कोको (इंग्रजी:Cocao) वनस्पतीच्या फळांमधील बियांपासून तयार केलेल्या पदार्थाला कोको असे म्हणतात. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव थिओब्रोमा काकाओ असे आहे. ही वनस्पती मूळची मध्य व दक्षिण अमेरिकेतील ब्राझिल या देशातले आहे. कोकोच्या बियांमध्ये ५० ते ५५ टक्के स्निग्ध पदार्थ असतात. या बीया भाजून त्याचे तेल काढले असता त्यात कोको आढळतो. याची चव कडू असते. त्यापासून चॉकलेट बनवले जाते. कोकोमध्ये असलेल्या थिओब्रोमिन आणि कॅफिन यांच्या एकत्रित परिणामामुळे कोको प्याल्याने मेंदूला तरतरी येते.

थिओब्रोमा काकाओ वनस्पती

इतिहास

संपादन
 
काकाव हा माया भाषेतील लिखित शब्द

प्राचीन काळापासून दक्षिण अमेरिकेतील लोकांना कोकोचा उपयोग माहिती होता. मायाॲझटेक भाषांतील 'काकाओ' या शब्दाचा कोको हा अपभ्रंश आहे.

लागवड

संपादन

कोकोची लागवड केली की चार वर्षानंतर फळे धरून कोकोच्या बीया मिळतात. कोको विषुववृत्तीय उष्ण आणि आर्द्र प्रदेशात पिकणारी वनस्पती आहे. या पट्ट्यातील आयव्हरी कोस्ट, घानाइंडोनेशियामध्ये कोकोचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आयव्हरी कोस्ट हा जगातील सर्वात मोठा कोको उत्पादक देश आहे. कोको लागवडीत आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणात बालमजूरांचा उपयोग होतो. मुलांची तस्करी करून त्यांना या व्यवसायात ढकलले जाते. यामुळे कॅडबरी व नेस्ले या बहुराष्ट्रीय कंपन्या अडचणीत आल्या होत्या.

पुस्तके

संपादन
  • कथा चहा-कॉफी-कोको यांची कथा - निर्मला मोने, शिव प्रकाशन

बाह्य दुवे

संपादन