मुख्य मेनू उघडा


हैती हा देश कॅरिबियन समुद्रातील हिस्पॅनियोला बेटाच्या पश्चिम भागात आहे. हैतीच्या पूर्वेला डॉमिनिकन प्रजासत्ताक हा देश आहे. हैती ग्रेटर अँटिल्सचा भाग आहे. पोर्ट औ प्रिन्स ही हैतीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

हैती
Repiblik d Ayiti
République d'Haïti
हैतीचे प्रजासत्ताक
हैतीचा ध्वज हैतीचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: L'Union Fait La Force
राष्ट्रगीत: ला देस्सालिनिएन
हैतीचे स्थान
हैतीचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी पोर्ट औ प्रिन्स
सर्वात मोठे शहर पोर्ट ओ प्रिन्स
अधिकृत भाषा हैतियन क्रिओल, फ्रेंच
इतर प्रमुख भाषा -
सरकार
 - राष्ट्रप्रमुख रेने प्रेवाल
 - पंतप्रधान जाक एदुआर्द आलेक्सिस
 - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश -
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (फ्रान्सपासून)
जानेवारी १, १८०४ 
 - प्रजासत्ताक दिन
क्षेत्रफळ
 - एकूण २७,७५० किमी (१४७वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.७
लोकसंख्या
 -एकूण ८५,२८,००० (८८वा क्रमांक)
 - घनता २९२.७/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १२.९४ अब्ज अमेरिकन डॉलर (१२४वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १,६०० अमेरिकन डॉलर (१४८वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन हैती गॉर्दे (HTG)
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी -५/-४
आय.एस.ओ. ३१६६-१ HT
आंतरजाल प्रत्यय .ht
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +५०९
राष्ट्र_नकाशा

हैती या देशाचे क्षेत्रफळ २७,७५० वर्ग किलोमीटर इतके असून लोकसंख्या ९.८ दशलक्ष आहे. या देशात गूर्ड हे चलन प्रचलित आहे. हैतीतील फक्त ४५ टक्के नागरिक साक्षर असून या देशाची शासकीय भाषा फ्रेंच आहे.

हैती हा स्वातंत्र्य मिळालेला लॅटिन अमेरिकेतील सर्वात पहिला देश होता. या देशाला इ.स. १८०४ मध्ये फ्रेंचांच्या वसाहतींकडून स्वातंत्र्य मिळाले. येथील लोकसंख्येपैकी बहुतांश लोक निग्रो आहेत. उर्वरित नागरिक म्हणजे येथे स्थायिक झालेल्या फ्रेंचाच्या आणि गुलामंच्या वर्णसंकरातून जन्मलेली प्रजा आहे.

हैतीचे मुख्य उत्पादन कॅाफी हे आहे. तसेच कापूस, कोको आणि तंबाखूचे उत्पादनही येथे मोठ्या प्रमाणात होते. या देशात बॅाक्साईट हे खनिज मोठ्या प्रमाणात सापडते. तसेच येथे पर्यटनाद्वारे मोठ्या प्रमाणात परकीय चलन प्राप्त केले जाते.

इतिहाससंपादन करा

नावाची व्युत्पत्तीसंपादन करा

प्रागैतिहासिक कालखंडसंपादन करा

अर्वाचीन इतिहाससंपादन करा

२०१०चा भूकंपसंपादन करा

जानेवारी १२, इ.स. २०१० रोजी स्थानिक वेळेप्रमाणे संध्याकाळी ४:५३ वाजता हैती रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.० इतकी तीव्रता असलेल्या भूकंपाने हादरले. हा भूकंप मागील २०० वर्षांतील सगळ्यात तीव्र भूकंप होता..[१] यामुळे कॅरिबियन समुद्रात त्सुनामी होण्याची शक्यता निर्माण झाली होती.[२]

या भूकंपात हैतीमध्ये अतोनात नुकसान झाले. भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून जवळ असलेले राजधानीचे शहर पोर्ट-औ-प्रिन्स जमीनदोस्त झाले. हैतीतील बहुतांश इमारती बांधतानाच कमकुवत बांधल्यामुळे कोसळल्या. राष्ट्रपती महाल, संसद आणि राष्ट्रीय कॅथेड्रल या इमारतीही कोसळल्या. जमीनीखाली अंदाजे १० किमी केंद्रबिंदू असलेल्या या भूकंपामुळे १ लाख पर्यंत व्यक्ती मरण पावल्याचा अंदाज आहे.

भूगोलसंपादन करा

चतु:सीमासंपादन करा

राजकीय विभागसंपादन करा

मोठी शहरेसंपादन करा

समाजव्यवस्थासंपादन करा

वस्तीविभागणीसंपादन करा

धर्मसंपादन करा

हैती ख्रिश्चन देश आहे. येथील ८०% व्यक्ती रोमन कॅथोलिक धर्म पाळतात. प्रोटेस्टंट १६% आहेत तर उरलेले इतर धर्म पाळतात. येथील ख्रिश्चन व इतर लोक हैती व्हूडू हा धर्मही मानतात.[३]

शिक्षणसंपादन करा

संस्कृतीसंपादन करा

राजकारणसंपादन करा

अर्थतंत्रसंपादन करा

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा