चरक संहिता

आयुर्वेदावरील संस्कृत मजकूर

चरक संहिता या आयुर्वेदीय ग्रंथाचे संस्करण चरकाने केले. चरक संहितेचे नाव जरी चरक संहिता असले, तरी तीन विविध व्यक्तींनी त्याचे संपादन केले आहे. अग्निवेश या व्यक्तीने तिचे प्रथम संपादन केले म्हणून त्यास अग्निवेश संहिता असे देखील म्हणले जाते. चरक हा चरक संहितेचा दुसरा संपादक आहे.

ब्रह्मदेवाने प्रजापतिंना आयुर्वेद शिकवला. प्रजापतिने तो अश्विनीकुमारांना शिकवला. त्यांनी ते ज्ञान इंद्राला दिले. इंद्राने आयुर्वेद भारद्वाज ऋषींना शिकवला. त्यांनी तो पुनर्वसू ऋषी आणिअत्रि ऋषींना शिकवला. या दोन ऋषींनी तो आपल्या सहा शिष्यांना शिकवला. अग्निवेश ऋषी, भेद, जतुकर्ण, पराशर, हरित आणि क्षारपापाणि. यात अग्निवेशांनी त्याची संहिता लिहून काढली. चरकाने हीच संहिता संस्कारित केली. म्हणून चरक संहितेत पहिल्या अध्यायाच्या अंती म्हंटले आहे, 'इत्य अग्निवेशकृते तन्त्रे चरकप्रतिसंस्कृते सूत्रस्थाने' []

चरक संहितेच्या अनेक आवृत्या सिद्ध केल्या गेल्या. चरक संहितेच्या दहाही खंडाचे इंग्रजी भाषांतर झाले असून ते ई-पुस्तक स्वरूपात bookganga.com वर उपलब्ध आहे. छापील स्वरूपातील भाषांतराचे पुस्तक प्रकाशनाधीन आहे. ग्रंथाचे संपादन डॉ. पां.ह. कुलकर्णी यानी केले आहे.

  • चरक संहिता - इ.स. ९०० संस्कारक - दृढबाला - काश्मिरी पंडित
  • आयुर्वेद दीपिका - इ.स. १०६६ संस्कारक - चक्रपाणी दत्त
  • चरक न्यास - इ.स. ६०० संस्कारक - हरिश्चंद्र
  • निरंतर पादव्याख्या - इ.स. ८७५ संस्कारक - जैज्जातास
  • चरकतत्त्वप्रदीपिका - इ.स. १४६० संस्कारक - शिवदास सेन
  • चरकतत्त्वप्रकाश - इ.स. १८७९ संस्कारक - नरसिंह कविराज
  • चरक संहिता (मराठी) - (इ.स. १९८२) संपादक - डॉ. पां.ह. कुलकर्णी
  • चरक संहिता (इंग्रजी) - (इ.स. २०१५) संपादक - डॉ. पां.ह. कुलकर्णी
  • आयुर्वेद हा ग्रंथ सुमारे इ.स. पूर्व -४००० हजार (६०००) वर्षा पूर्वी लिहला गेला.

स्वरूप

संपादन

चरक संहितेची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे. आठ प्रकरणे व दोन परिशिष्टे.

  • आठ प्रकरणे
    • सूत्र स्थान - आयुर्वेदाचा तात्त्विक आणि वैचारिक पाया
    • निदान स्थान - चिकित्सा आणि रोग निदान शास्त्र
    • विमान स्थान
    • शारीर स्थान - शरीर विज्ञान शास्त्र
    • इंद्रिय स्थान - इंद्रिय विज्ञान शास्त्र
    • चिकित्सा स्थान - रोग आणि विकृतींमुळे होणारी गुंतागुंत
    • कल्प स्थान- आयुर्वेदातील पवित्र औषधी
    • सिद्धि स्थान - पंचकर्म रोग प्रतिकार आणि उपसंहार

अधिक माहिती

संपादन



  1. ^ वसंत गोडसे, चरक संहिता आणि आयुर्वेद, कालनिर्णय दिवाळी अंक २०१०