादन

मराठवाड्यातील कवी व लेखकांच्या लेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी २००0 साली भूमी प्रकाशनची स्थापना करण्यात आली. प्रा. फ. म. शहाजिंदे यांच्या पुढाकाराने सहकार तत्त्वावर ही प्रकाशन संस्था उभी करण्यात आली आहे. सभासदांकडून ठराविक प्रकारचा निधी संकलित करून प्रकाशन सुरू करण्यात आलं. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. यू.म. पठाण, प्रा. फकरूद्दीन बेन्नूर, डॉ. जनार्दन वाघमारे, सूर्यनारायण रणसुभे, राजेखान शानेदिवान, डॉ. श्रीपाल सबनीस, प्रा. जावेद कुरेेेशी आणि ललिता गादगे या मान्यवर लेखक मंडळीचे निवडक साहित्य भूमी प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. आत्तापर्यत १०० पेक्षा जास्त प्रकाशने भूमी प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित झालेली आहेत.

शहाजिंदे यांनी लिहिलेली पुस्तके संपादन

  • अनुभव (निबंध) सुगावा प्रकाशन, पुणे-१९९७
  • आदम (कवितासंग्रह) भूमी प्रकाशन, लातूर-१९९१
  • इत्यर्थ (समीक्षा) दिलीपराज प्रकाशन, पुणे-१९८७
  • ग्वाही (कविता) दिलीपराज प्रकाशन, पुणे-१९९६
  • झोंबणी (कवितासंग्रह) भूमी प्रकाशन, लातूर-२०१३
  • दखलपात्र शब्दांचा उरूस (लेखसंग्रह) भूमी प्रकाशन, लातूर (२०१९)[१]
  • निधर्मी (कवितासंग्रह) आंतरभारती प्रकाशन, औराद शहाजानी-१९८०
  • पुरचुंडी (संपादन) भूमी प्रकाशन, लातूर- २००५
  • प्रत्यय (वैचारिक लेखसंग्रह) भूमी प्रकाशन, लातूर-२०१३
  • मराठवाड्यातील कविता (संपादन) निर्मल प्रकाशन, नांदेड-१९९९
  • मी तू (पत्रात्मक कादंबरी) भूमी प्रकाशन, लातूर, १९८४
  • मूठभर माती: आशय व अन्वयार्थ (संपादन) भूमी प्रकाशन, लातूर-२००८
  • मुस्लिम मराठी साहित्यः परंपरा, स्वरूप आणि लेखक सूची (संपादन) २००४
  • मुस्लिम मराठी साहित्य : प्रेरणा आणि स्वरूप (संपादन) २०१४
  • You in Me, (मी-तूचा इंग्रजी अनुवाद) - अनुवादक : अशोक भूपटकर-२०१६
  • वाकळ (स्फुट लेखसंग्रह) भूमी प्रकाशन, लातूर-२००४
  • शब्दबिंब (समीक्षा) भूमी प्रकाशन, लातूर-२०१७ [२]
  • शेतकरी (मराठवाडी बोलीतील दीर्घ खंडकाव्य) भूमी प्रकाशन, लातूर, १९८६ [३]
  • सारांश (समीक्षा) आंतरभारती प्रकाशन, औराद शहाजानी, १९८७


शहाजिंदे यांना मिळालेले पुरस्कार संपादन

  • यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीचा अंबेजोगाई साहित्य पुरस्कार (१९९०) [ संदर्भ हवा ]
  • निधर्मी- महाराष्ट्र सरकारचा कवी केशवसुत पुरस्कार (१९८२)
  • तुका म्हणे साहित्य पुरस्कार, बुलडाणा (२००४)
  • शेतकरी- महाराष्ट्र राज्य सरकार पुरस्कार (१९८८)
  • मी-तू- महाराष्ट्र सरकारचा कादंबरीसाठीचा पुरस्कार (१९८५)
  • मारुती मगर साहित्य सेवा पुरस्कार, लातूर (२००२)
  • शिक्षकरत्न पुरस्कार, मुंबई (२००७)
  • सुशीलकुमार शिंदे साहित्य गौरव पुरस्कार, सोलापूर (२०१४)
  • हमीद दलवाई पुरस्कार, मुंबई (१९९४)

सन्मान संपादन

  • अध्यक्ष- पाचव्या मराठवाडा युवक साहित्य संमेलन, वाकुळणी, जि. जालना- १९८६
  • अध्यक्ष-  पहिले अखील भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन,  सोलापूर- १९९०
  • अध्यक्ष- अकरावे अंकुर साहित्य संमेलन लोणार , जि. बुलडाणा-१९९१
  • अध्यक्ष- पहिले लातूर जिल्हा मराठी साहित्य संमेलन, निलंगा जि. लातूर, १९९९
  • अध्यक्ष-  पाचवे पुरोगामी मराठी साहित्य संमेलन, कंधार जि. नांदेड-२०००
  • अध्यक्ष- कवी संमेलन, २९वे मराठवाडा साहित्य संमेलन उंडणगाव जि औरंगाबाद-२००७
  • अध्यक्ष- तिसरे शेकोटी साहित्य संमेलन, धारगळ, गोवा २००७
  • अध्यक्ष- कवी संमेलन, ३२वे मराठवाडा साहित्य संमेलन, मुरुड, जि. लातूर २०१०
  • अध्यक्ष- कवी संमेलन, ३७वे मराठवाडा साहित्य संमेलन, जालना- २०१६
  • फ.म. शहाजिंदे यांच्या अनेक कवितांचा हिंदी, इंग्रजी भाषांतून अनुवाद झालेले असून कर्नाटक विद्यापीठ, कोल्हापूर विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्याचे शालेय अभ्यासक्रम यांच्यांत त्यांचा समावेश झाला आहे.[१][permanent dead link] [ संदर्भ हवा ]
  • शिवाजी विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, संत गाडगेबाबा विद्यापीठ आणि कर्नाटक विद्यापीठ आदी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत कवितांचा सामावेश
  • बारावीच्या अभ्यासक्रमात शहाजिंदे यांच्या कवितांना स्थान

संदर्भ संपादन

  1. ^ "Aksharnama.com". www.aksharnama.com. 2019-03-30 रोजी पाहिले.
  2. ^ "फ.म. शहाजिंदे यांच्या शब्दबिंब पुस्तकाचे प्रकाशन". www.vishwavidya.com (इंग्रजी भाषेत). २०१८-०६-०२ रोजी पाहिले.[permanent dead link]
  3. ^ SARVEKAR, KAILAS (२०१७-०७-०१). MARATHI GRAMIN KAVITECHA ITIHAS. Mehta Publishing House. ISBN ९७८९३८६७४५९१० Check |isbn= value: invalid character (सहाय्य).