ऑक्टोबर १७
दिनांक
<< | ऑक्टोबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
ऑक्टोबर १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २८९ वा किंवा लीप वर्षात २९० वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनसतरावे शतक
संपादन- १६६२ - इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसऱ्याने डंकर्क फ्रांसला ४०,००० पाउंडला विकले.
अठरावे शतक
संपादन- १७८१ - अमेरिकन क्रांती-यॉर्कटाउनची लढाई - जनरल चार्ल्स कॉर्नवॉलिसने खंडीय सेनेसमोर शरणागती पत्करली.
एकोणिसावे शतक
संपादन- १८०० - इंग्लंडने कुरासावोची वसाहत नेदरलॅंड्सकडून घेतली.
- १८०६ - हैतीच्या सम्राट जाक पहिल्याची हत्या.
विसावे शतक
संपादन- १९३१ - माफिया डॉन अल कॅपोनला आयकर बुडवल्याबद्दल शिक्षा.
- १९३३ - अल्बर्ट आइनस्टाइन जर्मनीतून पळून अमेरिकेत आला.
- १९५६ - जगातील पहिले अणुउर्जा केंद्र एलिझाबेथ दुसरीने इंग्लंडच्या कुंब्रिया प्रांतातील सेलाफील्ड येथे सुरू केले.
- १९७३ - सिरीयाविरुद्ध इस्रायलला मदत केल्याबद्दल ओपेकने पाश्चात्य देशांना खनिज तेल विकणे बंद केले.
- १९८९ - लोमो प्रियेता भूकंप - सान फ्रांसिस्को जवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.१ तीव्रतेचा भूकंप. ५७ ठार.
- १९९८ - जेसी, नायजेरिया येथे पेट्रोलवाहिकेतून गळणाऱ्या पेट्रोलचा विस्फोट. हे पेट्रोल गोळा करणाऱ्यांपैकी १,२०० ठार.
एकविसावे शतक
संपादन- २००३ - ताइपेइ १०१ या इमारतीच्या १०१व्या मजल्यावर कळस चढवण्यात आला. याबरोबरच ही इमारत कुआलालंपुरमधील पेट्रोनास टॉवरपेक्षा व जगातील सगळ्यात उंच इमारत झाली.
- २००३ - भारतात तृतीयपंथी व्यक्तींनी जिती जितायी पॉलिटिक्स हा आपला स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला.
- २००६ - अमेरिकेची वस्ती ३० कोटीला पोचल्याचा अंदाज.
जन्म
संपादन- १८१७ - सर सय्यद अहमद खान, भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक.
- १८६९ - भास्करबुवा बखले, हिंदुस्तानी गायक-संगीतकार, बालगंधर्व व मास्टर कृष्णराव यांचे गुरू.
- १८७८ - बार्लो कार्कीक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८९० - रॉय किल्नर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८९२ - नारायणराव बोरावके, पहिले मराठी साखर कारखानदार.
- १९१२ - पोप जॉन पॉल पहिला.
- १९१४ - जेरी सीगेल, अमेरिकन चित्रकथाकार, सुपरमॅन या व्यक्तिमत्त्वाचा सहनिर्माता.
- १९१५ - आर्थर मिलर, अमेरिकन नाटककार.
- १९१७ - मार्टिन डोनेली, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९१९ - रिटा हेवर्थ, अमेरिकन अभिनेत्री.
- १९३१ - एस.सी. जमीर, चार वेळा नागालँडचे मुख्यमंत्री राहिलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी
- १९३५ - ऍलन ब्राउन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५५ - स्मिता पाटील, पद्मश्री पुरस्कार विजेती भारतीय चित्रपट अभिनेत्री.
- १९६२ - माइक जज, अमेरिकन चित्रकथाकार, व्यंगचित्रकार.
- १९६५ - अरविंद डि सिल्व्हा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७० - अनिल कुंबळे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७२ - एमिनेम, अमेरिकन रॅप गायक.
मृत्यू
संपादन- ५३२ - पोप बोनिफेस दुसरा.
- १८८२ - दादोबा पांडुरंग तर्खडकर, इंग्रजी-मराठी व्याकरणकार आणि धर्मसुधारक.
- १८८७ - गुस्ताव कर्चॉफ, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९५८ - चार्ली टाउनसेन्ड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६७ - फू-यी, शेवटचा चिनी सम्राट.
- १९८१ - कन्नदासन, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तमिळ कवी आणि गीतकार
प्रतिवार्षिक पालन
संपादन- जागतिक गरिबी निर्मूलन दिन.
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर ऑक्टोबर १७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑक्टोबर १५ - ऑक्टोबर १६ - ऑक्टोबर १७ - ऑक्टोबर १८ - ऑक्टोबर १९ - ऑक्टोबर महिना