हालचाल करू न शकणाऱ्या बहुपेशीय सजीव वनस्पतींमध्ये झाडे, झुडपे, वेली, शेवाळेकवक यांचाच समावेश होतो असा सामान्य समज आहे, परंतु तो तितकासा बरोबर नाही. प्रत्यक्षात स्पाँजसारखे प्राणीही हालचाल करू न शकणारे बहुपेशीय सजीव आहेत. या उलट समुद्रात तरंगणारी एकपेशीय शेवाळी ह्यांनाही वनस्पती समजले जाते. याखेरीज आता कवकांचा एक वेगळाच गट बनवला आहे. त्यांना वनस्पती गणले जात नाही.

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


वनस्पतींमधील विविधता

वनस्पतीची व्याख्या ही 'पुढील दहा गुणवैशिष्ट्ये असलेले उद्भिज‍ सृष्टीतील सजीव' अशी करावी : (१) प्रकाशातील ऊर्जा वापरून स्वतःचे अन्न उत्पादन करण्याची क्षमता म्हणजे (२) अन्न साखरस्टार्च या रूपात साठवणे (३) कडक पेशीभित्ती (४) पेशींमध्ये केंद्रकाचे अस्तित्व (५) बहुधा बहुपेशीय, परंतु क्वचित एकपेशीयही असू शकतात (६) अमर्याद वाढीची क्षमता (७) सामान्यतः, पण नेहमीच नाही, पकड ठेवण्यासाठी मुळे, आधारासाठी खोड व अन्न तयार करण्यासाठी पाने यांचे अस्तित्व (८) प्राण्यांहून बाह्य उद्दीपनांना अतिशय हळू प्रतिसाद (९) मर्यादित हालचाली (१०) आलटून पालटून बीजाणू आणि परागअंडपेशी यांचे उत्पादन.

वनस्पतींत शेवाळी, शैवाल, नेचे, आणि अपुष्प (उदाहरणार्थ सूचिपर्णी वृक्ष) व सपुष्प वनस्पतींचा समावेश होतो. झाडे अनेक प्रकाराची असतात. काही झाडाना फुले असतात. काही झाडाना फुले नसतात.

भारतीय पुराणकालीन पार्श्वभूमी संपादन

en:Wikipedia:Plant या पानावरून भाषांतरित

वनस्पती हा मूळचा संस्कृत शब्द (वनस्+पती=वनांचा पती) असून व्यापक स्वरूपात वनस्पती साम्राज्यासाठी सध्या वापरला जात आहे. तरीही, चरक संहितेनुसार, सुश्रुत संहितेनुसार आणि वैशेषिकेनुसार वनस्पती हा शब्द फक्त फळे येणाऱ्या झाडांसाठीच मुख्य‌तः वापरला जात असे.

ऋग्वेदानुसार वनस्पतींमध्ये वृक्ष, औषधी वृक्ष आणि वेली या तीनच विभागण्या आहेत. यांतील उपविभाग-विशाखा, क्षुप, व्रताती, प्रतानवती इत्यादी आहेत. सर्व प्रकारचे गवत हे 'तृण' विभागात येते. फुले व फळे येणाऱ्या वनस्पती या अनुक्रमे पुष्पवती व फलवती विभागात आल्या आहेत. 'करीर' म्हणून निष्पर्ण वनस्पतींचा पण एक वर्ग त्यांत आहे.

अथर्ववेदात वनस्पतींचे विशाख, मंजिरी, स्तंभिनी, प्रस्तानवती, एकाक्षांग, प्रतानवती, अंशुमति, कांडिनी हे आठ वर्ग तर तैत्तिरीय आणि वाजसेनीय संहितेत त्यांचे १० वर्ग आहेत.

मनुस्मृतीत ८ प्रमुख वर्ग आहेत. चरक संहितेनुसारसुश्रुत संहितेनुसार वृक्षांची वेगवेगळी विभागणी आहे.

