जॉर्ज ईस्टमन
जॉर्ज ईस्टमन (१२ जुलै, १८५४:वॉटरव्हिल, न्यू यॉर्क, अमेरिका - १४ मार्च, १९३२:रॉचेस्टर, न्यू यॉर्क, अमेरिका) हा एक अमेरिकन संशोधक, उद्योगपती आणि दानशूर व्यक्ती होता. याने छायाचित्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या फिल्मचा शोध लावला.
ईस्टमनने आपल्या हयातीत आणि मृत्यूपश्चात १० कोटी अमेरिकन डॉलर (२०१९मधील १.२ अब्ज डॉलर) दान केले. यातील मोठा भाग रॉचेस्टर विद्यापीठ आणि मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेकनोलॉजीला मिळाला. हे दान करताना त्याने आपले नाव न वापरता मिस्टर स्मिथ या नावाने हे पैसे दान केले. याशिवाय रॉचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, टस्केगी इन्स्टिट्यूट आणि हॅम्प्टन इन्स्टिट्यूट या संस्थांनाही त्याने मोठी देणगी दिली होती.
जॉर्ज ईस्टमनने ईस्टमन स्कूल ऑफ म्युझिक या जगप्रसिद्ध संगीतशाळेची स्थापना केली.