मुख्य मेनू उघडा
कापसाचे झाड
कापसाचे बोंड
बोंडातुन निघालेला कापूस

कापूस हा वनस्पतीपासून मिळणारा आणि सेल्युलोजयुक्त तंतू पूर्वापार मोठय़ा प्रमाणात वापरला जाणारा तंतू आहे. कापूस हे एक नगदी पिक आहे, कपाशी या झाडापासून कापूस मिळवला जातो यालाच पांढरे सोने असेही म्हटले जाते. कापसापासून धागे मिळवले जातात. धाग्यांपासून कापड तयार केले जाते. पेक्टिकद्रव्य, प्रथिन द्रव्ये, मेण, राख आणि आर्द्रता यांचा समावेश कापसाच्या तंतूमध्ये असतो. कापसाला पाण्याचे आकर्षण आहे. सुती कपडे घातल्यास हाच गुणधर्म घाम टिपून घ्यायला मदत करतो. म्हणूनच उष्ण कटिबंधातील देशात सुती कपडे प्राधान्याने वापरतात. कापूस खूप मऊ असतो.

मराठी-हिंदीमध्ये कापसाला रुई अस प्रतिशब्द आहे. मात्र रुई या विषारी ननस्पतीचा आणि कापसाचा काही संबंध नाही. कापसाला इंग्रजीत[Gossipium]

कापसामध्ये जवळपास ९५% सिल्लुलोस (Cellulose) असते.

अनुक्रमणिका

इतिहाससंपादन करा

साhttps://mr.m.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%82&action=edit&redlink=1धारणत: सुमारे ७००० वर्षापूर्वी पासून भारतीय उपखंडात कापसाची शेती केली जाते याचा पुरावा पाकिस्तानातील मेहरगढ या ठिकाणी झालेल्या उत्खननातून मिळाला. हजारो वर्षांपूर्वी प्राचीन भारत, चीन आणि इजिप्त मध्ये कापसाच्या धाग्यांपासून कपडे तयार केले जात. कापसापासून मिळणारे धागे तीन प्रकारचे असतात - लांब, मध्य आणि आखूड.

 
कापूस-वेचणी

उत्पादनसंपादन करा

सध्याचा काळात चीन भारत अमेरिका पाकिस्तान, ब्राझील, उजबेकिस्तान, टर्की, ऑस्ट्रेलिया, तुर्कमेनिस्तान, अर्जेंटिना या देशांमध्ये कापसाचे उत्पादन केले जाते. अमेरिकेच्या राष्ट्रीय कापूस परिषद २०११ च्या अहवालानुसार जगातील पाच अग्रेसर कापूस उत्पादक १. अमेरिका २. भारत, ३. ब्राझील, ४. ऑस्ट्रेलिया आणि ५. उझबेकिस्तान हे होत.

 
गुजरातमधील कापूस उत्पादन

भारतसंपादन करा

जगातील कपाशीखालील क्षेत्राच्या एक चतुर्थांश क्षेत्र भारतात कापूस लागवडीखाली आहे. भारतात महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणात कापसाचे पिक घेतले जाते तसेच गुजरात, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यातही कापसाची लागवड केली जाते

कापसाच्या जातीचे शास्त्रीय नाव गॉसिपियम आहे. व्यापारी तत्त्वावर वापरला जाणाऱ्या कापसाची झाडे बहुधा गॉसिपियम हिर्सुटमगॉसिपियम बार्बाडेन्स या दोन उपजातींची असतात.

महाराष्ट्रसंपादन करा

महाराष्ट्रात कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. विदर्भात कापसाच्या पिकाला आवश्यक असणारी काळी कसदार मृदा व कोरडे हवामान असल्यामुळे तेथे कापसाचे सर्वाधिक उत्पादन होते. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा म्हणजेच सर्वाधिक कापूस पिकवणारा जिल्हा असेसुद्धा म्हणतात. कापसापासून मोठ्या प्रमाणात सुती कापडाची निर्मिती करतात. महाराष्ट्रात अकोला येथे कापसाच्या पिकासाठी सर्वात मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे.[ संदर्भ हवा ]

=== पिकवण्याच्या पद्धती व वापर ===ंं

या पिकावरील रोगसंपादन करा

वरील तिन्ही कवकजन्य रोग आहेत.[१]

अर्थकारणसंपादन करा

सहकारसंपादन करा

सहकारी संस्थामुळे अर्थकारणाची वाट लागली

संदर्भसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा