गणेश मतकरी हे वास्तुविशारद, अभिनेते, चित्रपट समीक्षक-निर्माते-दिग्दर्शक व मराठी लेखक आहेत. ते रत्नाकर मतकरी यांचे चिरंजीव आणि माधव मनोहर वैद्य यांचे नातू आहेत. दूरचित्रवाणीवरच्या ’चिमणराव-गुंड्याभाऊ’ ह्या मालिकेत त्यांनी चिमणरावांच्या राघू या पुत्राचे काम केले होते.[ संदर्भ हवा ]

रत्नाकर मतकरी यांच्या कथेवर २०१३ साली 'इन्व्हेस्टमेन्ट' नावाचा मराठी चित्रपट निघाला होता. गणेश मतकरी त्याचे सहदिग्दर्शक होते. त्यांनी SHOT नावाचा एक इंग्रजी लघुपटही दिग्दर्शित केला होता. हा लघुपट जर्मनीमधील सुरुवातीला स्टुटगार्ट येथील भारतीय चित्रपट महोत्सवात अग्रक्रमाने दाखवला गेल्यानंतर इतर अनेक चित्रपट महोत्सवांतही प्रदर्शित झाला.[ संदर्भ हवा ]


गणेश मतकरी यांची पुस्तके संपादन

  • इन्स्टॉलेशन्स (कथासंग्रह)
  • (कदाचित ) इमॅजिनरी (कथासंग्रह)
  • खिडक्या अर्ध्या उघडया (कथासंग्रह)
  • चौकटी बाहेरचा सिनेमा (चित्रपटविषयक)
  • फिल्ममेकर्स (चित्रपटविषयक)
  • रत्नाकर मतकरी यांच्या श्रेष्ठ कथा - दोन भाग
  • समाजवाद आणि हिंदी सिनेमा (चित्रपटविषयक)
  • सिनेमॅटिक (चित्रपटविषयक)
  • सिनेमास्केप (चित्रपटविषयक)
  • Half Open Widows (इंग्रजी कथासंग्रह; मूळ मराठी, इंग्रजी अनुवादक जेरी पिंटो


पुरस्कार संपादन

लोकमंगल साहित्य पुरस्कार (२०१७)