सुभाष भेंडे

मराठी साहित्यिक

सुभाष भेंडे (ऑक्टोबर १४, इ.स. १९३६; बोरी, गोवा - डिसेंबर २०, इ.स. २०१०; मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी साहित्यिक होते.

सुभाष भेंडे
जन्म नाव सुभाष भेंडे
जन्म ऑक्टोबर १४, इ.स. १९३६
बोरी, गोवा
मृत्यू डिसेंबर २०, इ.स. २०१०
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा
कादंबरी

ऑक्टोबर १४, इ.स. १९३६ रोजी गोव्यातील बोरी या गावात भेंड्यांचा जन्म झाला. केपे या स्वतःच्या मूळ गावातून ते शिक्षणासाठी सांगली येथे गेले. त्यांचे शिक्षण सांगलीपुण्यात झाले होते. त्यांनी अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवली होती. ते मुंबईच्या कीर्ती महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. गोवा मुक्तिसंग्रामानंतर प्रकाशझोतात आलेल्या साहित्यिकांपैकी ते एक होते. इ.स. २००३ साली कराड, महाराष्ट्र येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच वळवयी येथे झालेल्या २१ व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते.

डिसेंबर २०, इ.स. २०१० रोजी मेंदूतील रक्तस्रावामुळे (की हृदयविकाराच्या झटक्याने ?) त्यांचे मुंबई येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या साहित्यावर प्रल्हाद वडेर यांनी ’सुभाष भेंडे यांचे साहित्यविश्व’ नामक ग्रंथ लिहिला आहे.

प्रा. सुभाष भेंडे यांनी आपल्या अमेरिकावारीनंतर ’गड्या आपुला गाव बरा’ या शीर्षकाचा एक लेख लिहिला होता. तो महाराष्ट्रातील बारावीच्या पाठ्यपुस्तकासाठी निवडला गेला. त्या लेखाचे पाठ्यपुस्तक मंडळाने काय हाल केले त्याची हकीकत गड्या आपुला गाव बरा येथे वाचता येईल.

पुरस्कार

संपादन

प्रा. डॉ. सुभाष भेंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भेंडे कुटंबीय आणि मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने पहिला 'सुभाष भेंडे नवोदित लेखक वाङ्मय पुरस्कार' बबन मिंडे यांच्या 'कॉमन मॅन' या कादंबरीला देण्यात आला. ११,१११ रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.(२०१२).

त्यानंतरचे पुरस्कार

संपादन
  • २०१३ साली किरण गुरव यांना 'राखीव सावल्यांचा खेळ' या कथासंग्रहासाठी.
  • २०१४ साली गणेश मतकरी यांच्या सिनेमॅटिक या समीक्षा ग्रंथास.
  • २०१६ साली शिल्पा कांबळे यांच्या ‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ या कादंबरीला.
  • २०१७ साली हा पुरस्कार बालिका ज्ञानदेव या कवयित्रीच्या ‘मॅग्झिनीतून सुटतेय गोळी’ या काव्यसंग्रहाला मिळाला.
  • २०१८ साली रश्मी कशेळकर यांच्या ’भुईरिंगण’ या ललित सेख संग्रहासाठी.

सन्मान

संपादन
  • सुभाष भेंडे यांच्या साहित्यावर प्रल्हाद वडेर यांनी ’सुभाष भेंडे यांचे साहित्यविश्व’ नामक ग्रंथ लिहिला आहे.

