पोर्ट-औ-प्रिन्स (Port-au-Prince) ही हैती ह्या कॅरिबियन मधील देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

पोर्ट-औ-प्रिन्स
Port-au-Prince
हैती देशाची राजधानी

Port au prince-haiti.JPG

Haiti map.png
पोर्ट-औ-प्रिन्सचे हैतीमधील स्थान

गुणक: 18°32′0″N 72°20′0″W / 18.53333°N 72.33333°W / 18.53333; -72.33333

देश हैती ध्वज हैती
स्थापना वर्ष इ.स. १७४९
क्षेत्रफळ ३८.१९ चौ. किमी (१४.७५ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ८८,१०५ (भूकंपानंतर)

गोनाव्हेचा अखातावर वसलेले हे शहर उतारावर आहे. बहुतांश लोकसंख्या डोंगरांवर असून व्यावसायिक भाग समुद्रकिनाऱ्यावर आहेत. ह्या शहराची वस्ती २५ ते ३० लाख आहे. येथील बहुतांश लोक झोपड्यांमध्ये राहतात.

जानेवारी १२, २०१० रोजी घडलेल्या प्रलयंकारी भूकंपामध्ये हे शहर जवळजवळ पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. ७.१ रिश्टर स्केलच्या ह्या भूकंपामुळे पोर्ट-औ-प्रिन्समधील अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत तर इतर इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

भूकंपामध्ये ढासळलेले राष्ट्रपती भवन