पाराशर , वृक्षायुर्वेदचा जनक, याने वनस्पतींची द्विमात्रक व एकमात्रक अशी विभागणी केली आहे (द्विदल व एकदल). नंतर त्यांचे पुढेही वर्गीकरण केले आहे.

वनस्पतींसंबंधीची मराठी लेखकांची पुस्तके संपादन

 • ए फिल्ड गाइड : भाग एक व दोन (इंग्रजी, श्रीकांत इंगळहळीकर)
 • औषधी वनस्पती (महाराष्ट्र राज्य दर्शनिका, लेखक - डॉ. र.ल. कोल्हे, संपादक - डॉ. अ.शं. पाठक)
 • कॉफी टेबल पुस्तक (इंग्रजी, अशोक कोठारी)
 • घरातील शोभिवंत झाडे (अ.दि. कोकड)
 • ट्रीज ऑफ पुणे (इंग्रजी, श्रीकांत इंगळहळीकर आणि शर्वरी बर्वे)
 • नक्षत्र वृक्ष (डॉ. शरदिनी डहाणूकर)
 • निसर्ग बोलतोय - भाग २ (प्राणी व वृक्षवल्लींबद्दलची प्रश्नोत्तरे, लेखक - डॉ. हेमंत दाते)
 • निसर्गभान (प्रा. श्री.द. महाजन)
 • परसबाग (द.गो. मांगले)
 • प्लँट प्रोपगेशन (हॉर्टिकल्चर इन्स्ट्रक्शन-कम-प्रॅक्टिकल मॅन्युअल, व्हॉल्यूम तिसरा, इंग्रजी लेखक - ए.के. धोटे)
 • फ्लॉव्हर्स ऑफ सह्याद्री (इंग्रजी, श्रीकांत इंगळहळीकर)
 • बहर (डॉ. श्री.श. क्षीरसागर)
 • वनश्रीसृष्टी : भाग १ आणि २ (डॉ. म.वि. आपटे)
 • सफर मुंबईच्या वृक्षतीर्थाची (प्रकाश काळे)
 • सेलिब्रेशन ऑफ इंडियन ट्रीज (इंग्रजी, अशोक कोठारी)
 • सिग्नेचर फ्लॉवर्स युकेमेरा (इंग्रजी, अच्युत गोखले)
 • हिरवाई (डॉ. शरदिनी डहाणूकर)

अन्यभाषक भारतीय लेखकांची पुस्तके संपादन

 • गार्डन फ्लॉवर्स (इंग्रजी, नॅशनल बुक ट्रस्ट-इंडिया प्रकाशन; लेखक - विष्णू स्वरूप)
 • जड़ी बूटियों की खेती (हिंदी, लेखक - वीरेन्द्र चन्द्रा आणि मुकुल चन्द्र पाण्डेय)
 • डिक्शनरी ऑफ इकॉनॉमिक प्लँट्स ऑफ इंडिया (इंग्रजी, लेखक - उमराव सिंग, ए.एम. वधवानी आणि बी.एम. जोहरी)
 • प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिस ऑफ सिल्व्हिकल्चर (इंग्रजी, लेखक - एल.एस. खन्‍ना)
 • फ्लॉवरिंग ट्रीज (इंग्रजी, लेखक - एम.एस. रंधावा)
 • फ्लॉवरिग ट्रीज अँड श्‍रब्ज इन इंडिया (इंग्रजी, लेखक - डी.व्ही. कॉवेन)
 • द बेल (बेलाचे झाड, इंग्रजी, लेखक - आर.एन. सिग आणि सुशांत के. रॉय)
 • मेडिसिनल प्लँट्स (इंग्रजी, लेखक - एस.के. जैन)
 • व्हेजिटेबल्स (इंग्रजी, लेखक - बी. चौधरी)

चित्रदालन संपादन

मध्यकाल संपादन

भारताच्या मध्ययुगीन काळातही, उदयन, धर्मोत्तर, गुणरत्न व शंकरमिश्र इत्यादी आचार्यांनी वनस्पतिशास्त्रात भर घातली आहे. विकिपीडिया:वनस्पती/यादी