तंबाखू भारतात उगवणारी एक वनस्पती आहे. या वनस्पतीला संस्कृतमध्ये ताम्रपर्ण, गुच्छफल, क्षारपत्रा, ताम्रकुट व धुम्रपत्र अशी नावे आहेत . शास्त्रीय नाव निकोटिआना टॅबकम (Nicotiana tabacum) असेेआहे . हिची पाने वाळवून, कुस्करून त्याला चुना मळतात. याचा वापर लोक खाण्यासाठी करतात. त्याच चुन्यापासून गुटखा बनवतात. वाळलेल्या अखंड पानापासून विडी बनवितात. तंबाखू हा पदार्थ नशादायक आहे. विडी, सिगरेट, सिगार, चिरूट, हुक्का, गुटखा, तपकीर, हिरड्यांना लावण्याची मशेरी, चुन्याबरोबर मिसळून, पानात घालून आणि अशा नानाविध स्वरूपात हा पदार्थ वापरला जातो. तंबाखू एक नगदी पीक आहे. तंबाखूच्या वापराने कर्करोग होतो.br

तंबाखूचे पीक

इतिहाससंपादन करा

युरोपीयसंपादन करा

फ्रान्सचा पोर्तुगालमधील राजदूत जॉं निको (Jean Nicot) याने इ.स. १५६० मध्ये एका बेल्जियन व्यापाऱ्याकडून तंबाखू विकत घेतली. हा तंबाखू त्याने फ्रान्सच्या राणीला भेट दिला. वनस्पतींच्या ज्या वंशातून तंबाखू उद्भवतो त्याला, याच जॉं निकोच्या स्मरणार्थ, ‘निकोटिआना’ असे नाव दिले गेले.

नावाचा इतिहाससंपादन करा

तंबाखू, तमाकू आणि टोबॅको या नावांचे मूळ कॅरेबियन बेटांवर आहे असे मानले जाते. कोलंबस आणि त्याचे खलाशी इ.स. १४९२ मध्ये कॅरेबिअन बेटांवर उतरले. त्या काळात कॅरेबियन स्थानिक लोक तंबाखू वापरताना त्यांना आढळले. ते विस्तवावर तंबाखूची पाने टाकून, त्यांचा धूर नळीतून ते नाकाने ओढत. या नळीला ते ‘टाबाको’ म्हणत. त्यावरूनच पुढे तंबाखूची सर्व नावे प्रचलित झाली असावीत असे मानले जाते.

शास्त्रीय नावेसंपादन करा

  • भारतीय उपखंडात पिकणारा बहुतांश तंबाखू हा त्यापकी ‘निकोटिआना टोबॅकम’ ( Nicotiana tobacum) या जातीचा असतो व त्याचे कुळ- सोलेनेसी[Solanaceae].
  • निकोटिआना रस्टिका या जातीच्या तंबाखूत निकोटीनचे प्रमाण भारतीय तंबाखूपेक्षा जास्त असते.


स्वरूपसंपादन करा

अल्कलॉइड या रासायनिक गटात मोडणारे निकोटीन हे द्रव्य तंबाखूच्या रोपट्याच्या मुळांमध्ये तयार होते. हे द्रव्य रोपाच्या पानांमध्ये साठवले जाते. रोपटय़ातील जवळपास ६४% निकोटीन पानांमध्ये असते, असे मानले जाते. यामुळे तंबाखूच्या पानांचा उपयोग केला जातो. निकोटीन हे कीटकनाशक ही आहे. न्यू मेक्सिको स्टेट विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनात निकोटीनचे कीटकनाशक गुणधर्म वैज्ञानिकरीत्या सिद्ध झाले आहेत.

व्यसनसंपादन करा

निकोटीन वेगाने रक्तप्रवाह मिसळू शकते. निकोटीन त्वचेतून तर शरीरात चटकन शिरतेच, परंतु धूम्रपानातील धूर किंवा तपकीर यांद्वारे ते श्वसनमार्गात सोडले की लागलीच रक्तात मिसळते रक्तप्रवाहात शिरकाव झाल्यापासून १०-२० सेकंदांत ते संपूर्ण शरीरभर पसरते आणि महत्त्वाचे म्हणजे मेंदूपर्यंत पोहोचून नशा चढल्याचा अनुभव देते. निकोटीन रक्तप्रवाहात मिसळले की आपल्या मनात शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची तात्पुरती व फसवी भावना निर्माण होते. निकोटीनचा हा परिणाम काही काळाने शुद्ध रक्त पुरवठ्याने कमी होतो. हीच भावना परत मिळविण्यासाठी पुन्हा निकोटीनचे सेवन केले जाते आणि थोड्याच काळात त्याचे व्यसन लागते. निकोटीन व्यसनी व्यक्तींना अल्झायमर्स, स्किझोफ्रेनिया मेंदूशी संबंधित रोग होण्याची शक्यता जास्त असते.

परिणामसंपादन करा

कुठल्याही स्वरूपातील तंबाखूसेवनाने शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. फुफ्फुसाचा कॅन्सर सिगारेटमुळे होतो. चघळायच्या तंबाखूमुळे तोंडाचा कॅन्सर होतो. दरवर्षी ३१ मे हा दिवस ‘जागतिक बिनतंबाखूचा दिवस’ (World No Tobacco Day) म्हणून साजरा केला जातो.तंबाखूमुळे रक्ताचे स्वरूप बदलतेतसेच त्याच्यातील रक्त पेशीचेस्वरूपही बदलते.

हेही वाचासंपादन करा

संदर्भसंपादन करा

http://epaper.loksatta.com/5132/indian-express/29-05-2011#p=page:n=22:z=2