ऑक्टोबर १४
दिनांक
<< | ऑक्टोबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
ऑक्टोबर १४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २८७ वा किंवा लीप वर्षात २८८ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनअकरावे शतक
संपादन- १०६६ - नॉर्मन दिग्विजय-हेस्टिंग्जची लढाई - इंग्लंडमधील हेस्टिंग्ज गावापासून सात मैलावरच्या सेन्लॅक हिल या टेकडीवर विल्यम द कॉॅंकररच्या नॉर्मन सैन्याने सॅक्सन सैन्याचा पराभव केला व इंग्लंडच्या राजा हॅरोल्ड दुसऱ्याला मारले.
एकोणिसावे शतक
संपादन- १८८४ - जॉर्ज ईस्टमनने छायाचित्र छापायच्या कागदाचा पेटंट घेतला.
विसावे शतक
संपादन- १९१२ - मिलवॉकी, विस्कॉन्सिनमध्ये निवडणूकीसाठी भाषण देणाऱ्या थियोडोर रूझवेल्टवर खूनी हल्ला. गोळी लागून रक्तस्राव होत असतानाही रूझवेल्टने आपले भाषण पूर्ण केले.
- १९१३ - युनायटेड किंग्डमच्या सेंघेनिड येथील कोळशाच्या खाणीत अपघात. ४३९ ठार.
- १९३३ - जर्मनीने लीग ऑफ नेशन्समधून अंग काढून घेतले.
- १९४० - दुसरे महायुद्ध - बॅलहॅम ट्यूब दुर्घटना.
- १९४३ - ज्यूंचे शिरकाण - सोबिबोर छळछावणीतील कैद्यांनी उठाव करून ११ वाफेन एस.एस.च्या सैनिकांना मारले व ६०० कैद्यांनी पळ काढला.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - श्वाईनफर्टवर हल्ला करणाऱ्या अमेरिकेच्या बी.१७ फ्लाईंग फोर्ट्रेस प्रकारच्या बॉम्बफेकी विमानांपैकी साठ तोडून पाडली गेली.
- १९४७ - चक यीगरने बेल एक्स-१ प्रकारचे विमान स्वनातीत गतीने उडवले.
- १९५६ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नवयान स्थापन केला व सपत्निक आपल्या सुमारे ५,००,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे नवयान बौद्ध धर्मात प्रवेश.
- १९६८ - ऑस्ट्रेलियाच्या मेकरिंग शहरात रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.८ तीव्रतेचा भूकंप.
- १९७३ - थायलंडमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन. त्याविरुद्ध गोळीबार करणाऱ्या सैनिकांकडून ७७ ठार, ८५७ जखमी.
एकविसावे शतक
संपादनजन्म
संपादन- १२५७ - प्रझेमिसल दुसरा, पोलंडचा राजा.
- १६३३ - जेम्स दुसरा, इंग्लंडचा राजा.
- १६४३ - पहिला बहादूर शाह, मोगल सम्राट.
- १६४४ - विल्यम पेन, पेनसिल्व्हेनियाचा स्थापक.
- १६८७ - रॉबर्ट सिम्सन, स्कॉटिश गणितज्ञ.
- १७१२ - जॉर्ज ग्रेनव्हिल, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १७८४ - फर्डिनांड सातवा, स्पेनचा राजा.
- १८०१ - जोसेफ प्लॅटू, बेल्जियन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८८२ - चार्ली पार्कर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८८ - कॅथेरिन मॅन्सफील्ड, इंग्लिश लेखक.
- १८९० - ड्वाइट डी. आयझेनहॉवर, अमेरिकेचा ३४वा राष्ट्राध्यक्ष.
- १८९४ - ई.ई. कमिंग्स, अमेरिकन कवी.
- १९०६ - हाना आरेंट, जर्मन तत्त्वज्ञ, लेखिका.
- १९१४ - रेमंड डेव्हिस जुनियर, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
- १९२७ - रॉजर मूर, इंग्लिश अभिनेता.
- १९३० - मोबुटु सेसे सेको, झैरचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३१ - निखिल बॅनरजी, भारतीय शास्त्रीय संगीतकार.
- १९३२ - ऍनातोली लार्किन, रशियन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९३९ - राल्फ लॉरेन, अमेरिकन फॅशन डिझायनर.
- १९४० - क्लिफ रिचर्ड, इंग्लिश गायक.
मृत्यू
संपादन- १०६६ - हॅरोल्ड गॉडविन्सन, इंग्लंडचा राजा.
- १०९२ - निझाम अल-मुल्क, पर्शियाचा वजीर.
- १३१८ - एडवर्ड ब्रुस, आयर्लंडचा राजा.
- १६१९ - सॅम्युएल डॅनियल, इंग्लिश कवी.
- १६३७ - गॅब्रियेलो चियाब्रेरा, इटालियन कवी.
- १७०३ - थॉमस हॅन्सन किंगो, डेनिश कवी.
- १७११ - ट्यूओफ्लोस, इथियोपियाचा सम्राट.
- १९४४ - एर्विन रोमेल, जर्मन सेनापती.
- १९५९ - एरॉल फ्लिन, ऑस्ट्रेलियन अभिनेता.
- १९६० - अब्राम इयॉफ, रशियन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९७७ - बिंग क्रॉस्बी, अमेरिकन गायक व अभिनेता.
- १९८३ - विलार्ड प्राइस, केनेडियन लेखक.
- १९९४ - सेतुमाधव पगडी, पद्मभूषण पुरस्कारविजेते, मराठी इतिहास संशोधक
- १९९७ - हॅरोल्ड रॉबिन्स, अमेरिकन लेखक.
- १९९८ - क्लीव्हलॅंड अमोरी, अमेरिकन लेखक.
- १९९९ - जुलियस न्यरेरे, टांझानियाचा राष्ट्राध्यक्ष.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- शिक्षक दिन - पोलंड.
- जागतिक प्रमाण दिन.
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर ऑक्टोबर १४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑक्टोबर १२ - ऑक्टोबर १३ - ऑक्टोबर १४ - ऑक्टोबर १५ - ऑक्टोबर १६ - ऑक्टोबर महिना