सुभाष भेंडे यांचे प्रकाशित साहित्य

संपादन
  • अगतिक आणि अदेशी (दिलीप प्रकाशन, मुंबई)
  • अदेशी (हंस प्रकाशन, पुणे. १९७१)
  • अंधारवाटा (१९७८)
  • अल्लाउद्दीन आणि अलिबाबा (अनुवादित, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, १९९२)
  • आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण : शिल्पकार चरित्रकोश, खंड २, संपादित) (साप्ताहिक विवेकची हिदुस्थान प्रकाशन संस्था, मुंबई.)
  • आमचं गोय आमका जाय (१९७०)
  • आमचा गोवा आम्हांला हवा (पुष्प प्रकाशन, पुणे)
  • इसापच्या गोष्टी (अनुवादित, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, मुंबई. १९९२)
  • उद्ध्वस्त (मेनका प्रकाशन, १९८५)
  • एक डोळे, सात गाळे (सन पब्लिकेशन, १९८२)
  • ऐंशी दिवसात जगाची सफर (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक ज्यूल व्हर्ने, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, मुंबई. १९९२)
  • ऐसी कळवळ्याची जाती (डिंपल पब्लिीकेशन, ठाणे.२०००)
  • कागदी बाण (दिलीप प्रकाशन, मुंबई)
  • किनारा : नवक्षितिजे निर्माण करण्याची आकांक्षा उरी बाळगणाऱ्या मनस्वी उद्योजकाची कहाणी (मॅजेस्टिक प्रकाशन, १९९४)
  • कुमाऊंचे नरभक्षक (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - जिम कार्बेट), (ऑक्सफर्ड युनिर्व्हसिटी प्रेस, मुंबई १९८२)
  • खुसखुशीत (उत्कर्ष प्रकाशन, पुणे. १९९३)
  • गड्या आुला गाव बरा (श्री विद्या प्रकाशन, पुणे. १९८५)
  • गंभीर आणि गमतीदार (मॅजेस्टिक प्रकाशन,मुंबई. १९९०)
  • चकवा (दिलीपराज प्रकाशन, पुणे. २०११)
  • चषक आणि गुलाब (मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई)
  • जित्याची खोड (पुष्प प्रकाशन, पुणे)
  • जिथे जातो तेथे (श्रीविद्या प्रकाशन, १९९०)
  • जोगीण (मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई २००३)
  • दर्यावर्दी सिंदबाद (अनुवादित, मूळ लेखक - डिंगल मेरियन; ऑक्सफ़र्ड युनिवर्सिटी प्रेस, दिल्ली १९८६)
  • दिलखुलास (१९७५)
  • द्राक्ष आणि रुद्राक्ष (श्रीविद्या प्रकाशन, १९८३)
  • निवडक गंभीर आणि गंमतीदार (मॅजेस्टिक प्रकाशन, १९९०)
  • नेपोलियननंतर तुम्हीच (मीनल प्रकाशन, १९८१)
  • पितळी दरवाजा (श्रीविद्या प्रकाशन, १९९३)
  • पैलतीर (मॅजेस्टिक, १९८२)
  • फूलना फुलाची पाकळी (१९७५)
  • बेस्ट ऑफ जयवंत दळवी (मॅजेस्टिक प्रकाशन,मुंबई २००९)
  • बोनसाय ( मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई १९८८)
  • मयसभा.(पुष्प प्रकाशन, पुणे. २००२)
  • मार्को पोलो (अनुवादित, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, मुंबई. १९८६)
  • मार्ग सुखाचा (मॅजेस्टिक, १९८४)
  • मोनिकाच्या धमालकथा (आदित्य प्रकाशन, मुंबई. १९९२)
  • रॉबिन्सन क्रुसो (अनुवादित, ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेस, मुंबई १९९२)
  • लांबलचक काळीशार सावली (विश्वमोहिनी, १९८१)
  • लोटांगण (एस.के. प्रकाशन पुणे.१९९५)
  • साहित्य संस्कृती (श्रीविद्या प्रकाशन, १९९९)
  • सुरस व चमत्कारिक (श्री विद्या प्रकाशन, पुणे. १९९०)
  • स्मितकथा (१९७३)
  • स्वर्ग दोन बोटे (राधा प्रकाशन, १९८१)
  • हर्क्युलिस (अनुवादित, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, मुंबई. १९९२)
  • हलकं फुलकं (श्री विद्या प्रकाशन, पुणे १९९७)
  • हसवेगिरी (बा. ग. ढवळे प्रकाशन, १९७८)
  • हास-परिहास (अमेय प्रकाशन, १९७८) []
  • हास्यतरंग (दिलीप प्रकाशन, मुंबई)
  • होमकुंड-गोमंतकात सत्तर ऐंशी वर्ष होत असलेल्या राजकीय,सामाजिक परिवर्तनाचा वेध होणारी कादंबरी (मॅजेस्टिक, २००७)


संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ नाडकर्णी, प्रा.एस्.एस् (२००३). गोमंतकीय मराठी वाङ्मयाचा इतिहास- खंड दुसरा. गोवा: गोमंतक मराठी अकादमी प्रकाशन. pp. २१४.

बाह्य दुवे

संपादन